Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Saturday, September 5, 2026

मी लेक आहे मुद्गलानीची





"उत् स्म वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम् ।
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ..."


रणांगणी ती प्रथम उतरली, बैल जुव्याला बांधला खंबीर,
गर्जून उठला वृषभ पराक्रमी, दुमदुमले रणांगण गंभीर।
लगाम हाती, रथ चौफेर उधळला, शत्रूचा थरकाप उडाला,
मी लेक आहे मुद्गलानीची, जिच्यामुळे विजय उजाडला॥

वारा उधळीत होता पदर, तरी वस्त्रांकडे नसे तिचे भान,
डोळ्यांसमोर एकच ध्येय, गोधनरक्षा, धर्माचा मान।
बैलाच्या गर्जेने सैन्य चेतले, शौर्याचा जळला अग्निकुंड,
मी लेक आहे मुद्गलानीची, जिने जिंकले रण अखंड॥

गोधन पुन्हा स्वधर्मी आले, दस्यूंचा झाला पूर्ण पराभव।
ऋषींनी ऋचांत अमर केली, मुद्गलानीच्या शौर्‍याची गाथा॰  
स्वाभिमानी तेजस्वी मी देश धर्म सत्यासाठी आज ही भिडते।
मी लेक आहे मुद्गलानीची, रणरागिणी त्या मातृशक्तीची.  
 

Sunday, August 2, 2026

मी लेक आहे शची पौलोमीची

 

सूर्य
उगवतो, तसे उजळते नशीब माझे,
वज्रधारी इंद्राच्याही हृदयी वास माझे।
पतीस नाही म्हटले कधी दास मी,
स्वतःच्या बळावर घडवला इतिहास मी।
 
मीच घराण्याची शोभा, मीच मस्तक आहे,
कठोर स्वभाव माझा, हा माझा दागिना आहे।
पुत्र माझे शत्रूचा फडशा उडवती,
कन्या माझी चक्रवर्ती, राज्य ती चालवती।
 
हवि भाग स्वीकारते, मनोरथ मी पुरवते,
कोणा भिवून नाही, स्वतः निर्णय मी घेते।
मुठीत नाही सत्ता, कर्तृत्वात आहे शक्ती,
वेदांनीही मानली माझी ही निष्ठा भक्ती।
 
मी लेक आहे शची पौलोमीची,
रक्तातच वाहते तिची हिंमत साची।
जे मिळाले वारशाने, तेच पुढे नेते,
स्वाभिमानाने जगणे, हेच व्रत माझे।
 
 
उदसौ सूर्य आगादुदयं मामको भगः।
अहं तद्विद्वला पतिमभ्यासाक्षि विषासहिः॥
ऋग्वेद (१०.१५९.१) (कवि:  शची पौलोमी) 

Tuesday, July 28, 2026

मी लेक आहे सार्पराज्ञीची"

 


 
रात्रीच्या त्या अंधारातून, नभाशी तिने संवाद साधला,
ताऱ्यांच्या त्या अक्षरांतून, विश्वाचा इतिहास वाचला।
 
सर्पिल त्या आकाशगंगेचा, शोध प्रथम तिनेच घेतला,
'सार्पराज्ञी' नाव लाभले, विश्वाने गौरव मान दिला।
 
"अयं गौः पृश्निरक्रमीत्…" मंत्रामधला गूढ अर्थ,
पृथ्वी फिरते सूर्याभोवती, सांगितला विज्ञानार्थ।
 
युगानुयुगे सत्य झाकोळे, तरी न विझला तिचा प्रकाश,
ऋषिकांच्या त्या तेजामधला, आजही उजळतो विश्वास।
 
तीच विश्वाची प्रथम संशोधक, प्रथम अंतरीक्ष-वैज्ञानिक,
भारतभूमीच्या कुशीत जन्मली, तेजस्विनी ती अद्वितीय।
 
तिच्या ज्ञानाचा दीप हृदयी, नित्य प्रज्वलित ठेवीन मी,
तिच्या चरणांची धूळ मस्तकी, अभिमानाने मिरवीन मी।
 
गर्व आहे मला याचा, भारतभूमी धन्य झाली;
मी लेक आहे सार्पराज्ञीची, ज्ञानज्योत जी अमर झाली।
 
तिच्या तेजाचा वारसा घेऊन, नभाला गवसणी घालीन मी;
ऋषिकन्यांच्या त्या परंपरेची, उज्ज्वल ओळख ठरेन मी।
 
(आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः। पितरंच प्रयन्त्स्व:॥
ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य (ऋ. १०/१८९/१))
 

Wednesday, June 17, 2026

वरुणा : जलदेवी


 

काळ्याकुट्ट आकाशात

कडाडल्या प्रलयंकर विजा

"आई गं!" म्हणत, ती शिरली

माऊलीच्या कुशीत.

आईच्याही नयनांतून मग,

वाहू लागल्या, गंगा-जमुनी जलधारा.

 

"आई, अशी का रडतेस?"

लेकीने हळूच विचारले,

आई म्हणाली, सांगते आज तुला,

तुझ्या जन्माचे रहस्य?   

 

असाच एक दिवस होता, उताळा होता वादळवारा,

काळ्याकुट्ट ढगांतून, कोसळत होत्या विजा,

विजांच्या त्या तांडवाने थरथरली सारी धरा,

 

"घाबरले मी, किंचाळले,

बिलगले एका काळ्या धिप्पाड पहाडाला,

कुशीत माझ्या 'चैतन्याचे दान' टाकून,

परदेशी तो निघून गेला...

 

याच माळरानावर,

एका कुमारी परित्यक्ता मातेच्या अश्रूंनी,

आणि नभाच्या बरसत्या जलधारांनी,

स्वागत केले एका 'नवांकुराचे'!"

 

लेकीने मान वर केली,

आईचे डोळे पुसत म्हणाली

"आई, जाणले मी जन्माचे रहस्य॰

 

ताठ मानेने, निर्भय नजरेने,

ढगांकडे पाहत ती उद्गारली,  

आजपासून मी आहे 'वरुणा',

वरुणदेवाची लेक, जलदेवी!"

 

बरसत्या त्या जलधारांनी,

दिला वरुणास आशीर्वाद,

वरुणदेवानेही जणू नभातून,

दिला तिच्या अस्तित्वास साद.

 

त्या दिवशी आईने लावले,

कपाळावर 'स्वाभिमानाचे' कुंकू,

जगाला ठणकावून सांगितले

"माझी लेक नाही 'मनुज-पुत्री',

ती आहे साक्षात देवपुत्री,

वरुणा- जलदेवी!"


Tuesday, June 9, 2026

काही बरणाल्या


 



मेलेल्यांनाही मिळत होता, मतदानाचा हक्क,

नावे कापून ज्ञानदेवाने दिला, मृतात्म्यांना धक्क.

 


डुप्लीकेट मते टाकून रक्षण करत होतो लोकशाहीचे

नावे कापून ज्ञानदेवाने,  गाडून टाकली लोकशाही.

 

बांगलादेशी मतदार होता, आमुचा हो आधार,

नावे कापून ज्ञानदेवाने, दूर केला हक्काचा मतदार .

 

सेंट्रल फोर्सेस आल्या, बूथ लुटू नाही दिले,

पराजय आमुचा झाला, संविधानाची हत्या झाली.  

 

गाळलेली नावे पुन्हा टाकून, बूथ आम्ही लुटणार

गुनाहगार ज्ञानदेवाला दंड आम्ही देणार.

Tuesday, June 2, 2026

“गुरुकुलांचा उजेड आणि ब्रिटीशांचा अंधार”


(ईस्ट इंडिया कंपनीने १८२०-५० दरम्यान बंगाल ( ७४% शूद्र शिकणारे, वर्धमान जिल्ह्यात 6 शिक्षक चांडाळ जातीचे) मद्रास पंजाब प्रांताच्या केलेल्या सर्व्हेवर आधारित कविता) पूर्ण लेख ब्लॉग वर आहे. )




देशात गावोगावी होते
गुरुकुल सहा लाखांहून जास्त
शिकत होते तिथे सारे
ब्राम्हण, दलित, शूद्र, स्त्री–पुरुष.
 
जगात होते सर्वात जास्त
साक्षर जनतेचे प्रमाण
ज्ञानाचा दीप उजळत होता
भारत होता शिक्षणधाम.
 
शिक्षक असो वा विद्यार्थी,
शूद्रच होते जास्त तिथे,
वैद्यकीय शिक्षणातही,
वाजत होता त्यांचा दणका!
 
मनुस्मृतीच्या नावाने
खोटी आवई उठवली
ब्रिटीशांनी बंद केले
गुरुकुल सारेच्या सारे.
 
दलितांना केले वंचित
शिक्षणाच्या हक्कापासून
हेच आहे सत्य इतिहासाचे
डोळे उघडा, तपासा दस्तावेज  
असत्यात जगणाऱ्यांनो!
 

Monday, May 11, 2026

झालमुरी: दोन हायकू

 प्रसाद नाही खाल्ला 
राज्य बुडाले 
अंगध्वजाचे .

झालमुरी  खाल्ली
राज्य मिळाले 
मोदींना.

Thursday, April 23, 2026

खोमनेईची कृपा: चुलीवरचे जेवण, गोवर्‍यांचे राशन

इराण युद्ध असेच सुरू राहिले तर: 

 

चुलीवरच्या जेवणासाठी

गरज नाही गावाला जायची।

खोमनेईच्या कृपेने आज

घरातच पेटली चूल रे।



मर्सडीज गाडीला पहा,

बैल कसे ओढतात भारी।

रुणझुण घंटा नाद ऐकू येतो,

आता पुन्हा साद देतो पुराणी।

 

गाय आणि गोबरचे राज्य

पुन्हा आले माझ्या देशा।

दुधापेक्षा गोबरला आज

भाव जास्त मिळाले बघा।

 

गोबराच्या गोवऱ्यांसाठी

सरकारी राशनचे दुकान।

लाकूडतोड्याला सापडली

आज सोन्याची कुऱ्हाड।

 

हे खोमनेईच्या कृपेचे फळ,

प्रगतीचे नवे रूप दिसले।

चूल, गोबर, बैलगाडी...

काळचक्र पुन्हा फिरले। 


 

 
 

 
गोबराच्या गोवऱ्यांसाठी आज उघडले दुकान राशांचे. लाकूडतोड्याचे भाग्य पुन्हा उजळले, मिळाली त्याला सोन्याची हो कुऱ्हाड.

Friday, April 3, 2026

ओला आणि गोळा

 




बायको रागाने म्हणाली,

"आज मी माहेरी जाणार!"

मी आनंदाने उत्तरलो,

"ओला बुक करून देतो, प्रिये,"




क्षणात तिच्या अंगात 

रणचंडी संचारली,

नेम तिचा अचूक होता  

डोक्यावर  मोठे 

टेंगुळ उमटले.

 

अंगात माझ्या कापरे भरले,

तिच्या चरणावर नाक मी घासले,

माफी मागितली, हात जोडले  

खिशाला मात्र मोठे भोक पडले!


 

Thursday, March 26, 2026

वासंतिक प्रेम

 

 

टेसूच्या ज्वाळांनी तन उजळले,
कोकिळेच्या कुहूने मन झुलले
सखी, वसंत प्रेमाचा साज घेऊन आला.

वसंताच्या वाऱ्यात उधळले रंग,
धरणीने केला शृंगार प्रेमाचा 
माझ्या मनात अलगद  
उमलली प्रेमाची कळी.
 


Monday, March 23, 2026

आजचा युगधर्म

 
दुर्योधनाच्या भव्य सभेत
कोट्यवधींची गर्दी पाहून,

गोंधळलेला अर्जुन म्हणाला—

“योगेश्वर, आता माझा धर्म कोणता?”

कृष्णानं मर्सिडीज सुरू केली,
आणि पोहोचला दुर्योधनाच्या तंबूत.

तो अर्जुनाला म्हणाला—

लोकशाहीच्या या युगात
ना सत्य, ना तप, ना त्याग
संख्या आहे विजयाची साक्ष ,
बहुमत म्हणजे धर्म 
बहुमत म्हणजे न्याय 
  
दुर्योधनाशी सौख्य 
हाच आहे आजचा युगधर्म
 


 


 

  


”

 

Thursday, August 21, 2025

ब्रेकिंग न्यूज आणि जीडीपी

 

पूर्व दिशेला सूर्य उगवला 
पश्चिमेला अस्त ही झाला.
कुठेच  काही घडले नाही 
चोरी डकैती झाली नाही 
रेप- दंगा काहीच नाही. 
 
चर्चेसाठी  मसाला नाही
तज्ञांची आता चर्चा नाही  
   ओरड-आरोप चिथावणी नाही।
  'ब्रेकिंग'चा न्यूजचा आत्माच मेला.

न्यूज एंकर, ब्रेकिंग वाले,
सारेच झाले बेरोजगार.
 स्टुडिओत उरली आता, 
फक्त स्मशान शांतता.   

टीव्ही विक्री थांबली,
लाचार झाली जीडीपी.
 शांततेच्या काळात,
देशाचा बाजारच झोपून गेला.

 


 



Wednesday, July 23, 2025

मतदानाचा हक्क आमचा

बिहार मध्ये मतदाता सूची तपासल्या गेली. आतापर्यंत यादीत 22 लाख मृतातम्यांचे नावे, 7 लाख डुप्लीकेट मतदाता सापडले.  35 लाख मतदाता दिलेल्या पत्त्यावर सापडलेच नाही. 1 लाख मतदाता कोणत्याही पत्त्यावर नव्हते.  ही संख्या एवढी मोठी आहे, की संपूर्ण राज्याची निवडणूक प्रभावित करू शकते. यावरून सुचलेल्या काही ओळी: 

मृतांच्या आत्मा 
भटकतात जिथे. 
मतदानाचा हक्क
त्यांना आहे तिथे.  

घुसखोरांचे घाम 
गळतात जिथे.  
मतदानाचा हक्क 
आहे त्यांना तिथे.  

डुप्लीकेट मतदार  
वाढवी मतदान जिथे.  
मतदानाचा हक्क  
त्यांनाही आहे तिथे. 

संविधांनाचा रक्षणे साठी
लोकतंत्र वाचविण्यासाठी
मतदान यादी बदलू नका
सरकारी तालावर नाचू नका. 

बाकी प्रत्येक निवडणूक पूर्वी मतदाता यादी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नकली मतदान निवडणूक जिंकण्याचे एक अस्त्र आहे. विशिष्ट मतदाता याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. 







Friday, July 28, 2023

विडंबनकार आणि कवी

 विडंबनकाराच्या घरी

लक्ष्मी भरते पाणी.

कवी संमेलनात मिळते

बिदागी रक्कम मोठी.


कबीर.दास बेचारा

शेला विणतो सदा.

एक वेळ जेवणाचा

हिशोब करतो सदा.

Friday, November 11, 2022

मनुवाद्यांपासून दूर तिला करा


गढ किल्ल्यांची मोहीम आखतात
सूफी संतावर गरळ ओकतात
धर्माची अफू तरुणांना पाजतात
मनुवादाचा हो प्रचार करतात.
 
शिकली सवरलेली नार ती 
उत्तम लेखिका, विदुषी ती 
नाकी नथ, कपाळी टिकली 
गुरुजींच्या पाया ती हो पडली. 

लिंब्रांडुंच्या अंगाची लाही-लाही झाली 
महाराष्ट्राची इज्जत जगी बुडाली
काळ्या जादूला बहुतेक ती भुलली
उतारा आणा, नजर तिची काढा
मनुवाद्यांपासून दूर तिला करा . 
 




Monday, July 11, 2022

ताज्या क्षणिका: महाराष्ट्राच्या राजनीतिक घटनांवर

ब्रूटस

सीजर कुणीच नव्हता 

सारेच  ब्रूटस होते. 

खंजीरीच्या पात्यांना

रक्ताची तहान होती. 

नेता 

ज्या रंगाची  शिकार 

त्या रंगाची भूषा. 

का सखी सरडा 

ना सखी नेता. 


जो पळतो तो जिंकतो 

बाजीरावाने घुडदौड केली 

निजामचा पराभव केला. 

शिंदेंनी विमानदौड केली 

उद्धवचा पराभव  केला. 

नशीब 

किती षड्यंत्र केले 

किती वेश बदलले 

नशिबी मात्र माझ्या 

फक्त मंत्रिपद आले. 

ज्ञानी 

लोक रात्री झोपतात 

ज्ञानी रात्री जागतात 

गीतेचा संदेश हा 

शिंदेंना कळला होता.  

आजचा पाऊस वेगळा होता 

आसामच्या डोंगर दर्‍यातून

मुंबईत कोसळला होता.

मर्सडीज पाण्यात बुडाली 

रिक्शा तरंगत होता. 

 

 


Tuesday, May 17, 2022

डासांचे विजय गीत

 

(दर वर्षी आम्ही 2 लाखाहून जास्त माणसांचे बळी  भारतात घेतो. ) 


शूर वीर  डास आम्ही

बांधुनि कफन डोक्यावरी 

तुटून पडतो शत्रुंवरती 

त्यांचे रक्त  पिऊनी

देतो विजयी आरोळी.

 

डेंगू मलेरियाच्या दिव्यास्त्रांनी 

करतो हल्ला माणसांवरती 

पाठवतो त्यांना यमसदनी.


घाबरून आमच्या फौजेला 

मच्छरदानीत  लपणार्‍या

भित्र्या भागुबाई  माणसांशी 

काहो करता तुलना आमुची.  


करू नका अपमान आमुचा

पावसाळा आता दूर नाही 

रक्ताची आहे भूक आम्हा

रक्त पिऊनी माणसांचे 

देऊ विजयी आरोळी.  






Monday, February 21, 2022

वसंत फुललेला सदा

 

वसंती उन्हात आज 

सृष्टी सारी न्हाली.

शीत निद्रेतून आज 

कविता ही जागली. 


साठीच्या झाडलाही 

पालवी आज फुटली 

पंचम सुरात आज 

कोकिळा ही गायली.


तिला पाहून मी 

शीळ हळूच  वाजवली. 

मला पाहून तीही 

गालातच लाजली.


वादळ वारे असो 

संसारी कष्ट अमाप 

दिसतो डोळ्यांत तिच्या   

 वसंत फुललेला सदा.  


 




 






  

 



 

 

Monday, January 3, 2022

जगण्याची कला

 तासंतास एकाच ठिकाणी 

कला  उभे राहण्याची 

आत्मसात केली  बगळ्यांनी 

फक्त जगण्यासाठी.


 कला, कौशल्य, संयम 

पुरुषर्थाची पराकाष्ठा 

आत्मसात केल्या विना 

जगू शकत नाही कुणीच 

बगुळा असो की माणूस.





Friday, December 24, 2021

मन


काही करायला जातो 

तेथे तू आडवा येतो.

शंका-कुशंकांचे  

जाळे विणून येतो. 


कुणावर विश्वास 

ठेवायचे म्हणतो.

दगाबाजीचे किस्से 

तू मला सांगतो.


मित्र-आप्त सार्‍यांना 

तू दूर-दूर केले. 

एकांती तुझ्या सोबती 

वैराण आयुष्य माझे.


करू नको आता 

काळजी तू माझी. 

खंजिरांच्या जखमा 

सहण्याची शक्ति दे.


मोकळ्या आकाशात 

श्वास मला घेऊ दे . 

आनंदानी जगण्याचा 

मार्ग मला शोधू दे.