Thursday, April 27, 2023

वार्तालाप (10): बोलण्यासारिखें चालणें. तयाचीं मानिती जनीं .

बोलण्यासारिखें चालणें.  स्वयें करून बोलणें.
तयाचीं वचनें प्रमाणें. मानिती जनीं। १२.१०.३९ ॥

समर्थ म्हणतात, जो बोलण्याप्रमाणे स्वत: वागतो आणि आधी स्वत: करून मग बोलून दुसर्‍यास उपदेश करतो, त्याची वचने लोक प्रमाण मानतात. एक सर्व साधारण अनुभव, आपण छोट्या-छोट्या कारणांनी शेजारी-पाजर्‍यांशी खोटे बोलते. आपण काही चूक करतो, असे ही आपल्याला वाटत नाही.  मग आपण आपल्या मुलांना कितीही खरे बोलण्याचा उपदेश केला तरीही आपली मुले आपल्यासोबत खोटेच बोलतात. त्याचे आपल्याला दु:ख होते. पण खोटे बोलताना आपलीच मुले आपलेच अनुकरण करत असतात, हे सत्य पचणे कठीणच. समाजात राहणार्‍या लोकांची सहज प्रवृती असते आपल्यापेक्षा  मोठ्यांचे अनुकरण करणे, मग पालक असो की नेता.  

आता दुसरे एक उदाहरण 2016 च्या एका मन की बात या कार्यक्रमात आपल्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी देशवासीयांना खादी वस्त्रे वापरण्याचा सल्ला दिला. देशांत खादीची विक्री तीन पट जास्त वाढली आणि गेल्या वर्षी 1 लाख कोटींच्या वर झाली. कारण आपले प्रधानमंत्री स्वत: खादीचे वस्त्र घालतात. त्यामुळे जनतेने त्यांचे अनुकरण केले. देशात खादीची विक्री वाढली. 

सारांश एवढाच कुणालाही उपदेश करण्यापूर्वी खात्री केली पाहिजे की आपण स्वत: त्याचे पालन करतो की नाही. अन्यथा आपल्या सांगण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 

 

Wednesday, April 26, 2023

पर्यावर्णीय शीतयुद्ध : धरण ते मेट्रो इत्यादि

पूर्वी युद्धाचा मुख्य उद्देश्य दुसर्‍या देशांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या कडून अप्रत्यक्ष रूपेण चौथ वसूली करणे हो होता. आज युद्ध अत्यंत महागडा प्रकार आहे. फायदा कमी नुकसान जास्त आहे. आजच्या काळात शत्रू देशांच्या प्रगतिच्या मार्गात अडथळे उत्पन्न करून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणे, हा ही युद्धाचा एक प्रकार आहे. बिना एक ही गोळी चालविता फक्त काही कोटी खर्च करून शत्रू देशाचे हजारो कोटींचे नुकसान सहज केले जाते. त्यासाठी शत्रू देशातील स्वार्थी मीडिया, स्वार्थी राजनेता आणि तथाकथित सामाजिक संगठनांचा वापर केला जातो. काही कोटी फेकून दुसर्‍या देशात  जनतेच्या हितांच्या प्रोजेक्टस विरुद्ध मोठे-मोठे आंदोलन उभे केले जातात. 

या आर्थिक शीत युद्धात आजपर्यन्त आपल्या देशाला लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी जनता आर्थिक प्रगति आणि रोजगार पासून  वंचित राहिली. सरकारला ही शत्रू देशांच्या षड्यंत्राची माहीत असते. पण भारतासारख्या प्रजातांत्रिक देशातिल कमकुवत कायदे आणि त्यावर न्यायपालिकेची, कासवला ही लाजवेल अशी कार्य पद्धती, विकासाच्या प्रोजेक्ट्सवर न्याय व्यवस्थेकडून हिरवा कंदील मिळे पर्यन्त लाखो कोटींचे नुकसान देशाला होऊन गेलेले असते. अश्या व्यवस्थेत शत्रूच्या तालावर नाचणार्‍या तथाकथित सामाजिक संगठनांवर कठोर कारर्वाई करणे ही अशक्यच असते.  

आज देश खाद्यान्न बाबतीत आत्मनिर्भर आहे. एवढेच काय तर आज अनेक देशांना मदत ही करत आहे. आपल्या देशात झालेल्या हरित क्रांति मागे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथे बांधण्यात आलेल्या धरणांचे आणि मैदानी भागात निर्मित कालव्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तीन वर्षांपूर्वी टिहरी धरण बघायला गेलो होतो. धरण आतून दाखविण्यासाठी एक कर्मचारी सोबत दिला होता. (आतून धरण पाहण्याचे भाग्य फार कमी लोकांना मिळते)  त्या कर्मचार्याचे गाव ही धरणात बुडाले होते आणि त्या बदल्यात त्याला नौकरी आणि परिवाराला घर ही मिळाले होते. धरणाचा विषय निघणे साहजिकच होते. तो म्हणाला ह्या प्रोजेक्टमध्ये अनेक अडथळे आल्याने धरणाचा खर्च ही अनेक पटीने वाढला. या धरणाला पांढरा हत्ती असे संबोधित केले जाते.  माझ्या मनात माझे गाव, घरदार बुडण्याचे शल्य  सदैव टोचत रहात होते. केदारनाथ घटना झाली. त्यावेळी या भागत भयंकर पाऊस सुरू होता. या धरणाने अब्जावधी लीटर पानी पोटात साठवून हरिद्वार पर्यन्त लाखों लोकांच्या प्राणांची रक्षा केली आणि हजारो कोटींच्या संपत्तीचे ही रक्षण केले. अप्रत्यक्ष रूपेण धरणावर झालेला संपूर्ण खर्च त्या तीन दिवसांत वसूल झाला. तो म्हणाला आज मला या धरणावर गर्व आहे. बोलता-बोलता तो सहज म्हणाला, आंदोलनकारी नेत्यांना आमच्या पुनर्वसन एवजी धरणाचे काम लांबविण्यात जास्त रस होता. अखेर उशिरा का होईना आम्हाला हे सत्य कळलेच. स्थानिक जनतेने आंदोलनकारी नेत्यांच्या विरोधाला न जुमानता सरकारची मदत  स्वीकार केली. धरणाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला.

त्या नंतर काहीच दिवसांनी  2019-20 डिसेंबर-जानेवारी मध्ये गुजरातची भटकंती केली. सरदार सरोवरच्या काठावर बांधलेल्या नर्मदा टेंट सिटीत दोन दिवस राहून तिथला परिसर बघितला. त्या परिसरात झालेला विकास डोळ्यांनी स्पष्ट दिसत होता. तिसर्‍या दिवशी अहमदाबादकडे निघताना रस्त्यात आरोग्यवन पाहिले. त्यावेळी त्याचे उद्घाटन झालेले नव्हते. दुपारची वेळ होती. तिथे ग्रामीण महिला सेल्फ हेल्प ग्रुप एक भोजनशाळा, तिथे काम करणार्‍या कर्मचारी आणि आमच्या सारख्या चुकून आलेल्या पर्यटकांसाठी सोयीसाठी, चालवीत होत्या. भोजन शाळेत पांढर्‍या मक्याची ताजी पोळी, वांग्याची भाजी, गुजराती कढी आणि छाज हा मेनू होता. घरी जेवल्या सारखे वाटले. तिथल्या महिलांशी बोलताना कळले आंदोलनकार्‍यांनी त्यांना मूर्ख बनविण्या पलीकडे काही एक केले नाही. त्यांच्या उद्देश्य फक्त धरणाचे काम थांबविणे होता. आता स्थानिकांना कामाच्या शोधात अहमदाबाद, सूरत,  मुंबई  जाण्याची गरज नाही. शेतकरी आता भाजी-पाला आणि दुग्ध व्यवसाय ही करू लागले आहेत. दोन्ही ठिकाणी आज आंदोलनकारी लोकांना स्थानिक जनता जवळ ही उभे करणार नाही.  

सरदार सरोवर प्रोजेक्ट्सची काही माहिती. कालवे इत्यादी पूर्ण झाल्यावर गुजरातमधील 15 जिल्ह्यांतील 45 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. धरणातून उत्पन्न वीज निर्मितीचा लाभ महाराष्ट्र, गुजरात आणि मध्ये प्रदेशला मिळत आहे आणि राजस्थानला पाणी. या शिवाय राजस्थानमध्ये २.४६ लाख हेक्टर, महाराष्ट्रात ७३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पंजाब, हरियाणा, प. उत्तर प्रदेश प्रमाणे इथले शेतकरी ही समृद्ध होतील आणि त्याच सोबत शेतकर्‍यांवर निर्भर असलेला इतर समाज ही. गुजरातच्या गावांत राहणार्‍या कोट्यवधी लोकांचे जीवनस्तर उन्नत होणार. या धरणाने गेल्या काही वर्षांतच 16000 कोटीहून जास्त कमाई केली आहे. पुढील काही वर्षांत धरण निर्मितीचा खर्च भरून निघेल. या शिवाय उद्योग, पर्यटन वाढल्याने  मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणारच. 

धरणाची निर्मिती उशिराने झाल्याने सरदार सरोवर प्रोजेक्ट्सचा खर्च  6400 कोटींहून वाढून 50000 कोटींच्यावर गेला.वर्ल्ड बँकचे स्वस्त कर्ज ही मिळाले नाही. प्रोजेक्ट्स पूर्ण व्हायला 40 वर्षांहून अधिक काळ लागला. हे धरण जर 20 एक वर्षांपूर्वी पूर्ण झाले असते तर शेती सोबत उद्योगांचा विकास तेंव्हाच झाला असता. तो हिशोब केला तर काही लाख कोटींचे नुकसान निश्चित देशाला झाले. माननीय मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री नसते तर कदाचित आज ही हा प्रोजेक्ट पूर्ण झाला नसता. 

मेट्रो प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण कमी करतात. वीस वर्षांपूर्वी दिल्लीत बस आणि ऑटोने प्रवास करणार्‍या प्रवासींच्या डोळ्यांना खाज सुटणे, पाणी  निघणे, खोकला येणे, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे  इत्यादि सामान्य बाबी होत्या. आज जवळपास 400 किमी हून जास्त मेट्रो नेटवर्क मुळे हवेच्या प्रदूषण मुळे प्रवासींना होणारे त्रास बर्‍यापैकी कमी झाले आहे. मेट्रो नसती तर आजच्या घटकेला दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना करणेच अशक्य होते. याशिवाय मेट्रोने कापलेल्या झाडांपेक्षा दहा पट जास्त झाडे जगवून दिल्लीत हिरवळ वाढीला ही मदत केली आहे. मुंबईत आरे कारशेडच्या विरोध ही पर्यावरणच्या नावाने केला. ज्यांनी विरोध केला त्यांच्या उद्देश्य मेट्रोचे कामात बाधा उत्पन्न करणे होता. आता मेट्रो प्रोजेक्ट उशिराने पूर्ण होणार आणि बजेट ही दहा हजार कोटींपेक्षा जास्त वाढणार. प्रवासींना ही रस्त्याचे प्रदूषित पर्यावरण ही जास्त काळ सहन करावे लागणार. दुसर्‍या शब्दांत पर्यावरणाच्या नावाने मेट्रोचा विरोध करण्याचा उद्देश्य जवळपास पूर्ण ही झाला.  आरे कारशेडचा विरोध करणारे खर्‍या अर्थाने पर्यावरण विरोधी होते.  असेच जनहित याचिका टाकून दिल्लीच्या नव्या मेट्रो-IV मार्गांत अनेक अडथळे निर्माण केले गेले.  नुकताच मेट्रो-IV प्रोजेक्टस बाबत न्यायालयाने सकारात्मक निकाल दिला आहे. भूतपूर्व मुख्यमंत्री शीला दीक्षितच्या काळात सर्व मेट्रो  प्रोजेक्टस वेळेच्या आधी पूर्ण झाले होते. पण आज दिल्ली सरकार ही काही न काही कारण काढून समस्या निर्मित करत आहे. या सर्व कारणांमुळे प्रोजेक्ट्स पूर्ण होण्यास अनेक वर्ष उशीर होणार आणि प्रोजेक्ट कॉस्ट ही हजारो कोटींनी वाढणार. पर्यावरणाची हानी ही होणार, हे वेगळे. 

आज तथाकथित पर्यावरणवादी जनहित याचिकांच्या माध्यमाने, मीडियाच्या मदतीने,   विकासाचे अनेक प्रोजेक्ट्स थांबवून/ लंबित करून देशाला लाखों कोटींचे नुकसान पोहचवत आहे. व्होट बँक राजनीति करण्यासाठी अनेक राजनेता ही यात  पोळी भाजतात आणि त्या भागातील जनतेचे नुकसान करतात. 


Thursday, April 20, 2023

वार्तालाप (9): अकस्मात तें राज्य सर्वे बुडाले


मना सांग पां रावणा  काय  जालें 
अकस्मात तें  राज्य सर्वे बुडालें.
म्हणोनी  कुडी वासना सांडिं  वेंगी 
बळें लागला काळ हा पाठिलागी.

समर्थ म्हणतात मृत्यू कुणालाच चुकलेली नाही. भगवंताने माणसाला 100 वर्षांचे आयुष्य दिले आहे. माणसाला, दुष्ट वासनांचा त्याग करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालत चारी आश्रमांचे कर्तव्य पूर्ण करत, मृत्यू आली तर त्याचे दु:ख कुणालाच भोगावे लागत नाही. अशी मृत्यू प्रत्येकाला हवी असते. समर्थ पुढे म्हणतात, दुष्ट माणसांचा अकस्मात नाश होतो. कुडी म्हणजे दुष्ट वासनेच्या चक्रात रावण बुडालेला होता. त्यामुळे त्याचा अकस्मात नाश झाला. राक्षसी साम्राज्य बुडाले.  इथे समर्थांनी अकस्मात शब्द वापरला आहे. कारण रावणा जवळ दैवीय अस्त्र-शस्त्रानीं सुसज्जित सैन्य होते. देव आणि दानवांची त्याला भीती नव्हती. पण एका वनवासी श्रीरामाने वनात राहणाऱ्या  वानर, भिल्ल इत्यादींच्या मदतीने शक्तिशाली रावणाला सहज पराजित केले. दुष्ट वासनांचे परिणाम रावणाला आणि समस्त श्रीलंकेच्या प्रजेला भोगावे लागले. 

आज ही ओवी घेतली त्याला ही कारण आहे. नुकतीच दूरदर्शन वर अतीक  अहमदच्या हत्येची बातमी पाहिली. अतीक अहमद ज्याची गॅंग हप्ता वसूली करायची, धमकी द्यायची, जमिनी हडपायची, बलात्कार, लूटमार इत्यादि  करायची. विरोध करणाऱ्यांना तो यमसदनी पाठवायचा. न्यायाधीश ही त्याला घाबरायचे. जो जेल मधूनही लोकांना धमक्या द्यायचा. राजनेता ही त्याचे पाळीव होते. त्याच्या विरुद्ध तक्रार करायला ही सामान्य जनतेची हिम्मतच नव्हती. याच दुष्ट मार्गाने त्याने हजारो कोटींची माया जमविली होती. मोठे साम्राज्य उभे केले होते. पण काय  झाले, अकस्मात त्याच्या मुलाचे एनकाऊंटर झाले, पोलिसांच्या सुरक्षेत ही त्याची हत्या झाली आणि त्याची बायको पोलिसांच्या भीतीने वणवण फिरते आहे. आज दुष्ट वासनांचे परिणाम त्याला आणि त्याच्या परिवाराला भोगावे लागत आहे. 




Thursday, April 13, 2023

वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ

  
तब्बल चार वर्षांनंतर दिल्लीच्या पुस्तक मेळाव्याला भेट दिली. तीन-चार पुस्तके ही विकत घेतली. अचानक लक्ष अत्यंत सुंदर मुखपृष्ठ आणि उत्तम कागदावर छापील वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियावर गेले. माझ्या सारख्याला या पुस्तकातले काही एक कळणे शक्य नव्हते. तरीही वनस्पति विश्वकोशाची विवरणिका मागून घेतली. विवरणिकात वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाची इत्यंभूत माहिती तर होती या शिवाय प्रत्येक खंडाची वेगळी माहिती होती. जगात पहिल्यांदाच हे कार्य ते ही भारतातील एक संस्था करत आहे, हे वाचून गर्व झाला. विवरणिका आणि यू ट्यूब वरून ही माहिती मिळविली. त्या आधारावर हा लेख.

वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया हा औषधी वनस्पतींचा एक बहु-विपुल संग्रह आहे. जगभरात  सर्वत्र विखुरलेल्या सर्व पारंपरिक औषधी वनस्पतींचे ज्ञान आणि त्यांचा व्यापक उपयोग एकाच पुस्तकात एकत्रित करणे हा या विश्वकोशाचा उदेश्य आहे. जगभरात एकूण 3.6 लाख वनस्पतींची विविधता उपलब्ध आहे. आणि, यापैकी अंदाजे 60,000 वनस्पती जगातील पारंपरिक औषधी प्रणालींत वापरल्या जातात. भविष्यात या वनौषधींचा मानव जातीच्या हितासाठी आधुनिक वैज्ञानिक रीतीने अनुसंधान करून विविध रोगांवर औषधी निर्मित केली जाऊ शकते. याशिवाय भारतीय पारंपरिक औषधी ज्ञानाला पेटंट चोरांपासून  वाचविणे हा ही एक उद्देश्य आहे.  

या विश्वकोशात जगभरात बोलल्या जाणार्‍या सुमारे 1,700 प्रादेशिक भाषांमध्ये जगातील सुमारे 60,000 औषधी वनस्पती, 7500 वनस्पति वंश 50000 वनस्पति प्रजाती ज्यात 6 फायलोजेंनिक गट, 1024 टेरिओडोफाइट्स, 850 बुरशी, 274 ब्रायोफाइट्स, 378 शैवाल, 44794 एंजियोस्पर्म्स, 536 जिम्नोस्पर्म आहेत. यात व 6 लाख Bibliographic sources, 2.5 लाख वनस्पतींचे समानार्थक शब्द, 12 लक्ष स्थानिक नावे, 1300 ज्ञात  रोगांवर 2200 हून अधिक औषधींचे वर्णन आहे. या शिवाय औषधी वनस्पतींची प्रामाणिक 30500 कॉनव्हास चित्रे, 35000 रेखाचित्रे ही आहेत. या शिवाय यात यूरोपियन, अमेरिकन, आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन आणि एशिया खंडातील औषधी प्रणाली आणि त्यात वापरणार्‍या औषधिंसाठी वेग-वेगळे खंड ही आहेत. शेवटच्या खंडात उपसंहार आहे. 

हा विश्वकोश 109 खंडात पूर्ण होणार आहे. या विश्कोशाच्या निर्मितीत  900 शास्त्रज्ञ ज्यात भारतीय, विदेशी 25 पोस्ट डॉक्टरेट, 50 पीएचडी धारक, क्लिनिकल संशोधक, वनस्पति शास्त्रज्ञ, वर्गीकरण शास्त्रज्ञ, सूष्म जीव शास्त्रज्ञ, biotechnologist आणि इतर शास्त्रज्ञ. या शिवाय 31 आयटी विशेषज्ञ आणि इतर 120 आयुर्वेदिक डॉक्टर, 40 भाषा शास्त्री. या सर्वांचा समन्वय साधणारे शेकडो निस्वार्थी कार्यकर्ता आणि कर्मचार्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अधिकान्श शास्त्रज्ञांनी अल्प मानधनात किंवा सेवा भावनेने कार्य केले आहे. अन्यथा हे कार्य पूर्ण करणे असंभव होते. या विश्वकोशाचे आज पर्यन्त 70 खंड प्रकाशित झाले आहे. पहिल्या खंडाचे प्रकाशन माननीय प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते 3 मे 2017ला झाले होते. 

15 वर्षांपूर्वी हे कार्य करण्याचा संकल्प आचार्य बालकृष्ण यांनी केला होता. पण हे कार्य हिमालय पर्वत सर करण्यापेक्षा ही कठीण होते. विषय वेगळा आहे पण आचार्य बालकृष्ण यांनी हिमालयातील 25000 फूट उंच पर्वत शिखर बिना ऑक्सीजन सर केले आहे. हिमालय पुत्र असल्याने त्यांच्यासाठी हे कार्य कठीण नव्हते. त्यांची 15 हून जास्त वर्षांची तपस्या आणि जगभर पसरलेल्या वनस्पति क्षेत्रांत कार्य करणार्‍या संस्थांच्या मदतीने हे महत्त कार्य पूर्णत्वेच्या मार्गावर आहे.

एक-एक टप्प्याने या कार्याची सुरवात झाली होती. पहिले कार्य आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या वनस्पतींचा शोध घेणे. आज 700च्या जवळ वनौषधींचा वापर आयुर्वेदात होत आहे. पण औषधींची वास्तविक संख्या जाणण्यासाठी आयुर्वेदात वापरल्या जाणार्‍या औषधींचा शोध घेणे गरजेचे होते. या साठी देश विदेशांत सुरक्षित पांडुलिपींचा शोध घेणे आणि त्यांचे डिजिटली करण्याचे कार्य हाती घेतले. 60000 हून जास्त पांडुलिपी ज्यात 50801 ताडपत्री पांडुलिपी सहित 63 लाखाहून जास्त पानांचे डिजिटलीकरण केले. यात आयुर्वेद सहित 18 विषय आहेत. दोन डझनहून जास्त प्राचीन आयुर्वेदिक पुस्तकांचे प्रकाशन ही केले. या पुस्तकांचा लाभ आयुर्वेदिक शिक्षक, विद्यार्थी सहित औषधी निर्मात्यांना ही होणार. या शिवाय पेटेंट सुरक्षित करण्यात ही मदत मिळेल. हे कार्य अद्याप ही सुरूच आहे. भारतात सापडणार्‍या 20000 वनस्पतींपैकी जवळपास 1000 हून जास्त वनौषधींचा वापर भारतातील विभिन्न पारंपरिक चिकित्सा पद्धतीत होतो. आचार्य बाळकृष्णाच्या मते भारतातील अजून 5 ते 7 हजार वनस्पतींचा वनौषधींच्या रूपाने होऊ शकतो. त्यासाठी अनुसंधानाची गरज आहे.

पतंजली हर्बल गार्डनची स्थापना करण्यात आली. या हर्बल गार्डनचा मुख्य उद्देश्य भारतात उपलब्ध औषधी वनस्पतींचे जतन करणे आणि त्यांचा प्रसार करणे. संपूर्ण भारतातील 1,000 हून अधिक औषधी वनस्पती, झुडपे, झाडे, लता, ह्या सर्वांचा उपयोग वैज्ञानिक समुदाय आणि सामान्य जनता या दोघांनाही होत आहे.
 
पतंजली रिसर्च फाउंडेशन हर्बेरियम (PRFH)ला न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डन, यूएसए द्वारे मान्यता प्राप्त आहे. भारताच्या विविध भागातून पूर्व आणि पश्चिम हिमालय आणि उच्च गंगेच्या मैदानातील टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्सचे 10,000 वनस्पती 2,000 हर्बेरियम शीट्स वर आहेत. नाममात्र शुल्क देऊन विद्यार्थी आणि संशोधक दोघेही येथे वनस्पती ओळखीचे प्रमाणपत्र मिळवू शकतात.

वैदिक नामकरण पद्धती: जगात ३.६ लाख वनस्पती प्रजाती आहेत आणि त्यांच्या वैज्ञानिक नावांची संख्या जवळपास १३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे भ्रम निर्मिती होते. या शिवाय वनस्पति शास्त्रज्ञांना वनस्पतींची नावे लक्षात ठेवणे ही कठीण होते. संस्कृत एक वैज्ञानिक भाषा आहे. भाषातज्ञ आणि आयुर्वेदिक दिग्गजांच्या सहाय्याने "वैदिक नामकरण पद्धती" विकसित केली. वैदिक नामकरण वनस्पतींच्या बाह्य आणि शारीरिक वैशिष्ट्यांवर जोर देते आणि अशा अर्थपूर्ण पद्धतीने क्युरेट केले गेले जेणेकरून वनस्पतींचे लिंग आणि फायलोफजेनिक गट निर्दिष्ट करण्या बरोबरच कोणत्याही विशेष उपकरणाचा वापर न करता वनस्पतींचे आयडेटिफिकेशन करता येईल. या शिवाय भविष्यात सापडलेल्या वनस्पतींना देखील नाव दिले जाऊ शकते, अशा प्रकारे वैज्ञानिक समुदायासाठी एक सुलभ डेटाबेस तयार केला जाऊ शकतो. वनौषधी विश्वकोश हा पहिला ग्रंथ आहे ज्यात जगातील सुमारे ६०,००० औषधी वनस्पतींना संपूर्णपणे नवीन संस्कृत नामावली (द्विपदी नमुन्यात) कुटूंबापासून ते वंश आणि प्रजाती स्तरापर्यंत देण्यात आली आहे, ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीने नामकरणाच्या उत्पत्तीचा आधार आहे. वैदिक नामकरण पद्धतीने ठेवलेल्या नावांचा वापर अंतराष्ट्रीय दर्जाच्या शोध पत्रांनी ही स्वीकृत केला आहे.

औषधी वनस्पतींच्या चित्रांचे संग्रहालाय: विश्वकोशच्या निर्मितीत सर्वात मोठी समस्या वनस्पतींच्या चित्रांची होती. अधिकान्श उपलब्ध फोटो किंवा चित्रांचे कॉपी राइट असण्याची संभावना होती. या शिवाय त्यांच्या प्रमाणिकते वर ही प्रश्न चिन्ह येऊ शकत होते. यासाठी नव्याने जगातील सर्व वनस्पतींचे कॅनव्हास पेंटिंग्ज नव्याने काढण्याचा निश्चिय केला. अनेक वनस्पति शास्त्री आणि चित्रकारांच्या मदतीने औषधी वनस्पतींचे 35000 कॅनव्हास पेंटिंग्ज आणि 30000 रेखाचित्रे नव्याने काढण्यात आली. या कार्यात ही अनेक वर्ष लागले. या चित्रांचा वापर वनौषधी विश्वकोश मध्ये केला आहे. हे संग्रहालाय वनौषधींचे जगातील सर्वात मोठे संग्रहालाय आहे.

या वनस्पति विश्वकोशाचा उपयोग वनस्पती शास्त्रज्ञ, पारंपरिक डॉक्टर/ वैद्यांना होणार आहे.जगातील विभिन्न वांनौषधींवर अनुसंधानाचा नवीन मार्ग ही उघडेल. वाढत्या हर्बल औषधी उद्योगाला याचा लाभ मिळणार. वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाचा प्रत्येक खंड 800 ते 1000 पानाचा आहे. प्रत्येक खंडाची किंमत ही जवळपास 7000 रु आहे. यावर प्रश्न विचारल्या वर उत्तर मिळाले, विश्वकोशच्या निर्मितीत लागणारा वेळ, मनुष्य बळ आणि खर्च पाहता, ही किंमत अत्यंत कमी आहे.