Thursday, May 16, 2024

पाकिस्तानचा सम्मान करा

पाकिस्तान हा भारताचा शेजारी आहे. एका अर्थाने भारताचा लहान भाऊ. पण सध्याच्या घटकेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति बिकट आहे. महागाई 33  टक्क्यांनी वाढत आहे. जनता महागाई, बेरोजगारी इत्यादीने ने त्रस्त आहे. पाकिस्तानात सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. दुसरी कडे भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची झपाट्याने प्रगति होत आहे. पण आपल्या लहान भावाची मदत करणे सोडून भारत त्याच्या छताडावर बंदूक रोखून उभा आहे. पाक व्याप्त कश्मीर मध्ये अराजकता माजवत आहे. पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत आहे. अज्ञात व्यक्ति तिथल्या प्रसिद्ध शांतिपूर्ण लोकांची हत्या करत आहे. भारताचे पाकिस्तान सोबत असे वागणे निश्चितच उचित नाही. या परिस्थितीवर भारताच्या एका प्रसिद्ध अहिंसावादी नेता मनीशंकर यांनी विधान केले, हे असेच चालू राहिले तर तिथल्या पागल लोकांचे माथे भडकतील. त्यांच्या जवळ अणु बॉम्ब आहे. त्यांना तो बॉम्ब भारतावर फोडायला वेळ लागणार नाही. जर त्यांनी लाहोर मध्ये फोडला तरी अमृतसर नष्ट होणार. आपल्या देशाचे किती नुकसान होईल याची कल्पना करा.  हा विनाश थांबवायला असेल तर आपल्याला पाकिस्तानचा सम्मान केला पाहिजे. 

आता प्रश्न येतो. पाकिस्तानचा सम्मान कोणत्या रीतीने केला पाहिजे जेणे करून तो भारतावर अणु बॉम्ब टाकणार नाही. पाकिस्तानची भारताकडून काय अपेक्षा आहे यावर विचार करून काही उपाय शोधले. 

1. भारताने पाकिस्तान सोबत वार्ता पुन्हा सुरू करावी. 
2.  पाकिस्तानची सीमा पुन्हा खुली करून व्यापार सुरू करावा. 
3. ज्या प्रमाणे भारत आपल्या 80 कोटी लोकांना राशन फ्री देतो तसेच पाकिस्तानच्या जनतेला ही देण्यासाठी काही कोटी टन गहू, तांदूळ आणि  साखर उपहार स्वरूप पाकिस्तानला द्यावे. 
4. भारताने पाकिस्तान मध्ये शांतिपूर्ण लोकांची हत्या करणे त्वरित बंद करावे. 
5. भारतातील जेलांमध्ये बंद पाकिस्तानच्या शांतिपूर्ण नागरिकांची सुटका करून त्यांना पाकिस्तान मध्ये परत पाठविले पाहिजे. 
6.  पाकिस्तान मधून शांततेचा संदेश घेऊन भारतात येण्याचा प्रयत्न करणार्‍या शांतिपूर्ण पाकी नागरिकांची हत्या करणार्‍या सुरक्षा दलांच्या जवानांवर हत्येचे  केसेस दाखल करून त्यांना दंड दिला पाहिजे. बहुतेक पूर्वी असे होत होते. त्या वेळी कश्मीर घाटीतील भारतीय सुरक्षा दलांत एक म्हण प्रचलित झाली होती. "मर गये तो पेन्शन, बच गये तो टेंशन". 
6. नद्यांवर बांधलेले बंधारे तोडून सर्व पाची नद्यांचे संपूर्ण पाणी पाकिस्तानला दिले पाहिजे. जेणे करून तिथल्या शेतकर्‍यांना भरपूर पानी मिळेल. अन्न उत्पादन वाढल्याने तिथली महागाई दूर होईल. तिथल्या जनतेला स्वस्त अन्न धान्य मिळेल. 
7. सर्वात शेवटी कश्मीरचा भाग अत्यंत आनंदाने पाकिस्तानला सौपविला पाहिजे. असे केले की पाकिस्तान अत्यंत प्रसन्न होईल आणि भारतावर अणु बॉम्ब फोडणार नाही. 

जो पर्यन्त तानाशाह मोदीजींची सत्ता भारतात आहे. पाकिस्तानचा सम्मान होणे शक्य नाही. कारण आजच्या अशिक्षित सत्ताधीशांना विदेश नीतीचे ज्ञानच नाही. आपल्या शेजार्‍याला कसे प्रसन्न ठेवावे हेच कळत नाही. येत्या जून 4 नंतर मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर पाकिस्तान मध्ये अराजकता माजवून पीओके घेण्याचा प्रयत्न भारत करू शकतो. अश्या परिस्थितित निराश होऊन पाकिस्तानी सैन्य भारतावर अणु बॉम्ब फोडू शकतो. येत्या निवडणूकीत पाकिस्तानचा सम्मान करणार्‍याच्या इरादा ठेवणार्‍यांना मत दिले तर भारतावर अणु बॉम्ब पडणार नाही. पाकिस्तानचा सम्मान करण्याचे आणिक काही उत्तम उपाय असतील तर ते प्रतिसादात सांगावे ही अपेक्षा. असो. 






Thursday, May 2, 2024

मध्यम वर्ग: मतदानासाठी कमालीची अनास्था

गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा.  मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स.  हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार  मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान  केंद्र स्थापित केले गेले होते.

सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत  मतदरांमुळे  शक्य झाले. असे म्हणता येईल.

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहेत? खरे तर सर्वात  जास्त मतदान शिक्षित  मध्यम वर्गाने  केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. 

पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो.  मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. 

जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.