आमच्या घरी पतंजलि टमाटो केचप येतो. महिन्यातून एकदा घरापासून 11 किमी दूर असलेल्या पतंजलि मेगास्टोर मधून महिन्याचा किराणा आणतो. टमाटो केचप ही तिथून विकत घेतो. पतंजलि टमाटो केचप मध्ये 28 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत फक्त 17 पैसे प्रति ग्राम. दुसरी कडे सर्वात जास्त विकल्या जाणार्या किसान मध्ये 14.6 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत 19 पैसे प्रति ग्राम. काही ब्रण्ड्स मध्ये तर आणखीन कमी टमाटो पेस्ट असते आणि किंमत जास्त असते. तुम्ही पण आपल्या घराचे टमाटो केचप तपासून बघा.
Tuesday, May 20, 2025
जागो ग्राहक: तुमच्या टमाटो केचप मध्ये टमाटो पेस्ट किती
आमच्या घरी पतंजलि टमाटो केचप येतो. महिन्यातून एकदा घरापासून 11 किमी दूर असलेल्या पतंजलि मेगास्टोर मधून महिन्याचा किराणा आणतो. टमाटो केचप ही तिथून विकत घेतो. पतंजलि टमाटो केचप मध्ये 28 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत फक्त 17 पैसे प्रति ग्राम. दुसरी कडे सर्वात जास्त विकल्या जाणार्या किसान मध्ये 14.6 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत 19 पैसे प्रति ग्राम. काही ब्रण्ड्स मध्ये तर आणखीन कमी टमाटो पेस्ट असते आणि किंमत जास्त असते. तुम्ही पण आपल्या घराचे टमाटो केचप तपासून बघा.
Thursday, November 30, 2023
ढाब्याच्या जेवणात कुणाचा हिस्सा ?
आपण ढाब्यात जेवतो.आपल्याला वाटते सर्व नफा हा ढाब्यावाल्याचा. पण त्या नफ्यात ही ही अनेक वाटेकरू असतात. ढाबेवाला खाण्या - पिण्याची सामग्री ज्या कंपन्यांकडून घेतो, त्यांच्या वाटा ही असतो. त्याच अनुषंगाने देशातील एका महान नेत्याने, एका भाषणात म्हटले, जेव्हा लोक ढाब्यात शंभर रुपये खर्च करतात तेव्हा दहा ते पंधरा रुपये देशातील एका उद्योगपतीच्या खिश्यात जातात. त्या महान नेत्याच्या वक्तव्यात कितपत सत्य आहे. हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला.
आधी पिण्याचे पदार्थ. चहाचे दोन मोठे ब्रँड brook bond आणि लिफ्टन हे विदेशी कंपनी युनिलिव्हर पेप्सिकोचे आहेत. देशात कॉफी नेस्लेची विकल्या जाते. सद्याची लोकप्रिय स्टारबॅग ही पण विदेशी आहे. कोल्ड ड्रिंक म्हणाल तर इथे कोक आणि पेप्सीचे राज्य आहे. अर्थात नफा विदेशात जातो त्या उद्योगपतीच्या खिश्यात नाही.
जेवणाचे म्हणाल तर महामार्गांवर पित्झा, सँडविच बर्गर विकणारे डोमिनो, केएफसी, पित्झाहट मेक., बर्गर किंग इत्यादी जागोजागी दिसतात. रस्त्यावर मिळणारी मेग्गी, केचप इत्यादी विदेशी आहेत. यांच्या ही नफा विदेशातच जाणार.
तुम्ही म्हणाल आम्ही तर ढाब्यात दाल रोटी सब्जी खातो. ढाब्यात वापरणारे खाण्याचे ७० टक्के तेल विदेशातून येते. अधिकांश खाद्य तेल विकणाऱ्या कंपन्यांचे स्वामित्व कारगिल, बंजे ऑईल, युनिलिव्हर इत्यादींचे आहे उदा.- डालडा, रथ, गिन्नी, सनफ्लावर, फारच्यून, Gemini, स्वीकार इत्यादी इत्यादी. किराण्याच्या धंद्यात ही आटा इत्यादी विकणाऱ्या विदेशी कंपन्या आहेतच.
थोडक्यात आपण खाण्या-पिण्यावर, घरात किंवा रस्त्यांवर असलेल्या ढाब्यांत जर १०० रू खर्च करतो तर अंदाजे दोन ते तीन रुपये नफा निश्चितच विदेशी कंपन्याच्या खिशात जातो. अर्थातच त्या नेत्याच्या विधानात सत्यता कमी, राजनीती जास्त होती.
देशातील पैसा देशात रहावा असे वाटत असेल तर, तर स्वदेशी किराणा विकत घ्या. स्वदेशी कंपन्यांचा पित्झा, बर्गर आणि नुडल्स खा. असो.
Friday, June 8, 2018
ग्राहक हित -मध आणि मधाचे जमणे
आपल्या देशात स्थानीय विक्रेता सुरुवातीपासून नकली मध ग्राहकांना विकत आलेले आहे. स्वाभाविकच आहे त्यामुळे ग्राहक शुद्ध मधाला मिलावटी मध समजू लागले आहे. नुकतीच घटना घ्या १०च्या शिक्या बाबत आवई उठविल्या गेल्या. लोकांनी खरे सिक्के घेणे बंद केले. आपण अफवाह वर विश्वास ठेवणारे ग्राहक. देशातील सर्व ब्रांडेड कंपन्यांचे मध हे शुद्धच असते. वेल्यू एडिशन साठी काही मिसळले असेल तर ते बाटलीवर लिहिलेले असेल. कधी काही मानवीय लापरवाही चूक झाली तर त्या निर्मात्याला भुर्दंड हि भोगावा लागतो. बाजारातून वस्तू परत हि मागवावी लागते. प्रत्येक निर्माताचा उत्पादन खर्च व नफा घेण्याचे प्रमाण, पकेजिंग (प्लास्टिक किंवा काचेची बाटली) वेग-वेगळे असते. त्या मुळे २५० ग्राम मधाची किंमत ७० ते १५० रुपये राहू शकते. वेल्यू एडिशन केलेले मध आणखीन महाग राहू शकते.
गेल्यावर्षी पासून प्रचार माध्यमात एका स्वदेशी कंपनीचे जमलेले मध दाखवून ते नकली आहे हा दुष्प्रचार जोरदार सुरु आहे. अनेक शिकलेल्या लोकांना हि जमणारे मध म्हणजे नकली असे वाटू लागले आहे.
-
आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठी “ हम दो , हमारे दो ” योजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते...
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...

