Showing posts with label वात्रटिका. Show all posts
Showing posts with label वात्रटिका. Show all posts

Friday, January 30, 2026

आंब्याच्या झाडवरचे सरडे

सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात.  (चाट जीपीटीच्या मदतीने बनविलेले चित्र)

 








सरकार
 बदलली तरी चेहरे जुनेच होते

टोपी बदलली तरी  नियत तीच होती.


रंग बदलणारे सरडेच   आंब्याच्या झाडावर होते.

जनतेच्या पैश्यांवरती त्यांचे डोळे खिळले होते.

Monday, November 25, 2024

इलेक्शनी चारोळ्या

 
(१)
समुंदर हूं मैं
लौटकर आऊंगा.
त्सुनामी घेऊन आला
वाहून गेले त्यांचे
स्वप्नांचे मनोरे.

(२)
चित भी मेरी
पट भी मेरी
सरडे माझे
सारे जिंकले.

(३)
शेअर बाजाराचा फंडा
त्याला कळलाच नाही.
शॉर्ट टर्म गेन साठी 
लाँग टर्म तोटा केला.









Tuesday, March 17, 2020

क्षणिका: कारोना आणि दारु


दारू लावली हाताला 
जिभेला लागली स्वादाला.
दारूने मारला कारोना 
नी स्वर्गात गेला  बेवडा.
 

Tuesday, November 5, 2019

क्षणिका : नेता आणि सरडा


आजची ताजी चारोळी 

नेत्याला पाहून सरडा
काळा ठिक्कर झाला
रंग बदलण्याची कला
विसरून तो गेला.

Monday, July 22, 2019

क्षणिका : चेहरा


 
सभ्यतेचा मुखवटा 
तार-तार फाटला 
दर्पणात  दिसला 
विद्रूप माझा चेहरा.

हडळी ने घेतले 
सोंग सुंदरीचे 
दर्पणाने दाविले 
खरे रूप तिचे.





















Monday, July 1, 2019

क्षणिका: पाऊस


पाऊस पडला
सुगंध मातीचा
दरवळला
गावात.

पाऊस पडला
दुर्गंध घाणीचा
पसरला
नगरात.  

मुंबईकरांना पहिल्या पावसाच्या दुर्गंधीचे स्वागत केले. आम्ही दिल्लीकर अजूनही  रोगराई पसरविणाऱ्या पावसाळी दुर्गंधीच्या  प्रतीक्षेत.

Monday, May 13, 2019

वात्रटिका: मला हिरा सापडला ???


नुकतीच सौ. ऋचा मायी लिखित कथा वाचली. फावल्या वेळातील बायकोचा छंद नवऱ्याला हिरा मिळवून देतो. हिरोला नेहमीच हिरा सापडतो पण माझ्या सारख्याला काय सापडेल???

बायकोचा छंद जोपासला 
मला हिरा सापडला 
अंगणी नोटांचा वर्षाव झाला.

घड्याळाचा गजर वाजला 
हिरा तत्क्षणी अदृश्य झाला 
हाती उरला फक्त कोळसा.  


Monday, November 19, 2018

वात्रटिका: बर्याच वर्षांनी मीटू भेटली.


बर्याच वर्षांनी 
मीटू भेटली
नोटीस कोर्टाची
हाती लागली.

बायको मुलांनी 
वाळीत टाकले 
वकिलाच्या द्वारी 
फिरतो एकाकी.

सौद्यात तुझाही 
झाला होता फायदा 
मग का माझ्या 
जीवावर उठली?

बर्याच वर्षांनी 
मीटू भेटली
माझ्या आयुष्याची
राखरांगोळी केली.







Thursday, November 15, 2018

दोन क्षणिका : कवी -मैफिल आणि पाहुणे



कवीला मिळाली 
कावळ्यांची साथ 
वडाच्या पारावर 
मैफिल छान.


आले पाहुणे घरी
 हुरूप आला कवीला.
पाहुनी चौपडी हाती कवीच्या
पळाले पाहुणे उलट्या पायी.

Wednesday, November 14, 2018

वात्रटिका : कवीचे नशीब




 (दिल्लीतल्या  एका कवीची व्यथा)

कवीची कांव कांव
नेत्याची खांव खांव 
एका म्यानीत 
दोन तलवार  
कवी झाला 
बेदरबार.

कवीच्या नशिबी वनवासच असतो
 
चारणाला मिळतो 
दरबारात मान 
कवीच्या नशिबी 
येतो वनवास.



Sunday, November 11, 2018

वात्रटिका: काळ कोठडीत पाठवा


बॉम्ब स्फोट करतात
जनतेला मारतात।
वसुली करतात
जनतेला मारतात।
 शिकार करतात
 जनतेला खातात।

आतंकवादी असो नक्सली
आणिक वाघीण नरभक्षी
यांना मारणार्याना
काळ कोठडीत पाठवा।







Wednesday, November 7, 2018

वात्रटिका: लक्ष्मी गेली चीनला

चाईनीज दिव्यांनी 
घर रोशन  केले.

लक्ष्मी गेली चीनला 
पूजन आम्ही केले. 



Tuesday, October 16, 2018

तीन वात्रटिका : मिटू-मिटू पोपट बोला


मिटू-मिटू पोपट बोला 
त्याला हार्ट अटेकच आला.
पाहुनी नर्स देखणी 
तो कोमातच गेला. 

विवाह्बाह्य संबंधाना  
त्याने दुजोरा दिला.

स्त्री संग एकांताचे 
फळ आता भोगा.

पोपट बोला 
मिटू मिटू.

वकील बोला 
नोटीस आला. 

पोलीस बोला 
चला सासरी.



Monday, October 8, 2018

वात्रटिका : मधुमेय इत्यादी


गोड खाता खाता 
शरीर झाले गोड 
कडू पाल्याचा रस 
प्यावा लागतो आज.

लवंगी मिरची तिखट  
खात होतो रोज 
पोटात झाला अल्सर 
बेचव खातो आज.

पित्झा बर्गर केक 
खातो होतो रोज 
हृदय रोगाच्या गोळ्या 
खाव्या लागतात आज.









Monday, September 24, 2018

वात्रटिका: पेपरलेस रिकॉर्ड रूम

 
पूर्वी सरकारी रिकार्ड रूम मध्ये उंदीर फाईल कुरतडत होते आणि वाळवी त्यांवर अंत्यक्रिया करत होती आणि आज:


कागदांच्या जागी 
हार्डडिस्क खा 
काळानुसार 
भोजन बदला.


वाळवीची जागा
वायरसने घेतली 
पेपरलेस रिकॉर्डची 
  अंत्यक्रिया केली 


Tuesday, July 31, 2018

वात्रटिका : फाटके कपडे


पूर्वी मध्यमवर्गीय रफू करून तेच कपडे पुन्हा-पुन्हा  वापरायचे. जास्ती जुने व फाटके कपडे मोलकरीणला किंवा भिकार्याला दान म्हणून देत होते. आज फाटलेले कडे माल व उच्चभ्रू शॉप मध्ये महागात विकले जातात.  त्या अनुषंगाने हि क्षणिका:


*रफू कारीगर 
झाला बेरोजगार
फाटक्या कपड्यांची 
फैशन आज आली. 


 रफू कारीगर :फाटके कपडे  दुरुस्त करणारा . 


Tuesday, June 19, 2018

दोन क्षणिका - दुधी आणि आई



दुधी 

कर्दनकाळ बीपीची 
भाजी बाजाराची राणी 
आहे आज दुधी. 

(पूर्वी दुधी भोपळ्याला बाजारात काहीच किमंत नव्हती, पण दुधीचचे औषधी महत्वामुळे आज भाव खाली पडत नाही)



आई

पोराच्या प्रेतावर हि
खात होती लोणी
आजची आई.

(पोराने आत्महत्या केली, २० लाखासाठी दुष्प्रचार करत होती एक भारतीय आई, काय म्हणावे)


Tuesday, May 8, 2018

रात्र - वात्रटिका- परिवार नियोजन



अंधाऱ्या रस्त्यावर 
एक बाईक  
स्पीड ब्रेकर वरूनी
उडाली आकाशी. 

देशाची आबादी 
कमी झाली. 
परिवार नियोजन 
झाले सफल . 


(टीप: अधिकांश तरुण बाईकस्वार सुसाट वेगाने बाईक हाकतात. रात्री बहुतेक वेळा वीज नसते, स्पीड ब्रेकर दिसत नाही. एक युवा वर गेला कि देशाची आजची आणि भविष्याची जनसंख्या कमी होणारच.) 



Thursday, April 5, 2018

वात्रटिका - म्या कवी जाहलो



आले नाही काही करता
म्हणून म्या कवी जाहलो 
शुद्ध लेखन तपासायला 
इथे परीक्षक नसतो.

Monday, March 5, 2018

क्षणिका : भांडणारी बायको



अनुभव पांढर्या केसांचा 
सांगतो तुम्हा सर्वांना 
भांडणारी बायको कधी 
सोडूनी जात नाही.


टीप:सर्व प्रकारच्या संसाराचे हे सत्य आहे.