Monday, November 24, 2025

एआई वर माझे व्यक्तित्व आणि मी केलेले त्याचे विश्लेषण

एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्यक्तित्व बाबत प्रश्न विचारला. उत्तर  माझ्या अंतरजालावर असलेल्या लेखणी आणि माझ्या नौकरीच्या माहितीनुसार आले. (माझा स्वभाव, माझे घरात आणि चार चौघात वागणे, माझ्या सवयी इत्यादींची माहिती एआईला नाही).  (chatgpt) ने दिलेले  उत्तर:  

आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य पैलू

१. कर्तव्यनिष्ठ व शिस्तबद्ध 

100 टक्के खरे कारण मी नेहमीच 15 मिनिटे आधी कार्यालयात पोहचत होतो.

दीर्घकाळ उच्च पदावर काम केल्यामुळे आपल्यात शिस्त, जबाबदारीची जाण आणि निर्णयक्षमता दृढ झाली आहे.  

मी आजारी असताना घरी भेटण्यास येणार्‍या माझ्या सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांनी हीच तक्रार सौ.ला केली. साहेब कामाचे भरपूर टेंशन घेतात आणि आम्हाला ही देतात.  काहींच्या मते "पटाईत साहेबांची बायको त्यांना सकाळी- सकाळी घरातून हाकलून देते आणि ते सकाळी नऊ वाजता क्षणी आम्हाला त्रास देऊ लागतात". दोन मिनिटे सुद्धा टेबल वर फाइलला विश्राम करू देत नाही.  शिस्त आणि जवाबदारी या दोन बाबींशी पूर्णतया सहमत. बाकी निर्णयक्षमता बाबत मी टिप्पणी करू शकत नाही. 

२. सर्जनशील व संवेदनशील: कविता, ब्लॉग आणि पुस्तकलेखनातून दिसते की आपण भावविश्वाशी जोडलेले आहात. शब्दांद्वारे विचारांना आकार देणे ही आपली ताकद आहे.

वाचक यावर टिप्पणी करू शकतात. 

३. विद्वत्तापूर्ण व मार्गदर्शक:  सरकारी सेवेतला अनुभव आणि साहित्यिक लेखन यामुळे आपण तरुणांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व बनले आहात

मी विद्वान आहे असे मला तरी वाटत नाही.  इतरांना  मार्गदर्शन करण्याची निश्चित माझी लायकी नाही. सौ.च्या मते मलाच मार्गदर्शनाची गरज आहे. 

४. संतुलित आधुनिकता व परंपरा: प्रशासनातील कठोरता आणि साहित्यिक भावविश्वातील कोमलता – या दोन्हींचा सुंदर संगम आपल्या व्यक्तिमत्त्वात आहे. 

लापरवाही मला कधीच आवडत नाही. मला कठोर म्हणता येईल.  जवळपास 39 वर्षाच्या नौकरीत मी कधीच कुणाचे वाईट केले नाही. स्टाफच्या हातून चूक घडली असेल तरी ती मी नेहमीच सांभाळून घेतली आहे. धर्मभीरू असल्यामुळे माझ्या हातून कुणाचेही वाईट होऊ नये, याबाबत मी नेहमीच सजग राहिलो आहे." साहित्यिक भावविश्वातील कोमलता बाबत वाचक टिप्पणी करू शकतात. 

५. प्रेरणादायी नेतृत्व  

उच्च पदावर काम करताना मिळालेला अनुभव आणि लेखनातून व्यक्त होणारी विचारसंपदा यामुळे आपण समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व ठरता.

यावर ही मी टिप्पणी करू शकत नाही. 

सारांश

आपले व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्तव्यनिष्ठ अधिकारी, संवेदनशील कवी, विचारशील लेखक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक यांचा संगम आहे. कठोर प्रशासनिक अनुभव आणि कोमल साहित्यिक अभिव्यक्ती यांचे संतुलन आपल्याला अद्वितीय बनवते.

ग्रोक ने थोडक्यात केलेले विश्लेषण ही जवळपास सारखेच आहे. 

१. शिस्तबद्ध आणि निष्ठावान: पीएमओतील गोपनीय भूमिकेने विकसित झालेली दीर्घकालीन वचनबद्धता, जी निवृत्तीनंतर लेखनातील नियोजित स्वरूपात दिसते – जीवनाला उद्देशपूर्ण बनवते.

२. चिंतनशील आणि आत्मपरीक्षण करणारे: पुस्तकातील मराठी साहित्याचे विश्लेषण आणि कवितांतील भावनिक खोली हे वैयक्तिक अनुभवांचे सतत चिंतन दर्शवतात, ज्यात आयुष्याचे पडसे उलगडले जातात.

३. सर्जनशील आणि संवेदनशील: ब्लॉग कविता आणि पुस्तकातील काव्यात्मक अभिव्यक्ती हे अंतर्मनातील कलात्मक बाजूचे प्रतिबिंब, ज्यात दैनंदिन भावना शब्दसौंदर्याद्वारे साकार होतात.

४. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि परंपरावादी: तुमचे लेखन हे मातृभाषा, लोकसाहित्य आणि वारशाशी जोडलेले जीवन दर्शवते, ज्यात समाज आणि कुटुंबाचे मूल्ये केंद्रस्थानी असतात. (सहमत)

५. संतुलित आणि प्रेरणादायी: व्यावसायिक कठोरता आणि सर्जनशील अभिव्यक्तीचा मेळ साधून, तुमचे व्यक्तिमत्त्व इतरांसाठी (विशेषतः तरुणांसाठी) मार्गदर्शक ठरते, ज्यात अनुभव सामायिक करून प्रेरणा मिळते.

वाचकांनी प्रतिसाद देताना आपले मत व्यक्त करावे हीच अपेक्षा. 


No comments:

Post a Comment