Showing posts with label व्यंग. Show all posts
Showing posts with label व्यंग. Show all posts

Saturday, November 9, 2024

समोसे आणि व्हीआयपी समोसा


बिहार मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, " जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा हमारा लालू". ही आहे समोसेची महत्ता. माझ्या आयुष्याचा सुरवातीचा कालखंड जुन्या दिल्लीत गेला. जुन्या दिल्लीत अनेक बाजारांची नावे त्या बाजारात मिळणार्‍या वस्तूंवर आहे. आम्ही गली तेलियान मधून खाण्याचे तेल विकत घ्यायचो. बतासे वाली गल्लीत साखर, बतासे, गुड, मुरब्बा ते चॉकलेट पर्यन्त गोड पदार्थ मिळायचे. तसेच एका गल्लीचे नाव समोसे वाली गल्ली आहे. या गल्लीत विभिन्न प्रकारचे समोसे मिळतात. त्यात मुगाच्या आणि चण्याच्या डाळीचे समोसे  सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. हे समोसे काही महीने टिकतात. लोक किलोच्या भावाने  हे समोसे विकत घेतात. डाळींचे समोसे चहा सोबत मस्त लागतात. या शिवाय आजकाल लग्नात डाळींचे समोसे स्टार्टर मध्ये ही ठेवले जातात. दिल्लीत लग्नाच्या मेजवानीत किमान आठ ते दहा स्टार्टर ठेवावेच लागतात. या गल्लीतला सर्वात प्रसिद्ध समोसा मख्खन समोसा आहे. मख्खन समोसेचे कवर शुद्ध लोण्याचे असते आणि आत मध्ये मेवा भरलेला असतो. मख्खन समोसे सदैव  बर्फावर किंवा फ्रीज मध्ये ठेवावे लागतात. हिवाळ्यात या समोस्यांना खाण्याची मजा काही औरच आहे. तरीही हा व्हीआयपी समोसा नाही. 

उत्तम नगरच्या मेट्रो स्टेशन जवळ संध्याकाळी रस्त्यावर दुकान लावणारा एक विक्रेता आज ही दहा रुपयांचे पाच छोटे-छोटे समोसे विकतो. गरीब मजूर इत्यादि हे समोसे विकत घेतात. समोसा खाण्याचा शौक पूर्ण  करतात. आमच्या भागात जीवन पार्कच्या एका गल्लीत कॉर्नरवर समोसा विकणार्‍याचे दुकान आहे. याचा समोसा सारणात फक्त बटाटे, तिखट, हिरवी मिरची थोडे अमचूर आणि हिवाळ्यात कोथंबीर असते. पूर्वी दहा रुपयांत आता 15 रूपयांचा एक विकतो. तो दिवसातून किमान दोन ते तीन हजार समोसे विकतो. जुन्या दिल्लीत पूर्वी नावेल्टि सिनेमा हाल होता. कधी काळी याचा मालिक मराठी माणूस होता. व्ही शांतारामचे सर्व सिनेमे इथेच लागायचे आणि सहा-सहा महीने चालायचे. याच भागात एका हलवाईच्या दुकानात समोसे मिळायचे. हा दुकानदार उकडलेल्या बटाट्यांना मैश करून त्यात, कुटलेले धने, काळे मिरे, अनारदाना सहित अनेक मसाले टाकायचा. या शिवाय बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथंबीर, काजू, बदाम इत्यादि टाकून समोस्याचे सारण तैयार करायचा. तो हिरवी तिखट आणि खजुराची चटणी समोस्यांसोबत द्यायचा. आजही त्या दुकानातील समोस्याचा स्वाद जिभेवर आहे. पंजाबी दुकानदार समोसे थोडे वेगळे बनवितात. काही दुकानदार  समोसा सारणात बटाटे सोबत पनीर आणि मटार ही घालतात. समोसे छोले सोबत सर्व करतात. नागपुर इथे दही समोसा खाल्ला आहे. तिथले समोसे विक्रेता प्लेट मध्ये समोसा तोडून त्यात दही आणि हिरवी चटणी टाकून देतात. या शिवाय समोस्याचे अनेक प्रकार देश भरात विकले जात असतील. पण हे व्हीआयपी समोसे नाहीत.  दिल्लीच्या शेकडो सरकारी केंटीन मध्ये समोसा सर्वात जास्त विकणारा पदार्थ आहे. आज ही केंटीन मध्ये पाच ते दहा रुपयांत मिळणारा समोसा सर्वात स्वस्त पदार्थ असल्याने सरकारी बाबूंमध्ये लोकप्रिय आहे. इथे समोसा खात चहावर  होणार्‍या चर्चेत  देशाचे भविष्य ठरते, असे बाबूंना वाटते.  

समोसा हा आम जनतेचा नाश्त्याचा पदार्थ आहे. असा माझा गोड गैर समज होता. पण आता कळले समोसा ही फाईव स्टार आणि व्हीआयपी असतो. एका व्हीआयपी समोस्याची किंमत किमान दीडशे रुपये असते. हा समोसा खाण्याचा अधिकार फक्त मोठ्या लोकांना असतो. हे व्हीआयपी समोसे चुकूनही आम जनतेने खाल्ले तर त्याचे त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. असाच एक किस्सा शिमल्यात झाला. सीआयडी कार्यालयात मुख्यमंत्रीच्या नाश्त्यासाठी आलेले 21 व्हीआयपी समोसे चुकून त्यांच्याच सेक्युरिटीत असलेल्या पोलिसांच्या जवळ पोहचले. त्यांनी चहा सोबत व्हीआयपी समोसे मिटक्या मारत खाल्ले. व्हीआयपी समोसे त्यांना पचणे शक्यच नव्हते. शिपायांनी व्हीआयपी समोसे  खाणे हा मोठा गुन्हा ठरला. ह्या गुन्हाचा तपास सीआयडी ने केला. इथेही तपास रिपोर्ट लीक झाली. सीआयडी ने तपासात या घटनेला "इसे सरकार विरोधी कृत्य" म्हंटले आहे. चुकून समोसा खाणे सरकार विरोधी कृत्य? यावरून व्हीआयपी समोसा किती पावरफुल्ल असतो याची प्रचीती सर्वांनाच आली असेल. आता या  प्रकरणाचा गाजवाजा भरपूर झाल्याने, काही कर्मचार्‍यांवर राज्य सरकार निश्चित कठोर करणार. असो. 




Saturday, June 27, 2020

काही गूढ क्षणिका


लांडग्याची मैत्री केली
शेतकऱ्याला मारले
कुंपणाने असे
शेतच खाल्ले.

अमृताचे कुंभ
सागरात फेकले
देवांना चषकात
हलाहल पाजले.

 "मायेच्या" पोटी
प्रजेशी फितुरी
मढयांवर त्याने
लोणी खाल्ले.

नागाने मणी
बेडुकाला दिली
बदल्यात त्याची
पिल्ले खाल्ली.

Wednesday, July 24, 2019

श्रेय बापालाच मिळायला पाहिजे


शेठजी एका अनाथालयाच्या दौर्यावर होते. तिथे शेटजीला एक चुणचुणीत हुशार मुलगा दिसला. ते त्यामुलाला आपल्यासोबत महानगरात घेऊन आले. एका मोठ्या नामांकित शिक्षण संस्थेत त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आपल्या हुशारीने त्याने प्रथम क्रमांक पटकावला.

दीक्षांत समारोहात बोलताना त्याने आपल्या प्रगतीचे श्रेय  शेठजीला दिले. तेंव्हा हालमध्ये बसलेला एक म्हातारा उभा राहिला तो म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे. मी जर या मुलाला जन्मत: अनाथालयात सोडले नसते तर तो आज या मुक्कामी पोहचला नसता.  त्यामुळे मुलाच्या  प्रगतीचे सर्व श्रेय मला मिळाले पाहिजे शेटजीला नाही.

Wednesday, February 28, 2018

चोरी कृष्णाने केली दंड हि कृष्णाला मिळाला


न्यायाधीश, पेंद्या तुला चोरी करताना रंगे हात पकडले आहे. तू चोरी केली हे तू कबूल करतो का? न्यायाधीश महोदय, मी चोरी केली नाही. 'करता करविता स्वयं भगवान कृष्ण आहेत'.  जे घडले ते भगवंताच्या इच्छेने.  शिवाय मी रोज सकाळी भगवंताची पूजा करताना आपल्या सर्व कर्मांची फळे भगवंताला अर्पित करतो. ॐ श्री कृष्णार्पणमस्तु.  मी चोरी केली हे जरी सिद्ध होत असेल तरीही त्या चोरीची शिक्षा भगवंताला मिळाली पाहिजे मला नाही. 

न्यायाधीश म्हणाले, पेंद्या मग बोलव तुझ्या कृष्णाला. विचार तुझ्या कृत्याची शिक्षा भोगायला तो तैयार आहे का? पेंद्या उतरला, साहेब मी चोरी  केली नाही. भगवंताने केली आहे. भगवंत  नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीला येतात, ते गजेंद्रच्या मदतीला आले होते, माझ्या मदतीला का नाही येणार. न्यायाधीश म्हणाले पेंद्या एक वेळ तू म्हणतो म्हणून मान्य करतो, पण कृष्णाला   इथे बोलावणार कसे, तो तर स्वर्गात राहतो, तिथे समन पाठविता येत नाही. 

पेंद्या त्यावर म्हणाला, साहेब भगवंताच्या नावानी पुकारा करा बघ कसा धावत येईल आपल्या भक्ताच्या मदतीला. कोर्टाने भगवंताच्या नावानी पुकारा केला, भगवंत हाजीर हो. काय आश्चर्य, भगवंत साक्षात न्यायाधीश महोदया समोर उठे ठाकले. न्यायाधीश म्हणाले, तुम्ही भगवंत आहात, सर्वज्ञाती आहात. पेंद्या म्हणतो, चोरी तुम्ही केली, चोरीच्या गुन्ह्याची सजा हि  तुम्हाला मिळाली पाहिजे. पेंद्याचा आरोप  तुम्हाला मान्य आहे का? भगवंत हसत म्हणाले, मला गुन्हा स्वीकार आहे. न्यायाधीश म्हणाले, चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा  पाठीवर ५० कोडे  मारण्याची आहे. नाईलाजाने मला ती शिक्षा तुम्हाला द्यावी लागेल.  भगवंत म्हणाले, मी निराकार अविनाशी आहे, माझे हे जे रूप तुम्ही बघत आहात, आभासी आहे. माझ्या,आभासी शरीरावर कुणी कोडे मारले तर तो कोडा  माझ्या शरीरातून आरपार होऊन मारणार्यालाच लागण्याची शक्यता आहे.  सत्य हेच मला कुठला हि दंड देणे शक्य नाही. न्यायधीश महोदय म्हणाले, कायदा सुव्यवस्थित राखण्यासाठी चोराला दंड देणे गरजेचे, अन्यथा राज्यात अराजकता माजेल. आता तुम्हीच सांगा मी तुम्हाला दंड कसा देऊ. भगवंत हसत म्हणाले, मी सर्वव्यापी आहे. प्रत्येकाच्या देहात माझे वास्तव्य आहे. जे भक्त मला आपले चांगले कर्मफळ मला समर्पित करतात. त्या चांगल्या कर्मांचे फळ मी भक्तांच्या देहाच्या माध्यमाने भोगतो. माझ्या इच्छेने पेंद्याने चोरी केली. चोरीचे कर्मफळ हि मला अर्पित केले. चोरीच्या कर्माचे फळ मी पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगणार आहे.  तुम्ही पेंद्याच्या शरीराला कोडे मारण्याचे आदेश द्या, कोडे त्याला लागतील, कष्ट मला होईल.  भगवंताचे म्हणणे ऐकताच हातवारे करत पेंद्या जोरात ओरडला, भगवंता हि तर चक्क फसवणूक आहे. तुला कर्मफळ अर्पित करण्याचा फायदा काय. पण भगवंत केंव्हाच अदृश्य झाले होते. 

न्यायाधीश महोदयाने शिक्षा सुनावली. भगवंतानी चोरीचा गुन्हा कबूल केला. ते हि शिक्षा पेंद्याच्या शरीराच्या माध्यमाने भोगतील. पेंद्याला ५० कोडे मारले जावे.  

बेचारा पेंद्या त्याची चतुराई, काही कामी आली नाही. गुन्ह्याची शिक्षा त्याला भोगावी लागली.












Sunday, December 18, 2016

अग्रपूजेचा मान - भाई भतीजावादाची पहिली कथा


कालचीच गोष्ट, गल्लीतली एक मुलगी घरी आली, पेढे घेऊनच. मी विचारले पढे कसले? ती म्हणाली, काका मला नौकरी लागली.  खरंच ती मुलगी अत्यंत हुशार आहे. या आधी हि तिने  दोन-तीन वेळा लिखित परीक्षा पास केली होती. पण दरवेळी साक्षात्कार मध्ये बाद झाली.  या वेळी साक्षात्कार नव्हता. (केंद्र सरकारच्या श्रेणी ग आणि ड साक्षात्कार घेणे बंद झाले आहे, नमो कृपा आणखीन काय) लिखित परीक्षा पास होताच तिला नौकरी लागली. असो. 

नौकरी मिळविण्यासाठी, त्या नौकरीसाठी अपेक्षित असलेल्या गुणांची परीक्षा हि द्यावीच लागते.  पण या शिवाय साक्षात्कार नावाचा एक प्रकार हि असतो.  परीक्षेत पहिला क्रमांक आला तरी साक्षात्कार मध्ये कमी मार्क्स देऊन परीक्षक उम्मेद्वाराला बाद करू शकतात अर्थात करतातच. मग ती नौकरी शिक्षकाची असो, पोलीस मधली भर्ती असो किंवा इस्पितळात नर्सची नौकरी. आपल्या माणसांना अर्थात भाई आणि भतीज्यांना नौकरी देण्यासाठीच बहुधा साक्षात्कार नावाचा प्रकार आपल्या देशात रूढ झाला असावा. 

रात्रीच्या वेळी पलंगावर पडल्या-पडल्या, भाई भतीजावादाची प्रथा आपल्या देशात केंव्हा सुरु झाली असेल, हा विचार करत होतो. अचानक ती पुराणकथा डोळ्यांसमोर चमकली. 

कोणत्या देवताला अग्रपूजेचा मान मिळायला पाहिजे, या साठी परीक्षा ठेवली होती. देवाधिदेव भगवान शंकर हे परीक्षक होते. जो सर्वात कमी वेळात पृथ्वी प्रदिक्षणा करेल त्या देवताला अग्रपूजेचा मान मिळणार होता. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून पृथ्वी  प्रदिक्षणेसाठी निघाले.  पण गणेश मात्र तिथेच होता. शंकराने विचारले, गणेश, सर्व निघाले तू अजून इथेच का? तुला अग्रपूजेचा मान नको का? गणेश म्हणाला, पिताश्री, उंदिरावर बसून मी गरुडावर स्वार भगवान विष्णू  यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? कदापि शक्य नाही.  हि तर वाहनांची स्पर्धा आहे,  ज्याचे वाहन जोरात धावणार ती देवता जिंकेल. यात देवांची हुशारी काय? गणेशचे म्हणणे ऐकून शंकराची विकेटच उडाली. शंकर म्हणाले, च्यायला हे माझ्या ध्यानातच नाही आले. पण आता काही उपयोग नाही. त्यावर गणेश म्हणाला, बाबा तुम्ही मनात आणले तर मला अग्रपूजेचा मान सहज मिळू शकतो. मी इतरांसारखा मूर्ख नाही, हे आत्ताच सिद्ध केले आहे. मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कि नाही, या बाबत काही शंका असेल तर आईला विचारा. शंकराच्या नेमक्या त्या दुखात्या जखमेवर गणेशनी  बोट ठेवले होते.  चांगली गंगा डोक्यात बस्तान बांधून बसली होती आणि वामांगावर पार्वती देवी विराजमान. मस्त चालले होते. कसे काय पार्वतीला गंगेबाबत कळले. गणेशाची मदत घेऊन तिने, गंगेला दूर दक्षिणेत जायला बाध्य केले. खरे म्हणाल, शंकराला गणेशवर भारी राग होता, पण करणार काय, बायकोचा प्रिय पुत्र तो. त्याच्यावर राग काढणे शक्यच नव्हते. 

आपल्या पुत्राचे ते उपकार विसरणे पार्वतीला कदापि शक्य नव्हते. तिला राहवले नाही.  पार्वती शंकराला म्हणाली, एवढे म्हणतो आहे, तर गणेशला द्या अग्रपूजेचा मान. तुम्ही दिलेला निर्णय अमान्य करण्याची हिम्मत त्रिलोकात कुणाला हि नाही.  भगवान शंकर म्हणाले, पार्वती तुला कळत का नाही, इच्छा असूनही हि परीक्षा मी रद्द करू शकत नाही. तसे केले तर माझ्यावर भाई-भतीजावादचा आरोप लागेल. माझी इज्जत धुळीत मिळेल. 

गणेश म्हणाला, बाबा परीक्षा रद्द करायची गरज नाही.  हे बघा तुम्ही कुठे उभे आहात, पृथ्वीवरच ना.  भगवान शंकर म्हणाले, होय. मग मी तुमची प्रदिक्षणा केली म्हणजे, पृथ्वी प्रदिक्षणा हि झालीच समजा. पार्वती मैया लगेच म्हणाली, बघा  किती हुशार आहे, माझा गणेश.  आता तरी झाले ना तुमचे समाधान. गणेश, यांचा विचार बदलण्याआधी पटकन प्रदिक्षणा करून टाक.  गणेशने तत्काळ आपल्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार केला आणि उंदिरावर बसून  त्यांच्या  भोवती एक चक्कर मारला आणि हात जोडून म्हणाला.  हे भगवान शंकर, मी सर्वात आधी पृथ्वी प्रदिक्षणा पूर्ण केली, मला अग्रपूजेचा मान मिळालाच पाहिजे.  बेचारे शंकर भगवान, काय करणार त्यांनी गणपतीला अग्रपूजेचा मान दिला.  सर्व देवता पृथ्वी प्रदिक्षणाकरून दमून भागून  परत आले. त्यांना कळले, भगवान शंकरांनी त्यांच्या पुत्राला अर्थात गणेशला सर्वप्रथम पृथ्वी परिक्रमा केली म्हणोन अग्रपूजेचा मान देऊन टाकला आहे. ज्या प्रमाणे विरोधीपक्ष संसदेत गोंधळ घालतात, तसेच देवतांनी हि या विरुद्ध भारी हल्लागुल्ला केला. पण त्याच्या काही उपयोग झाला नाही. त्या दिवसापासून  भारतात भाई- भतीजावादाची सुरुवात झाली.   

Sunday, December 4, 2016

लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी


सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ  आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता.  दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे  आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची.  शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा.  पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव  काही अंशी कमी झाला असेल. 

अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का  स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता.  नव्हते  फक्त सुट्टे.  अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.

घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे.  कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती.  श्रीमंत होण्याची जाणीव झाली.  आजीने सांगितलेली एक कहाणी  आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली.  अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला.  त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच  अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण  श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो. 

रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो: 

स्वामी तिन्ही जगाचा 
आट्या बिना उपाशी. 


Sunday, November 13, 2016

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव


आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख  होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक  आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार. लाखोंची रोज उलाढाल करणारे चांदनी चौक सदर बाजारातले अधिकांश व्यापारी आयकर इत्यादी भरत नाहित. (चांदनी चौक आणि सदर बाजार देशातील सर्वात मोठे थोक व्यापारचे केंद्र आहेत). बाकी देशात हि हीच परिस्थिती आहे, ९९ टक्के थोक आणि फुटकर व्यापारी आयकर भरत नाही किंवा अत्यंत कमी भरतात (मोठे मोठे शोरूम जिथे ई-मनी स्वीकारल्या जाते, मजबूरी में काही प्रमाणात कदाचित आयकर भरत असतील). आजच्या digital युगात इमानदार व्यापारीला रोख मध्ये आर्थिक व्यवहार करण्याची गरज नाही. हजार रुपयांच्या वरची खरीदारी ई-मनी द्वारा सहज होऊ शकते. यात चोरी आणि डकैतीची भीती हि नाही. तरीही आयकर इत्यादी सरकारी कर चुकविण्यासाठीच देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोखमध्ये होतात. याचा अर्थ एकच निघतो, आपल्या देशात अधिकांश लोक कर चोरी करतात.  

देशात १४.६ लक्ष कोटी १००० आणि ५००च्या नोटा आहेत. त्यातले किमान ७-८ लक्ष कोटी रूपये  आयकर इत्यादी सरकारी कर चुकवून जमा केलेला आहे.  गेल्या ८ नोव्हेंबरला प्रधानमंत्री मोदीनी १०० अणि ५००च्या नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली.   त्या क्षणापासून बातम्या ऐकतो, आहे, जुन्या नोटांचा वापर लोक संपती कर, विजेचे आणि इतर पाणीपट्टी, संपती कर इत्यादी थकित बिले भरण्यासाठी करत आहेत.    सूरत असो वा ठाणे सर्व नगरपालिकांची तिजोरी भरत आहे. 

मनात एक प्रश्न आला, आधी या लोकांनी बिले का नाही भरली. कारण स्पष्ट आहे, सरकारी बिले भरायची नसतात. सरकारी कर कधी द्यायचा नसतो. कधी न कधी राजनेता बिल माफी देतातच (दिल्लीत आमच्या इमानदार सरकारने ४-५ हजार कोटींची वीज आणि पाणीपट्टी माफ केली). आमच्या सारखे नियमित बिले भरणारे  इमानदार मूर्ख बनले. आता नोटा रद्द झाल्या, रद्दी  कागज सरकारच्या माथी मारून बिले भरणे म्हणजे एक प्रकारची कर माफीच. काल पर्यंत ३ लक्ष कोटी रुपयांचे चलन बँकांनी बदलून दिले तरीही हि मोठ्या मोठ्या रांगा संपत नाही आहे, कारण स्पष्ट आहे. बहुतेक गरीब जनतेचे निष्क्रिय जनधन खाते मोठ्या प्रमाणात जागे झाले आहेत. कमिशन घेऊन पैसा जमा करण्याचा खेळ सुरु झाला आहे. आधार कार्डचा उपयोग गरीब जनता,  करबुडव्यांचे  दररोज  ४००० काळे रुपये (५०० रुपये कमिशन घेऊन) स्वच्छ करून देत आहेत. काही हि म्हणा गरिबांची काही कमाई तरी होत आहे. हि गोष्ट वेगळी ते अश्याप्रकारे या कर बुडव्यांना मदत करीत आहेत. छोटे- मध्यम व्यापारी आपला काळा पैसा कमिशन देऊन किंवा परिचितांना लाईनीत उभे करून पांढरा करून घेतील.  बाकी ज्यांचा तिजोरीत भरगच्च काळा पैसा आहे. त्यांना सर्व पैसा काळ्याचा पांढरा करणे संभव नाही अशेच लोक अणि कंगाल झालेले नेता आरडाओरडा करीत आहे आणि नित नव्या अफवा पसरवितआहेत. (सध्या गादीवर नाहीत, पुन्हा भरगच्च पैसा मोठ्या प्रमाणात नवीन नोटांत गोळा करणे शक्य नाही). किमान २-३ लक्ष कोटी रुपय्या अग्नीत जाळणार किंवा गंगेत बुडणार हे निश्चितच. 

आज सकाळीच एक ओळखीचा एक मित्र   भेटला, तो म्हणाला पटाईतजी कुछ भी कहो मोदीजीने देश के लोगोंको अहसास करा ही दिया की वे सब चोर हैं आणि जोरात हसला. मला ही हसू आले.   किती हि कटू असले तरी हेच आजचे सत्य आहे. 

Thursday, October 6, 2016

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण




नुकताच गेलेल्या  पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव.  नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा  मरगळलेला होता.  मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे  नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या  मुलाची तंगडी तोडणार आहे.  मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग.  चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे. 

आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला. 


टीप: ब्राम्हण  ???

Thursday, June 30, 2016

पे कमिशन

गेल्या पे कमिशनच्या वेळी किमान आठवड्याभर सरकारी केंटीन मध्ये पार्ट्या चालल्या होत्या. पण या वेळी २९.६.२०१६ला दुपारनंतर दिल्लीतल्या अधिकांश सरकारी केंटीन मध्ये शुकशुकाट होता. एवढेच नव्हे सरकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या दुकानांवर संध्याकाळी चहा-नमकीन, बिडी -सिगारेट, तंबाकू इत्यादी  खाण्यासाठी बाबू थांबलेच नाही. मेट्रो मध्ये हि कुठलीच चर्चा घडली नाही.  बहुतेक कर्मचार्यांना शॉकच लागला. ऐसी तो उम्मीद नहीं थी.  बहुतेक ८० टक्के कर्मचार्यांसाठी बुरे  दिनोंं कि सुरुवात झाली. 


कढईतल्या तेलात आज 
पकौडे नाही नाचले.

चहाच्या कपबश्या आज 
टेबलावर नाही खिदळल्या .

रंगीत बर्फी हि आज 
स्वाद हरवून  बसली. 

बाबूंच्या  नशिबी आज 
झाली बुरे दिनों कि शुरुवात. 









Wednesday, September 23, 2015

नेता


बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

त्याच्या 
एका हातात खंजीर आहे 
दुसर्या हातात 
नागाचा विषारी दंश आहे 



एका क्षणी  शिव्या देतो
दुसर्या क्षणी मधाळ बोलतो.
धृतराष्ट्री पुतळा तो
नेहमीच समोर ठेवतो. 

तो मित्र आहे कि शत्रू 
काहीच कळत नाही.
एक मात्र खरं
तो सीजर नक्कीच  नाही 
ब्रुटस असू शकतो  कदाचित्
किंवा 
  नेताहि असू शकतो.