Saturday, April 21, 2012

कांक्रीटचे जंगल


महानगर म्हणजे कांक्रीटचे जंगल. सर्व सुखसोयी असणार वन किंवा टू रूम फ्लेट. पण मुंबई- दिल्ली सारख्या 'वेगवान' महानगरात कुणालाही कुणासाठी वेळ नसतो- अगदी घरच्या माणसांसाठीही. जीवांचे नातेही इथे व्यावसायिक रित्या जगले जातात. कधी-कधी असं वाटते या सुख-सुविधांसाठीच माणूस इथे जगत असतो. इथे घंटी वाजवल्यावर ही फार वेळाने दार उघडले जाते. ए. सी. युक्त अशा फ्लेट मधे प्रवेश करताच क्षणी इथल्या नात्यातला थंडपणा जाणवतो. जिथे वाऱ्यालाही प्रवेश नाही अश्या घरांत वसंत कसा बहरेल???

कांक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.
टेबलवर सजलेला
एक उदास कैक्टस आहे.
प्रेमाचा ओलावा इथे
ए. सी.पेक्षा ही थंड़ आहे.

वसंत इथे
कधीच 'बहरत' नाही'
कारण फ्लैटचा दरवाजा
सदैव बंद असतो.

Sunday, April 8, 2012

माहेरी गेली बायको


माहेरी गेली बायको
सुखाचे दिन आले.
मित्रांसोबत पत्त्यांचे
डाव रात्रभर रंगले.

खाण्याच्या आणि पिण्याच्या
मैह्फल सजल्या.
बदनाम मुन्नी -शीलाच्या
चर्चा ही भारी पेटल्या.

एक दिवस सकाळी
बायको पुढ्यात होती.
डोळ्यात होता अंगार
हातात होते लाटणे.

तेंव्हाच मला कळले
चार दिवस सुखाचे
आता अपुले संपले.

Thursday, April 5, 2012

कवितेची समीक्षा


कवी कल्पकतेची 
गगन  भरारी.
त्यांचा नाकावरची 
माशी हलली नाही. 

त्यांचा गालावर झळकली  
रेषा एक स्मिताची.
माशी उडाली आकाशी
कविता  फालतू होती. 


समीक्षकाच्या नाकावरची माशी हलली नाही म्हणजे कविता चांगली.  समीक्षकाच्या नाकावरची माशी उडाली म्हणजे कविता फालतू .

Sunday, April 1, 2012

यात्रा / यात्रेचे फळ -प्रत्येकाच नशीबकरून दांडी यात्रा 
मोहनदास 'महात्मा' झाला.


करून जेल यात्रा 

नेताही 'मंत्री' झाला. 

 

सकाळ - संध्याकाळ
करून 'मेट्रो ' यात्रा 

विवेक पटाईत 
बाबूच राहिला.