Friday, February 17, 2023

वार्तालाप: (4) आत्महत्या एक तमोगुण

 श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात: 

स्वयें आत्महत्या करणे 
तो तमोगुणl (2.6.10)

तम म्हणजे अंधार. अंधार हा निराशेचा आणि मृत्यूचा प्रतीक आहे. जगणे असंभव वाटून निराश झालेला व्यक्ति आत्महत्या करतो. भारतात पाउणे दोन लाख लोक दर वर्षी आत्महत्या करतात. त्यात 80 टक्के साक्षर असतात. 15 ते 40 वय गटात सर्वात जास्त लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचा निर्णय करणार्‍याचा असला तरीही काही आत्महत्या करणारे दुसर्‍यांवर दोष लावतात. मी मरणार पण दुसर्‍यालाही ही शांतिने जगू देणार नाही ही तमोगुणी वृती. आत्महत्येचे प्रमुख कारण प्रपंचात अयशस्वी होणे अर्थात घरातील कटकटी, शिक्षण, प्रेम भंग, रोजगार, अहंकारला ठेस लागणे इत्यादि इत्यादि. माझ्या दृष्टीने खरे कारण काम, क्रोध, निद्रा, आळस, अवास्तव अहंकार, मनात येईल तसे वागणे, माझ्या हिशोबाने जगाने चालले पाहिजे, दिवस रात्र नकारात्मक विचार करत राहणे इत्यादीं  तमोगुणांच्या आहारी जाऊन माणूस भ्रमिष्ट होतो. आजच्या भाषेत म्हणायचे तर डिप्रेशन मध्ये जातो आणि आत्महत्या करतो. त्यात सोशल आणि दृश्य मीडियात अपराध आणि आत्महत्येचे महिमा मंडन किंवा त्यावर अनावश्यक चर्चा ही तरुणांच्या मनातील नकारात्मक विचारांना उत्तेजित करते. तरुणांच्या आत्महत्येचे एक कारण शैक्षणिक संस्थामध्ये पसरलेली नकारात्मक विचारधारा. तरुणाला वाटू लागते आजच्या सामाजिक व्यवस्थेत त्याच्या सारख्या तरुणांचे शोषण होत आहे. या काल्पनिक अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ति त्यात नाही त्यापेक्षा मरणे बेहतर. अश्या नकारात्मक विचारधारेच्या आहारी जाऊन रोहित वेमुला सारखे  शिक्षित ही आत्महत्या करतात. असो.  

Tuesday, February 14, 2023

प्रेम दिन: मिठी - काही क्षण कथा


त्याने गायीला मिठी मारली. गायीने त्याला शिंगे मारली. ..... डॉक्टर काकांनी बायकोला नवी पैठणी गिफ्ट केली. प्रेमदिन साजरा केला.  

त्याने तिला मिठी मारली. तिने त्याच्या मुस्कटात मारली. हवालदार ने शिट्टी वाजवली. .....त्याच्या बापाने वकिलाची फी भरली.

त्याच्या मिठीत ती सुखावली.  ... .. अबार्शनच्या लाईनीत उभी राहिली. 

मौजेसाठी तिला घेऊन तो बगीच्यात गेला. धर्मरक्षक आले..... लग्नाच्या बेडीत अटकला.

आमच्या काळी नव्हता डे. मिठी कुणाला मारली नव्हती. खुन्नस की बोर्डवर काढली. 


Saturday, February 11, 2023

प्रपोज डे: लघु कथा

 सदू, घरी येणार होतास ना!

"जमणार नाही काका".

का बरे?

"काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज  केले."

वा! छान, पुढे काय ...

"तिच्या सोबत डॉगी होता."   

(त्याने फोन ठेवला) 


Sunday, February 5, 2023

ऋग्वेद:: प्राण रूपी औषधी आणि कमांडो तेवतिया


द्वाविमौ वातौ वात  सिन्धोरा परावत 
दक्षं ते अन्य  वातु परान्यो वातु यद्रप (.१३७.१०..)

 वात वाहि भेषजं वि वात वाहि यद्रप: 
त्वं हि विश्वभेषजो देवानां दूत ईयसे  ( १३७.१०.)

ऋग्वेदात प्राणाला औषधी म्हंटले आहे. प्राणरूपी वायु श्वासाच्या रूपात हृदयात प्रवेश करून जीवनदायनी शक्ति वाढविते आणि प्रश्वासरूपी वायु रोगांना शरीरातून बाहेर काढते. वायु ही देवतांची औषधीरूपी दूत आहे.  नियमित  प्राणायाम केल्याने शरीरातील क्षतिग्रस्त कोशिका ही पुनर्जीवित होतात. माणसाला नवजीवन मिळते. अधिकान्श रोगांपासून सहज मुक्ति मिळते.  


याचेच एक उदाहरण. २६ नोव्हेंबर २००८ रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पाकिस्तनी आयएसआय प्रायोजित आतंकी हल्ला झाला. ताज हॉटेल वर ही हा हल्ला झाला होता. त्यावेळी मरीन कमांडो प्रवीण तेवतियांनी ३ दशहतवाद्यांना कंठस्नान घातले आणि ताज हॉटेलमध्ये असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडानी आणि चार सांसद सहित १५०हून जास्त लोकांचे प्राण वाचविले. पण लोकांना वाचविताना  प्रवीण तेवतियाला पाच गोळ्या लागल्या. त्यांची फुफ्फुसे निकामी झाली.  सरकारने शौर्यचक्र देऊन प्रवीणचा सम्मान केले.   

गेल्या 26 नोव्हेंबर 2022ला सकाळी आस्था चॅनल लावले होते. कमांडो प्रवीण तेवतिया बाबा रामदेव सोबत मंचावर बसले होते.  प्रवीण तेवतियांच्या शब्दांत -  हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देण्यात ते यशस्वी ठरले. पण क्षतिग्रस्त फुफ्फुस्सांमुळे त्यांना 25 पावले ही चालणे शक्य होत नव्हते. डॉक्टरांचे मत होते आता भविष्यात त्यांना धावणे आणि पोहणे शक्य नाही. अश्या वेळी रोज सकाळी पाच वाजता उठून स्वामी रामदेव यांना आस्था वर पाहून योग आणि प्राणायाम सुरू केले. काही मिंनिटांपासून सुरू करून ते रोज चार-चार तास प्राणायाम करू लागले. परिणाम त्यांनी 2012 पुन्हा धावणे सुरू केले. 2015 पहिल्यांदा मुंबईत अर्ध मेराथन पूर्ण केली. नंतर पूर्ण मेराथन ही  पूर्ण केली. 2017मध्ये प्रवीण तेवतिया निवृत झाले. 2018 मध्ये प्रवीणने दक्षिण आफ्रिकेत आयरनमेन प्रतियोगिता पूर्ण  केली  ज्यात  3.86 किमी  समुद्रात पोहणे, 180 किमी सायकल चालविणे आणि  42 किमी धावणे असते.  आज ही ते रोज 1 एक तास प्राणायाम, एक तास इतर व्यायाम करतात आणि दहा किमी धावतात. हाच किस्सा पाहताना मला ऋग्वेदातील वरील ऋचांचे स्मरण झाले. प्राणायाम रूपी औषधी आपल्याला निशुल्क उपलब्ध आहे तरीही आपला त्यावर विश्वास नाही, हेच दुर्दैव. सहज मनात विचार आला, अनंत अंबानी यांनी स्टओराइड घेण्या एवजी प्राणायाम केले असते तर त्यांचे वजन पुन्हा वाढले नसते.  असो. 


(2) फेफड़े (Lung) की समस्या को योग से कैसे मरीन कमांडो प्रवीण तेवतिया ने किया ठीक || Swami Ramdev - YouTube