Wednesday, July 23, 2025

मतदानाचा हक्क आमचा

बिहार मध्ये मतदाता सूची तपासल्या गेली. आतापर्यंत यादीत 22 लाख मृतातम्यांचे नावे, 7 लाख डुप्लीकेट मतदाता सापडले.  35 लाख मतदाता दिलेल्या पत्त्यावर सापडलेच नाही. 1 लाख मतदाता कोणत्याही पत्त्यावर नव्हते.  ही संख्या एवढी मोठी आहे, की संपूर्ण राज्याची निवडणूक प्रभावित करू शकते. यावरून सुचलेल्या काही ओळी: 

मृतांच्या आत्मा 
भटकतात जिथे. 
मतदानाचा हक्क
त्यांना आहे तिथे.  

घुसखोरांचे घाम 
गळतात जिथे.  
मतदानाचा हक्क 
आहे त्यांना तिथे.  

डुप्लीकेट मतदार  
वाढवी मतदान जिथे.  
मतदानाचा हक्क  
त्यांनाही आहे तिथे. 

संविधांनाचा रक्षणे साठी
लोकतंत्र वाचविण्यासाठी
मतदान यादी बदलू नका
सरकारी तालावर नाचू नका. 

बाकी प्रत्येक निवडणूक पूर्वी मतदाता यादी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नकली मतदान निवडणूक जिंकण्याचे एक अस्त्र आहे. विशिष्ट मतदाता याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. 







No comments:

Post a Comment