Friday, April 19, 2013

डीओ आणि सदूची प्रेमकहाणी


विज्ञापनातल्या हिरो ने डीओ लावला
सुंदर पोरी त्याला, येउनी बिलगल्या.
सदू ने ही डीओ लावला
तिला पटवायला, चौपाटीवर आला.
डीओचा सुगंध दरवळीत, तिच्या जवळ पोहचला.
तिला होतील एलर्जी, ती पटापटा शिंकली
बहाणा करून ती, दूर निघोनी गेली.
सदूची प्रेमकहाणी, सुरु होताच  संपली.
असे कसे घडले, सदूला नाही कळले.
विवेक म्हणे सदू बाबा
भ्रमित विज्ञापने पाहुनी, 
असेच लोक बुडती.

Saturday, April 6, 2013

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिकानेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबईअनधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी  इत्यादी अश्रु  ढाळतात- त्यांना पाहून मला काय वाटते

मगर

प्रेतांच्या ढिगार्यावर
तो नोटा मोजत होता.
कधी-कधी मगर हा
अश्रु ही ढाळीत होता.


मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला
स्वप्नांची जागा भेटली.
त्यास का माहिती
ती त्याची कब्र होती.