Wednesday, November 28, 2018

क्षणिका : प्रवास



भिजलेल्या शब्दांचा 
संवाद दोन तटांचा
प्रवास समुद्र पर्यंतचा
वेगळा वेगळा.


  




Tuesday, November 27, 2018

क्षणिका: देहाचा सुगंध


देहाच्या सुगंधात
प्रेमाला शोधले
हृदयात फ़क्त
काटेच रुतले।

Monday, November 26, 2018

लघु कथा: उंदीरांच्या राज्यात


उंदीरांच्या देशात, मांजर होती महाराणी. तिच्या जवळ होता परवाना. उंदीरांना मारण्याचा. उंदीरांना खाण्याचा. रोज एखाद-दुसरा उंदीर मांजरीचा पोटात जायचा. रोज होणारा उंदीरांचा संहार बघून सर्व उंदीर वैतागले. एक दिवस मांजर झोपली असताना सर्व उंदीरांनी मिळून मांजरीच्या गळ्यात घंटी बांधली. घंटीचा आवाज ऐकून उंदीर पसार व्हायचे. शेवटी उपासमार होऊन मांजर मरण पावली. उंदीरांनी जल्लोष केला. 
 
आता उंदीरांचे राज्य आले. तरीही परिस्थिती बदलली नाही. रोज एखाद-दुसऱ्या उंदीराचा जीव जायचा. कारण आता उंदीरांच्या राज्यात उंदीरच उंदीरांना मारू लागले होते. 


Sunday, November 25, 2018

क्षणिका: सुगंध मातीचा


सुगंध पान गळतीचा
रोमरोमात भिनला।
पाश मायेचा 
सहज तुटला।

Saturday, November 24, 2018

वात्रटिका: तालिबानी राज्य आले

आज सकाळी
सोनेरी उषा
आंगणात प्रगटली
काळा बुरखा घालुनी
मला वाटले देशात
तालिबानी राज्य आले।

Tuesday, November 20, 2018

ग्राहक संगठन/कार्यकर्त्यांचा एक चेहरा असा हि


सिविल सप्लाय मंत्रालयात कार्यरत होतो. सन १९८५ एक अवर सचिव, त्यांचा स्टेनो अर्थात मी, एक उपनिदेशक त्यांचे नाव आणि एक लिपिक. मंत्रालयात ग्राहक सुरक्षा एककची स्थापना झाली. उपभोक्ता संरक्षण कायद्याची निर्मिती सुरु झाली. उपभोक्ता संगठन, सरकारी विभाग, व्यवसायिक संगठन व सामान्य जनतेची मते हि विचारार्थ घेतली. शेवटी एक राष्ट्रीयस्तरावर संमेलन घेतले. संमेलनात मसौद्यावर  चर्चा झाली. अनेक उपभोक्ता प्रतिनिधींनी आपले मत मांडले. अखेर २४ डिसेंबर १९८६ मध्य  उपभोक्ता कायदा झाला. 

उपभोक्ता कायद्याचा लाभ जनतेला मिळू लागला. साहजिकच आहे, लोक फोनवर धन्यवाद हि देणारच. एकदा असाच फोन आला, समोर पांढर्या केस वाले  हि बसले होते. प्रशंसा करणारे फोन ऐकल्यावर छाती ५६ इंचाची होणारच. मी ला म्हणालो हा कायदा होण्यास सरकार सोबत उपभोक्ता संगठनांचे हि महत्वपूर्ण योगदान आहे. काहींचे नाव हि घेतले. म्हणाले, तू बच्चा आहे. सरकारला कायदा करायचा होता म्हणून झाला. बाकी हे आंग्लभाषेत गिटीरपिटीर करणारे उपभोक्ता कार्यकर्ता त्या भागातल्या दल्ल्यापेक्षाही गेलेगुजरे आहेत. मला थोडा रागच आला, मी म्हणालो सर हे जरा जास्ती होत आहे. आता काळ बदलला आहे, विचार हि बदलले आहेत. माझ्या डोक्यावर हात फिरवीत म्हणाले, नादान बच्चा चिंता करू नको, लवकरच यांचे खरे स्वरूप तुला कळेल.

उपभोक्ता कायद्याच्या अंतर्गत उपभोक्ता संरक्षणासाठी एक केंद्रीय समितीचे गठन हि झाले. सरकारी अधिकारी, उपभोक्ता कार्यकर्ते, व्यवसायिक संठनांचे प्रतिनिधी इत्यादी. उपभोक्ता कायद्यात काही न्यूनता आहे, त्या दूर केल्या पाहिजे असे समितीचे मत झाले. कायद्याच्या दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय उपभोक्ता समितीची एक बैठक झाली. 

त्या बैठकीत राष्ट्रीयस्तर प्रसिद्ध एका उपभोक्ता कार्यकर्ताने बोलणे सुरु केले. त्यांनी एक गोष्ट सांगितली मला जेवढे आठवते त्यानुसार "एका विधवा बाईने सिलाई मशीन (शिवणयंत्र) विकत घेतली. त्यावर कपडे शिवून ती गुजाराण करीत होती. ती सिलाई मशीन खराब झाली. तिने ग्राहक आयोगात तक्रार केली. कंपनीने उत्तर दिले,  हि बाई  सिलाई मशीनचा व्यवसायिक उपयोग करत आहे. अत: हिची केस उपभोक्ता कायद्या अंतर्गत येत नाही. न्यायालयाला हि कंपनीची बाजू पटली. त्या बाईला उपभोक्ता कायद्या अंतर्गत न्याय मिळाला नाही." त्यांनी पुढे म्हंटले कायद्यात सुधार करून स्व:रोजगारासाठी घेतलेली "पूंजीगत वस्तू" कायद्या अंतर्गत आणिली पाहिजे. अधिकांश उपभोक्ता कार्यकर्त्यांनी तोच कित्ता गिरविला. दीड वाजता जेवणाची वेळ झाली. जेवताना माझ्याजवळ आले आणि विचारले काय पटाईत काही कळले का? मी उतरलो, हो तूर्त तरी मला जबरदस्त धक्का बसला आहे. उपभोक्ता कायद्यात हि दुरुस्ती झाली तर खर्या ग्राहकांना न्याय मिळायला उशीर होईल. 

उपभोक्ता कायद्याची दुरुस्ती करण्यासाठी प. बंगालच्या मंत्र्याच्या अध्यक्षाखाली एक समिती बनली. त्यात नामी उपभोक्ता कार्यकर्ता, व्यवसायिक संगठनांचे प्रतिनिधी इत्यादी होते. तरीही स्वरोजगारासाठी घेतलेली पूंजीगत वस्तू ग्राहक कायद्या अंतर्गत आली. आता उपभोक्ता आयोगाचे स्वरूप बदलले. ग्राहकांसोबत, उद्योगपती हि न्यायासाठी या कायद्याचा वापर करू लागले. वकिलांची फौज आता जिला फोरमच्या समोर दिसू लागली. स्वभाविकच  होते सामान्य ग्राहकांना न्याय मिळायला उशीर होऊ लागला. व्यवसायिक संगठनांचा उद्देश्य सफल झाला. 

त्यानंतर बहुतेक वर्षभरा नंतरची गोष्ट, एक फोन आला. तो व्यक्ती ऑफसेट प्रिटींग मशिन बनविणारा होता. एका ग्राहकाला त्याने तीन महिन्यात मशीन डिलिवरीचे वचन दिले होते. पण उन्हाळ्यातील वीज कपात, काही औद्योगिक क्षेत्रात हडताल इत्यादी. मशीनींचे काही पुर्जे मिळायला उशीर झाला. तो म्हणाला आम्ही मशीन सोबत ऑपरेटरला हि ट्रेनिंग देतो. ग्राहकाला वेळोवेळी कल्पना हि दिली. त्यानी कुणालाही ट्रेनिंग साठी पाठविले नाही किंवा ऑर्डर हि रद्द केला नाही. ग्राहकाला उशिराने डिलिवरी दिली. ग्राहकाने डिलिवरी घेतली नाही व उपभोक्ता आयोगात केस टाकली. त्याने विचारले ऑफसेट प्रिंटींग मशीन केंव्हा पासून उपभोक्ता कायद्यात येते. मी उत्तर दिले, स्वरोजगारसाठी घेतलेली प्रत्येक वस्तू या कायद्या अंतर्गत येते. तो रागाने म्हणाला, मी हि स्वरोजगारसाठीच मशीन बनवितो. मशीनचे स्पेअरपार्टस अनेक उत्पादकांकडून येतात. मी पण उपभोक्ता आयोगात जाऊ शकतो का? मी उत्तर दिले सर, हा तुमचा प्रश्न आहेत. तो शिव्या देत रागाने बडबडू लागला. अश्या वेळी मी फोन कधीच कापत नाही. कापला तर बहुतेक असे लोक पुन्हा फोन करतात. त्यापेक्षा एकदा शांतीने त्यांचे गरळ एकून घेणे जास्त रास्त. त्याच्या म्हणण्याचा तात्पर्य एवढाच होता. दिल्लीत सर्व मूर्ख आणि गाढव बसलेले आहेत, जे असे कायदे बनवितात. बाकी सर्व कायदे रद्द करून हा एकच कायदा वस्तू-खरीदी विक्रीसाठी ठेवा. अखेर त्याने फोन ठेवला. शेजारीच सिपाही उभा होता, तो म्हणाला साब वो आदमी गुस्से में गालीयाँ दे रहा था क्या? मुझे भी सुनाई दे रही थी. मी उतरलो हा फक्त शिव्या देत होता, मला तर त्या दल्ल्याला चाबकाने फोडायची इच्छा होत आहे. सिपाही म्हणाला, साब, बायको मुलांचा विचार करा.  मी एक कप काॅफी आणतो, डोक थंड होईल.

सारांश, उपभोक्ता कायदा हा एक संकुचित कायदा होता, ज्याचा मुख्य उद्देश्य सामान्य ग्राहकांना न्याय देणे हा होता. पण कायद्याचे क्षेत्र वाढल्यामुळे ग्राहकांना न्याय मिळायला उशीर होऊ लागला. हा आहे अधिकांश उपभोक्ता संगठन व कार्यकर्त्यांचा खरा चेहरा.


Monday, November 19, 2018

वात्रटिका: बर्याच वर्षांनी मीटू भेटली.


बर्याच वर्षांनी 
मीटू भेटली
नोटीस कोर्टाची
हाती लागली.

बायको मुलांनी 
वाळीत टाकले 
वकिलाच्या द्वारी 
फिरतो एकाकी.

सौद्यात तुझाही 
झाला होता फायदा 
मग का माझ्या 
जीवावर उठली?

बर्याच वर्षांनी 
मीटू भेटली
माझ्या आयुष्याची
राखरांगोळी केली.







Friday, November 16, 2018

खरा इतिहास : वाल्मिकी/महार समुदाय हा पूर्वीचा क्षत्रिय



(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी  मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो).

हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला. तिथे एक शाळेचे शिक्षक बसले होते, ते म्हणाले हिमाचल मध्ये मुगल आले नाही. म्हणून वाल्मिकी समुदाय हि नाही.  हिमाचल येथे वाल्मिकी समुदाय गेल्या २०० वर्षांत बहुतेक ब्रिटीश लोकांकडे शौचालाय स्वच्छ करण्यासाठी आला आणि इथलाच बनला. मुगल येण्याआधी 'शौचालय साफ करण्याचे कार्य' करणारी कुठलीही जाती भारतात अस्तित्वात नव्हती. 

मुगल येण्याच्या पूर्वी आपल्या देशात सकाळी शौचेसाठी लोक जंगलात अथवा दिशा मैदानात जात होते. घरात शौचालय बांधण्याची पद्धत नव्हती. वेद, रामायण, महाभारत किंवा संकृत भाषेतील नाटक, कादंबरी इतकेच नव्हे मनुस्मृतीत 'साफ सफाई' करणाऱ्या कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. घरची साफसफाई गृहणी करायची आणि राजमहाल इत्यादी ठिकाणी सेवेसाठी सूतपुत्र (राजाची इतर स्त्रियांपासून झालेल्या संतान) होतेच. सैनिक पासून ते मंत्री, रथचालका पासून ते कथा वाचणारे, राज वंशाचे चरित्र सांगणारे सूतच होते. त्यांना अस्पृश्य वागणूक मिळत हि नव्हती.  मग प्रश्न येतो वाल्मिकी  समुदाय आला कुठून. 

मी दिल्लीत बिंदापूर एक्स. येथे राहतो. पूर्वी गावाच्या बाहेर (अर्थात आज एक कोलोनी आहे). हरिजन बस्ती होती. ३० वर्षांपूर्वी बिंदापूर एक्स. कॉलोनी बनल्यावर, कोलोनीच्या सफाईची ठेका सोनू नावाच्या तरुणाने आपल्या नावावर करून घेतला अर्थात स्थानीय नेत्याला पटवून. सध्या सोनुच्या खाली काही कर्मचारी हि कार्य करतात. हरिजन कोलोनीत पंवार, चौहान, वर्मा, सोलंकी, पाल इत्यादी आडनावांच्या पाट्या दिसतात. हि सर्व नावे राजपूत अर्थात क्षत्रियांत आहे. महिना-दोन महिन्यातून घराच्या मागच्या नालीतून गाळ, कचरा इत्यादी काढावा लागतो. माझ्या घरी हातपाय धुवायला पाणी आणि  चहा हि त्याला मिळतो. एकदा बोलताना तो सहज म्हणाला, इतर जातीतले लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाही. चहा हि वेगळ्या कपात देतात. साहेब तुम्ही या भागातले नाही, म्हणून चांगली वागणूक देतात. पण आमचे पूर्वज हि राजपूत होते. त्या काळात युद्धात पराजित राजपूतान्जवळ तीनच पर्याय रहात होते, एक मृत्यूला स्वीकार करणे, धर्म बदलणे किंवा मुगलांची शौच साफ करणे. आमच्या पूर्वजांनी हा तिसरा मार्ग स्वीकारला, पण धर्म बदलला नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत.

पश्चिम दिशेतून येणारे लोक वाळवंटात राहणारे. तिथे दिशा मैदान, तलाव इत्यादी नव्हते. शौच घरातच करायचे. गुलाम लोक ती साफ करायचे. भारतात जाती व्यवस्था होती. प्रत्येक जाती स्वत:चे पारंपारिक कार्य करणारी. इस्लाम कबूल केले तरी ते त्यांचे पारंपारिक कार्यच करणार. मग पराजित क्षत्रियांना या कामावर जुंपले. पुढे मुगलांची घरात शौचालय बांधण्याची पद्धत संपूर्ण भारतात पसरली. राजा महाराजा, जमीनदार, समाजातील प्रतिष्ठीत लोक घरात शौचालय बांधू लागले आणि वाल्मिकी समुदाय विभिन्न नावांनी देशभर पसरला. 

महाराष्ट्रात हि पाहाल तर इतर समुदायांची आडनावे महारांत आहेत. ज्या भागांत मुगलांचे जास्त वर्चस्व होते, त्या भागात वाल्मिकी समुदाय हि मोठ्या प्रमाणात आढळेल. देशातील दुर्गम भागात जिथे मुगल पोहचले नाही तिथे वाल्मिकी समुदाय आढळणार नाही. 

उत्तर भारतीय ते दक्षिण भारतीय सर्वांचे डीएनए एक असले तरी हि स्वत:ची राजनीतिक पोळी शेकण्यासाठी इतिहासाच्या नावावर थोतांड पसरविण्याचे गेल्या काहीं वर्षांत जोमात सुरु आहे. ते थांबविण्यासाठी वाल्मिकी समाजाला पुन्हा भारतीय समाजात मानाचे स्थान देणे काळाची गरज आहे.

Thursday, November 15, 2018

दोन क्षणिका : कवी -मैफिल आणि पाहुणे



कवीला मिळाली 
कावळ्यांची साथ 
वडाच्या पारावर 
मैफिल छान.


आले पाहुणे घरी
 हुरूप आला कवीला.
पाहुनी चौपडी हाती कवीच्या
पळाले पाहुणे उलट्या पायी.

Wednesday, November 14, 2018

वात्रटिका : कवीचे नशीब




 (दिल्लीतल्या  एका कवीची व्यथा)

कवीची कांव कांव
नेत्याची खांव खांव 
एका म्यानीत 
दोन तलवार  
कवी झाला 
बेदरबार.

कवीच्या नशिबी वनवासच असतो
 
चारणाला मिळतो 
दरबारात मान 
कवीच्या नशिबी 
येतो वनवास.



Tuesday, November 13, 2018

हायकू: दिल्लीतील वारा आणि यमाचा चेहरा



दिल्लीतील वारा
विषाहून विखार  
जणू यमाचा पाश.

काळ्या-कुट्ट स्मागात 
दिसला यमाचा चेहरा 
कंठाशी आला प्राण.

Sunday, November 11, 2018

वात्रटिका: काळ कोठडीत पाठवा


बॉम्ब स्फोट करतात
जनतेला मारतात।
वसुली करतात
जनतेला मारतात।
 शिकार करतात
 जनतेला खातात।

आतंकवादी असो नक्सली
आणिक वाघीण नरभक्षी
यांना मारणार्याना
काळ कोठडीत पाठवा।







Thursday, November 8, 2018

वात्रटिका: कोल्होबाची ढुंगोली जळाली


नोट बंदीचा दिवस आठवला 

काळ्या रातीत 
काळी जळाली
कोल्होबाची 
ढुंगोली जळाली.

Wednesday, November 7, 2018

वात्रटिका: लक्ष्मी गेली चीनला

चाईनीज दिव्यांनी 
घर रोशन  केले.

लक्ष्मी गेली चीनला 
पूजन आम्ही केले. 



Thursday, November 1, 2018

क्षणिका - समुद्राचे गुपित



विरही समुद्राचे
खारे-खारे अश्रू 
मेघांच्या पाऊस
गोडं-गोड.

धरती समुद्राचे 
गुपित जाणले 
प्रेमाचे तराणे 
कवीने गायले.