Sunday, December 18, 2011

वाट मृत्युचीजनकपुरितल्य़ा
डिस्ट्रीक्ट पार्क मध्ये

चार 'बूढ़े'

पाथरलेल्य़ा डोळ्यानी
पाहत होते वाट मृत्युची
पण देखावा मात्र
'रमी' खेळण्याचा 

Saturday, December 10, 2011

'युगधर्म'


निवडूक जिंकण्यासाठी आजचे नेता कुठल्याही थरावर जातात. कालपर्यंत जे विरोधी होते ते निवडणूक जवळ आल्यावर मित्र बनतात. आज धर्मयुद्ध म्हणजे सत्तेसाठी युद्ध! आता विचार करा जर महाभारताच्या वेळी भारतात प्रजातंत्र असते आणि दुर्योधनाच्या सभेत लाखोंची भीड असती तर त्या वेळी 'आजच्या कृष्णाने' आजच्या अर्जुनास काय उपदेश दिला असता?

'युगधर्म'

पाहुनी लाखोंची भीड़ 
दुर्योधनाच्या सभेत

संभ्रमि अर्जुनाने विचारले 
'योगेश्वर' माझा 'धर्म' काय? 

कृष्णाने हाकली 'मर्सडीज'
पोहोचला दुर्योधनाच्या 'तंबूत' 

आणि वदला: 
'पार्थ' हाच आहे आजचा 
'युगधर्म'.

Tuesday, December 6, 2011

प्रोडक्ट 'कविता


शब्दांच्या साच्यात
आम्बट - गोड, कडू - तिखट
भावनांचा रस ओततो
आणि तैयार करतो
फास्टफूड सारखा स्वादिष्ट
प्रोडक्ट 'कविता'.

Saturday, December 3, 2011

निसबत अर्थात सम्बन्ध -प्रश्नोत्तर स्वरूपाचा काव्य प्रकारहिंदीचे आदि कवी अमीर खुसरोंनी खड़ीबोलीमधे (हिंदीची बोली जी दिल्ली- मेरठ भागात बोलली जाते) दोन पूर्णतया भिन्न वस्तुंमधे सम्बन्ध अर्थात समानता दाखविण्यासाठी 'निसबत' हा प्रश्नोत्तर स्वरूपाचा काव्य प्रकार हिंदीत आणला होता- त्यांच्याच एका 'निसबतचा' मराठी अनुवाद:


मुर्गा आणि बादशाह

बादशाह और मुर्ग में क्या निसबत है?
दोनों 'ताज' पहनते हैं.


मराठी अनुवाद
 
बादशाह आणि कोंबडयामधे आहे काय सम्बन्ध?
दोघांच्या डोक्यावर 'ताज' (मुकुट) असतो.


युग बदलला- कालचा बादशाह आजचा नेता झाला आहे. नेत्याचा सम्बन्ध कुठल्या प्राण्याशी दाखविता येईल. सरडयाशी ? पहा:-
 

नेता आणि सरडा

नेता आणि सरडयामधे आहे काय सम्बन्ध?

 
सन्धी-साधू दोघ, बदलतात अपुले रंग.
 

सरडया प्रमाणे नेताही रंग (पार्टी) बदलतो. कधी तो भगवा होतो, कधी हिरवा, कधी नीळा तर कधी चक्क रंगहीन अर्थात धर्मनिरपेक्ष होतो. त्याच प्रमाणे नेत्याचा सम्बन्ध रेडयाशी दाखविता येतो:-
 

नेता आणि रेडा
 
नेता आणि रेड्यामधे आहे काय सम्बन्ध? 


ढेरपोटी दोघे  खातात 'चारा' सदैव.
(इथे 'चारा' ही दोघांतली समानता आहे).