आपरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित.
माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले. असे म्हंटताना त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी उत्तर दिले, भारताचे युद्धक विमाने पडली आणि तुला आनंद होत आहे. बाकी तात्या खरे बोलले, पाकिस्तान ने आपल्या आक्रमण करणार्या युद्धक विमानांना पाडले. वैमानिकांनी पेराशूट उघडले. ते पाकिस्तानच्या जमिनीवर उतरले. तिथून त्यांनी ओला-उबेर पकडली आणि ते भारतात परतले. तो म्हणाला, पटाईत काहीतरी बरगळू नको. मी म्हणालो, गाढवा मग काय म्हणू. विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. किमान एवढी तरी अक्कल तुला असायला पाहिजे. तू काही राजनेता नाही ज्याला असत्य प्रचार करून लोकांची मते घ्यायची आहे. काहींची इच्छा तर भारत पराजित झाला पाहिजे अशी होती. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने विडियो टाकले असते. या शिवाय भारतात शहीद होणार्या प्रत्येक सैनिकाला मानाची वंदना दिली जाते, एवढे माहीत आहे ना, तुला. आता त्याचे सूर बदलले. तो म्हणाला, मग तात्या खोटे का बोल्ले. मी उत्तर दिले, तात्या कोमात गेले आहे. किराणा हिल्स वर बहुतेक तात्यांचे आण्विक अस्त्रांचा साठा असू शकतो. भारताने किराणा हिल्स वर मिसाईल हल्ला केला नाही, असेच विधान केले असले तरी तिथल्या स्फोटांचे उपग्रह फोटो मीडियावर आहे. नंतर त्याच भागात जमिनीच्या आत अनेक भूकंप ही आले. नूरखान बेस वर ही जमिनी खाली असलेले शस्त्र भंडार ही नष्ट झाले. बहुतेक भारताने दाखविले पाकिस्तानचे अस्त्र भंडार सुरक्षित नाही. पण इथे ठेवलेले अस्त्र- शस्त्र भंडार तात्यांचे असेल तर तात्या कोमात जाणारच.
पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ एका प्रेस कोन्फ्रेंस मध्ये म्हणाले होते, ते भल्या पहाटे भारतावर हवाई हल्ला करणार होते, त्या आधीच अडीच वाजता भारताने ब्रम्होस मिसाईलने आमच्या विमानतळांवर हल्ले केले. आम्हाला प्रतिकार करण्यासाठी 30 सेकंड ही नव्हते. भारताच्या हल्ल्यात तिथल्या हवाई पट्ट्या आणि तिथे उभी असलेली अनेक विमाने नष्ट झाली. त्यांची विमाने आक्रमण करण्यासाठी तैयारी करत असल्याने त्यांची विमाने असुरक्षित होती. किमान 30-40 विमानांना निश्चित नुकसान झाले असेल, खरी संख्या काही वर्षांनी पाकिस्तान उघडी करेलच. भारता जवळ शत्रूवर पिन पॉइंट आक्रमण करण्याची क्षमता पाहून तात्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते.
नुकतेच झालेल्या इजराईल आणि इराण युद्धात हजारून जास्त किमी दूरून येणार्या मिसाईल आणि द्रोण अमेरिकेचे आधुनिक डिफेंस सिस्टम थांबवू शकले नाही. दुसरी कडे 25-50 किमी दुरून येणारे द्रोण आणि मिसाईल भारताने रोखले. ह्याचा आघात ही त्यांना जबरदस्त बसला असेल.
बाकी तात्यांप्रमाणे भारतात ही अनेकांना दारुण धक्का बसला आणि त्यांचे ही मानसिक संतुलन बिघडले. भारताने 9 आतंकी तळ उध्वस्त केले. तिथे इतके आतंकी मेले की एक आतंकी म्होरक्या म्हणाला, "आम्ही प्रेत मोजता मोजता थकून गेलो. आमचे दुख कुणाला ही कळू शकत नाही". 11 विमान तळे उध्वस्त झाल्याने पुढील वर्षभर तरी पाकिस्तान पुन्हा गडबड करू शकत नाही. एवढे नुकसान झाल्यावर पाकिस्तान ने बदला न घेता युद्धविराम स्वीकार केला अर्थात सरेंडर केले/ तरीही आपले काही नेता "भारताने सरेंडर असा शब्द प्रयोग करतात". बहुतेक पाकिस्तानच्या दारुण पराजयाचे पाकिस्तानपेक्षा त्यांनाच जास्त दु:ख झाले असावे आणि ते ही तात्या प्रमाणे बरगळू लागले.
बाकी आता भारतासोबत सर्व व्यापारीक सौदे बरोबरीच्या नात्याने करण्याची मानसिक तैयारी ही तात्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी तात्यांना कोमातून लवकर बाहेर यावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या भारताला आता कुणीही हलके घेऊ शकत नाही.
No comments:
Post a Comment