(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो).
हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला. तिथे एक शाळेचे शिक्षक बसले होते, ते म्हणाले हिमाचल मध्ये मुगल आले नाही. म्हणून वाल्मिकी समुदाय हि नाही. हिमाचल येथे वाल्मिकी समुदाय गेल्या २०० वर्षांत बहुतेक ब्रिटीश लोकांकडे शौचालाय स्वच्छ करण्यासाठी आला आणि इथलाच बनला. मुगल येण्याआधी 'शौचालय साफ करण्याचे कार्य' करणारी कुठलीही जाती भारतात अस्तित्वात नव्हती.
मुगल येण्याच्या पूर्वी आपल्या देशात सकाळी शौचेसाठी लोक जंगलात अथवा दिशा मैदानात जात होते. घरात शौचालय बांधण्याची पद्धत नव्हती. वेद, रामायण, महाभारत किंवा संकृत भाषेतील नाटक, कादंबरी इतकेच नव्हे मनुस्मृतीत 'साफ सफाई' करणाऱ्या कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. घरची साफसफाई गृहणी करायची आणि राजमहाल इत्यादी ठिकाणी सेवेसाठी सूतपुत्र (राजाची इतर स्त्रियांपासून झालेल्या संतान) होतेच. सैनिक पासून ते मंत्री, रथचालका पासून ते कथा वाचणारे, राज वंशाचे चरित्र सांगणारे सूतच होते. त्यांना अस्पृश्य वागणूक मिळत हि नव्हती. मग प्रश्न येतो वाल्मिकी समुदाय आला कुठून.
मी दिल्लीत बिंदापूर एक्स. येथे राहतो. पूर्वी गावाच्या बाहेर (अर्थात आज एक कोलोनी आहे). हरिजन बस्ती होती. ३० वर्षांपूर्वी बिंदापूर एक्स. कॉलोनी बनल्यावर, कोलोनीच्या सफाईची ठेका सोनू नावाच्या तरुणाने आपल्या नावावर करून घेतला अर्थात स्थानीय नेत्याला पटवून. सध्या सोनुच्या खाली काही कर्मचारी हि कार्य करतात. हरिजन कोलोनीत पंवार, चौहान, वर्मा, सोलंकी, पाल इत्यादी आडनावांच्या पाट्या दिसतात. हि सर्व नावे राजपूत अर्थात क्षत्रियांत आहे. महिना-दोन महिन्यातून घराच्या मागच्या नालीतून गाळ, कचरा इत्यादी काढावा लागतो. माझ्या घरी हातपाय धुवायला पाणी आणि चहा हि त्याला मिळतो. एकदा बोलताना तो सहज म्हणाला, इतर जातीतले लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाही. चहा हि वेगळ्या कपात देतात. साहेब तुम्ही या भागातले नाही, म्हणून चांगली वागणूक देतात. पण आमचे पूर्वज हि राजपूत होते. त्या काळात युद्धात पराजित राजपूतान्जवळ तीनच पर्याय रहात होते, एक मृत्यूला स्वीकार करणे, धर्म बदलणे किंवा मुगलांची शौच साफ करणे. आमच्या पूर्वजांनी हा तिसरा मार्ग स्वीकारला, पण धर्म बदलला नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत.
पश्चिम दिशेतून येणारे लोक वाळवंटात राहणारे. तिथे दिशा मैदान, तलाव इत्यादी नव्हते. शौच घरातच करायचे. गुलाम लोक ती साफ करायचे. भारतात जाती व्यवस्था होती. प्रत्येक जाती स्वत:चे पारंपारिक कार्य करणारी. इस्लाम कबूल केले तरी ते त्यांचे पारंपारिक कार्यच करणार. मग पराजित क्षत्रियांना या कामावर जुंपले. पुढे मुगलांची घरात शौचालय बांधण्याची पद्धत संपूर्ण भारतात पसरली. राजा महाराजा, जमीनदार, समाजातील प्रतिष्ठीत लोक घरात शौचालय बांधू लागले आणि वाल्मिकी समुदाय विभिन्न नावांनी देशभर पसरला.
महाराष्ट्रात हि पाहाल तर इतर समुदायांची आडनावे महारांत आहेत. ज्या भागांत मुगलांचे जास्त वर्चस्व होते, त्या भागात वाल्मिकी समुदाय हि मोठ्या प्रमाणात आढळेल. देशातील दुर्गम भागात जिथे मुगल पोहचले नाही तिथे वाल्मिकी समुदाय आढळणार नाही.
उत्तर भारतीय ते दक्षिण भारतीय सर्वांचे डीएनए एक असले तरी हि स्वत:ची राजनीतिक पोळी शेकण्यासाठी इतिहासाच्या नावावर थोतांड पसरविण्याचे गेल्या काहीं वर्षांत जोमात सुरु आहे. ते थांबविण्यासाठी वाल्मिकी समाजाला पुन्हा भारतीय समाजात मानाचे स्थान देणे काळाची गरज आहे.
No comments:
Post a Comment