Thursday, July 17, 2025

काँवड़ यात्रेचे आर्थिक महत्व.

 

आपल्या प्राचीन ऋषींना माहीत होते, लक्ष्मी चंचल असते. जेवढ्या लवकर ती एका हातातून दुसर्‍या हातात जाईल, तेवढ्या जास्त लोकांना लक्ष्मीचा लाभ होतो. एक छोटेसे उदाहरण, एका किराणाच्या दुकानदाराला भूक लागली, त्याने 20 रु देऊन समोसा विकत घेतला. समोसा विकणार्‍याने तेच 20 रु देऊन पाव-भाव भाजी खाल्ली. पाव भाजीवाल्याने तेच 20 रु देऊन किराणाच्या दुकानदारा कडून पाव विकत घेतले. 20 रुच्या एकाच नोट ने 60 रूपयांचा धंधा केला. यालाच आर्थिक चक्र म्हणतात. हे आर्थिक चक्र जेवढ्या वेगाने फिरेल तेवढ्या जास्त लोकांना लक्ष्मीचा लाभ होतो. लोकांच्या घरात धन पडून राहिले तर आर्थिक चक्र ही फिरणार नाही. आपल्या सनातन धर्माच्या सर्व सणांचा आणि यात्रांचा उद्देश्य तिजोरीत साठलेले धनाचे वितरण समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचवून आर्थिक चक्र फिरण्याची गति वाढविणे आहे. आपले प्राचीन ऋषि मुनि हे उत्तम अर्थशास्त्री होते, असे ही म्हणता येईल.  

या वर्षी हरिद्वार मध्ये कांवड घेण्यासाठी किमान सहा ते सात कोटी लोक येणार असा अंदाज आहे. कांवड बांबूची असते आणि गंगेच्या पाण्यासाठी  प्लॅस्टिक, स्टील, पितळ इत्यादीं पासून बनलेल्या बाटल्या, घाघर इत्यादि ही कांवड मध्ये असतात. एक कांवड 500 ते 5000 रु पर्यन्तची असू शकते. एवढे लोक दोन आढवडयात हरिद्वारला येणार. ते पायी, बस, रेल्वे, कार, ट्रक, टेम्पो इत्यादि वाहनांचा वापर करून येणार. अधिकान्श 50 ते 250  किमी दूरून येतात.  काही 500 किमी दूर पर्यन्त  दुरून ही येतात. यातले अधिकान्श एक रात्र तरी हरिद्वार येथे थांबतात. इथल्या ढाबे, हॉटेल, धर्मशाळा इत्यादींना आर्थिक लाभ होतो. यानंतर कांवड घेऊन सर्व पायी त्यांच्या शहरांत/ गावी जाणार. अंदाजे एक यात्री चार दिवस पायी चालणार (हरिद्वारहून  50 ते 75 किमी चालत चार दिवसांत कांवड घेऊन यात्री दिल्ली पोहचतात) या सर्वांची राहण्याची सोय, चहा-पाणी आणि जेवणाची सोय जागो-जागी उभारलेल्या शिविरांत केली जाते. अंदाजे दरवर्षी लाखांच्या वर शिविर उभारले जातात. प्रत्येक ठिकाणी स्थानीय श्रीमंत लोक या शिविरांची व्यवस्था करतात. या शिविरांत किमान 20 ते 25 कोटी चहाचे कप, तेवढेच जेवणासाठी पानांच्या प्लेट्स, वाट्या इत्यादि लागणार. काही हजार हलवाई लागणार, जोडे चपलांच्या दुरूस्तीसाठी चांभार, डॉक्टर, मालीशवाले इत्यादि. या शिवाय शिविरात, देवांचे फोटो असतात. त्यांची पूजा होते. पूजेचे साहित्य हार, फुले धूप, दीप नैवेद्य इत्यादि ही लागतात. अधिकान्श शिविरांत भागवत कथा, जागरण होतात. त्यासाठी कथावाचक, भक्ति गीत गाणारे गायक, देवांचे सोंग घेणारे, डिजे, जनरेटर, विजेचे काम करणारे इत्यादि लोकांची गरज असते. रस्त्यात पडणारे ढाबे, चहाच्या दुकानदारांची ही कमाई होते. दूध, दही, भाजी-पाला, फळे इत्यादींची विक्रीही कांवड मार्गावर होते. स्थानीय शेतकर्‍यांना ही त्याचा लाभ होतो. 

कांवड नेणार्‍यांना ही तैयारी करावी लागते. दोन कपडे, उपरण, टॉवेल, इत्यादि ठेवण्यासाठी एक बॅग ही लागते.  सीमेंट आणि डाबर रास्ते आल्याने अधिकान्श कांवड यात्री कापडाचे जोडे किंवा चप्पल घालतात. त्या ही विकत घ्याव्या लागतात. शिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करूनच ते घरी परततात. ज्या-ज्या स्थानीय मंदिरात जलाभिषेक होतो त्या दिवशी भंडारा ही राहतो. अंदाजे एक कांवड यात्री कमीत-कमी 1000 रु यात्रेत खर्च करतो. या सर्वांचा विचार केला तर 20 ते 30 हजार कोटींचा आर्थिक व्यवहार या 15 दिवसांत निश्चित होत असेल. काही लाख लोकांना रोजगार ही या काळात मिळतो. त्यांच्या जवळ पैसा येणार आणि मग ते ही तो खर्च करणार. दुसर्‍या शब्दांत आर्थिक चक्र फिरण्याची गति वाढते आणि समाजाच्या सर्व स्तरांना त्याच्या लाभ मिळतो.

काही महाविद्वान म्हणतात, कांवड यात्रा करण्यात लोक एक आठवडा व्यर्थ करतात.  या महाविद्वान लोकांना कळत नाही  चार- पाच दिवस रस्त्यावर 50 ते 60 किमी रोज चालण्याने शारीरिक आणि मानसिक दृढता त्यांच्यात येते. परिस्थितीला न घाबरता सामोरे जाण्याची हिम्मत येते. रस्त्यात चालताना विभिन्न जाति पंथांच्या आणि वेगवेगळ्या प्रांतांच्या लोकांची भेटी गाठी होतात. शिविरांत श्रीमंत आणि गरीब एकत्र जेवतात. जमिनीवर खाली झोपतात.  यात्रेकरूंमध्ये मैत्री संबंध स्थापित होतात.  या सर्वांचा लाभ रोजगार, व्यापार आणि उद्योगात ही होतो. या शिवाय सामाजिक भेदभाव दूर करण्यात आणि आर्थिक समरसता निर्माण करण्यात अश्या यात्रांचे अनन्य महत्व  आहे. 

    

No comments:

Post a Comment