शेठजी एका अनाथालयाच्या दौर्यावर होते. तिथे शेटजीला एक चुणचुणीत हुशार मुलगा दिसला. ते त्यामुलाला आपल्यासोबत महानगरात घेऊन आले. एका मोठ्या नामांकित शिक्षण संस्थेत त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आपल्या हुशारीने त्याने प्रथम क्रमांक पटकावला.
दीक्षांत समारोहात बोलताना त्याने आपल्या प्रगतीचे श्रेय शेठजीला दिले. तेंव्हा हालमध्ये बसलेला एक म्हातारा उभा राहिला तो म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे. मी जर या मुलाला जन्मत: अनाथालयात सोडले नसते तर तो आज या मुक्कामी पोहचला नसता. त्यामुळे मुलाच्या प्रगतीचे सर्व श्रेय मला मिळाले पाहिजे शेटजीला नाही.
No comments:
Post a Comment