Friday, August 10, 2018

लघु कथा: आरशा कधीच खोट बोलत नाही


तिने आरश्यात डोकावले, निस्तेज चेहरा, पांढरे होणारे डोक्यावरचे केस, डोळ्यांखाली मोठे काळे वर्तुळ, चेहऱ्यावर सुरकत्या.. आज पार्लर मध्ये जावेच लागेल. "ए म्हातारी, किती वेळ आरश्यात डोकावणार". मी म्हातारी, अजून वय काय माझे, नुकतीच पन्नासी उलटली आहे. खोटारडा..."हा! हा! हा! आम्ही आरशे कधीच खोटे बोलत नाही, ए म्हातारी....." 

ब्युटी पार्लरमध्ये तिने केस रंगविले, गोल्ड फेशियल, मसाज....पूर्ण ब्युटी  ट्रिटमेंट घेतली. तोंड रंगवून आरश्यासमोर गुणगुणू लागली 'बिजली गिराने  मैंं तो आई, कहतेंं हैं लोग मुझे हवा हवाई'  ए आरश्या आता चूप का आहे, सांग कशी मी दिसते? "ए म्हातारी.....". चल खोटारडा फिरकी घेतो आहेस माझी...एक ठोसा देईल. "हा! हा! हा! तुझाच हात रक्त बंबाळ होईल. माझे काय, दुसरा आरशा हि हेच म्हणेल  तोंडावर कितीही बुरखे घातले तरी म्हातारपण लपणार आहे का? ए म्हातारी....." 


No comments:

Post a Comment