Saturday, May 11, 2013

दोन नव्या म्हणीधन, धान्य, संपन्नता देवाच्या कृपेने मिळते, देवाला प्रसन्न करण्यासाठी ‘नवैद्य’ दाखवावाच लागतो. देवाला नवैद्य दाखविण्याच्या आधी प्रसाद भक्षण केल्याचे परिणाम वाईट होतात, देवता कुपित होते.

(१)         

आधी  नवैद्य दाखवावा
मग प्रसाद भक्षण करावा
राहे देवाची कृपा सदा.

(२)         

बेडूकांच्या भांडणात
सर्पाची मौज.  

(बेडूक कोण हे सुज्ञ वाचक ओळखतीलच) 

Saturday, May 4, 2013

क्षणिका - संस्कृति रक्षक, पेंट जीनची व कटू सत्य

]
जगात प्राणी विवस्त्रावस्थेतच येतात. मनुष्यप्राण्या खेरीज कोणी ही वस्त्र परिधान करीत नाही, तरी ही तथाकथित संस्कृति रक्षक वस्त्रात अश्लीलता शोधतात

डोक्यातली विकृती
कपड्यात शोधात
स्वत:ला म्हणवितात
संस्कृति रक्षक
मेट्रो आणि बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन, मुलींच्या पृष्ठ भागावर हात लावणे, चीकोटी घेणे, इत्यादी प्रकार घडतात, अशा वेळी जाड कपड्यांची जीनची पेंट मुलीना हिडीस स्पर्शापासुनी वाचविते.

हिडीस स्पर्शापासुनी
सदैव वाचविणारी 
रक्षक मुलींची
पेंट जीनची


ज्या समाजात स्त्रीला संपती समजून तिला परद्याआड लपविल्या जाते, तिथेस्त्री केवळ भोग वस्तू असतें, हेच कटू सत्य

तिजोरीतील लक्ष्मी
परद्यातील स्त्री
केवळ असते
भोग वस्तु.