Monday, March 28, 2011

प्रेम द्रव्य


आयुष्यभर त्याने प्रेमाचा शोध घेतला,
तरीही तो कोरडाच राहीला.
वर्तुळाचे दुसरे टोक सापडले आहे का
कधी कुणाला?

मोह-माया व वासनेच्या भोवऱ्यातच
दडलेला आहे, प्रेमाचा अथांग महासागर.
गरज आहे फक्त
अहंकाराने ग्रासलेल्या हृदयांतील
बंद कपाटे उघडण्याची.

प्रेमाच्या उजेडात दिसेल
जल-थल-नभ व संपूर्ण चराचर सृष्टीत
व्याप्त आहे फक्त एकच प्रेम दृव्य.

Friday, March 25, 2011

सांसद आणि नोट


आपल्या लोकतंत्राची विडम्बना-  अखेर 'नोट' हीच विजेता ठरते.   

संसदेतल्य़ा भिंतीही
देतात ग्वाही.
'नोट' देऊन सांसद बनतो
'नोट' खाऊन सांसद जगतो. 


Tuesday, March 22, 2011

बंद दरवाजा / मराठी कविता


दिल्ली, मुंबई सारखे महानगर, स्वत:चा विचार करणारे स्वार्थी जीव मग प्रेमाचा वसंत कसा बहरेल कारण हृदयांची कपाटे फ्लेटचा दरवाजा सारखे सदैव बंद असतात. 

कॉंक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.

टेबलवर सजलेला इथे
एक उदास कैक्टस आहे.

स्वार्थी संबंधाना इथे 
बाभळीचे काटे आहे.

प्रेमाचा वसंत इथे
कधीच   'बहरत' नाही.

फ्लैटचा दरवाजा इथे
सदैव बंद असतो.
 

Saturday, March 19, 2011

मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही


( कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही)

देवतेचे दर्शनास ते दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण  मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते. शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही.  


बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता.  मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला.  ते म्हणाले, आम्ही ही त्यांचेच वंशज ! स्वाभिमानी! खरे मराठा!  मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा ??? आम्ही ही मुजरा करत नाही. त्यांचे विचार ऐकून मला आश्चर्य वाटले व आनंद ही झाला  आपले नेते आज ही स्वाभिमानी व मोडेन पण वाकणार नाही या बाण्याचे आहेत पाहून.  बिना मुजरा करता हे देवतास कसे प्रसन्न करतात,  हे बघण्याची उत्सुकता मनात जागृत झाली.  

तेवढ्यात देवतेचे पदार्पण झाले. आश्चर्य म्हणजे, आपल्या मराठी नेत्याने साक्षात् दंडवत प्रणाम केला.  त्यांची नाक जमिनीला घासल्या जात होती.  पण एक गोष्ट नक्की खरी होती. त्या ही अवस्थेत त्यांचा  पाठीचा कणा सरळ होता व मान ही ताठ होती.  "खरा मराठी बाणा म्हणतात तो हाच का ????"

कविता (२) कविता बेदाणे


खरंच! कविता मला समजत नाही
कविता मला उमगत नाही.

कविता बेदाणे, आमच्या कॉलेजात होती
जेव्हां ती हसायची, तिच्या गालात पडायची खळी
आणि माझ्या हृदयात चीर पडायची. 

माझ्या कवितेला द्यायची सदा 'दाद' ती
मला वाटायची प्रेमाची 'साद' ती.

न जाणे देवा! काय पाहिले तिने
मराठीच्या टकल्या प्रोफेसर मधे
जाऊन पडली त्याचा मिठीत ती.

त्याना 'कविता' समजली होती
मला मात्र कळली नव्हती.
की होतो 'कवितेसाठी'
फक्त टाइमपास मी.

म्हणून म्हणतो मित्रानो!
खरंच! कविता मला समजत नाही
कविता मला उमगत नाही.


कवितेचा कीड़ा/ डोक्यात शिरल्यावर काय होते ते

(माझी पहिली कविता - स्वत:चा खरा अनुभव)

कवितेचा कीड़ा जेंव्हा डोक्यात शिरतो
करितो यमकांची जुळवा-जुळवी
ताबा तोंडाचा
घेतो फिरतो  सैरभैर तो.
कानात बोळे घालुनी
भयक्रांत बायको वावरते घरी
पोरे ही म्हणती पपा
होतो अभ्यासाचा हर्जा.

हातात चोपड़ी पाहुनी
मित्रही पळती  दूर किती
पाहुण्याची लाट आटली
निस्तब्ध शांती घरी पसरली.

आता रात्रीच्या एकांती बैसुनी
माझी मीच ऐकतो कविता. 

आप्त ही म्हणती 'वैनी'
गेले हो पार कामातुनी आता.
दाखवाहो 'ह्याना'  आता  वेड्यांच्या इस्पिताळी
वाया गेला 'माणूस' कामाचा  लागून कवितेच्या नादी.