Friday, June 29, 2018

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...


सोना, सोSSना, सोनुSSटली, काहीच उत्तर नाही. शेवटी आबा जोरात ओरडले गधडी  बहरी आहेस का, ऐकू येते कि नाही. जोर-जोरात पाय आपटत ११ वर्षाशी सोनुटली दोन्ही हात कमरे वर ठेऊन आबासमोर उभी ठाकली. मोठे-मोठे डोळे वटारून बेंबीच्या देठाने ओरडली आSSबाSS, ओ द्यायला थोडा उशीर का झाला, मी बहरी, मी गधडी. आता कुकल बाळ नाही मी. मोठी झाली आहे. ६वीत शिकते. गधडी म्हंटलेले मला मुळीच खपणार नाही. एवढी वर्ष सहन केले, आता मुळीच सहन करणार नाही. येउ ध्या ममाला ऑफिसातून, कशी वाट लावते तुमची, बघाच.  

आबाही तेवढ्याच त्वेषाने म्हणाले, "एवढ्या आवाज देतो, तू ऐकूनहि न ऐकल्यासारखे करते, आणि वर मला धमकी देते. माझी बिल्ली आणि मलाच म्याऊ". येउ दे तुझ्या पपाला, आईची धमकी देते, बघून घेईल तुझा बा तुम्हा माय लेकीना.  हा!, हा!,हा! 'व्हाट अ जोक,व्हाट अ जोक' आबा तुमचा जावई, सॅारी माझे पपा, आईने थोडे डोळे वटारले कि शेळी होते त्याची. एक विचारू आबा, तू पण आजीला घाबरत होता का? म्हणत सोनुटलीने तेथून धूम ठोकली. 

आबाचे लक्ष समोर हार घातलेल्या त्यांच्या बायकोच्या फोटो कडे गेले. च्यायला फोटोत हि मोठे-मोठे डोळे करून टक लावून पहात आहे. आबा दचकले, सॅारी,नाही बोलणार पुन्हा सोनाला म्हणत आबानी कानाला हात लावले आणि  मनातच पुटपुटले, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा....
Wednesday, June 27, 2018

सोनेरी स्वप्नांची नवी कोरी वही


मायेच्या संसारासाठी
पोटाच्या खळगीसाठी
निरर्थक मी भटकत होतो
जगणे त्याला समजत होतो.

कोऱ्या-कोऱ्या कागदांवर
खोटा हिशोब लिहित होतो
सृजनतेचा आव खोटा
 स्वत:ला ब्रम्हा समजत होतो.

खोटे होते शब्द, खोटी होती माया 
रिक्त होते हात, कोरी होती वही
अंधाऱ्या रस्त्यात हरवून मी गेलो.

शोधेल का माय मला?
घेईल का कुशीत पुन्हा?

 ऐकता-ऐकता अंगाई नवी
पाहणार का पुन्हा,
 सोनेरी स्वप्नांची 
 नवी कोरी वही.
 

Monday, June 25, 2018

कविता - सतरंगी फुल
दवांत न्हाली 
पहाटे कळी. 
उजेडात फुलले
सतरंगी फुल.


आवाऱ्या भंवऱ्याने
कळीला चुंबिले 
गालात हसले 
सतरंगी फुल.


Friday, June 22, 2018

लघु कथा - पिंपळ आणि आत्महत्या करणारापुन्हा बारावीत तो नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. मनात विचारांचे काहूर उठले होते. आपण एक साधी  परीक्षा हि पास करू शकत नाही.  व्यर्थ आहे असे  जगणे. आपण मेलो तर निदान घरात एक खाणारा कमी होईल. भावनेच्या आवेशात त्याने आत्महत्या करण्याचा निश्चय केला

गावा जवळच्या डोंगराच्या कड्यावरून कधी-काळी कैद्यांना कडेलोट केले जायचे, त्या डोंगराच्या कड्यावर पोहचल्यावर त्याने कड्यावरून खाली बघितले. इथून उडी मारली तर आपण नक्की मरणार ना, खात्री करण्यासाठी त्याने खाली वाकून बघितले. पण हे काय, कड्याच्या थोड्या खालीच दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावात होते. झाडाच्या मुळांनी दूर पर्यंत दगडांना जखडून ठेवले होते. पिंपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणच्या नियमाला झुगारून वार्यासवे मस्त डोलत होते. च्यायला, इथून उडी मारली तर आपण कदाचित पिंपळाच्या झाडात अटकू. सहज त्याच्या मनात विचार आला, इथे माती पाणी, फक्त दगडाची एक भेग, तरी हि दगडांना धरून हे झाड जिवंत आहे. आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरी पिंपळाने तक्रार केली नाही. जगण्याशी आशा हि सोडली नाही. दगडातच त्याने जगण्याच्या मार्ग शोधला, दगडातूनच जीवनसत्व घेतले. आपल्या डोक्यावर तर छत आहे, घरात खायला हि मिळते.  फक्त परीक्षेत नापास झालो म्हणून आत्महत्या? मनात विचारचक्र सुरु झाले. जर दगडाच्या आधारावर पिंपळ जगू शकू शकतो तर आपण  हि स्वावलंबी होऊन जगू शकतो. आपण आत्महत्या केली तर आई वडिलांना किती दु: होईल. शाळेत नापास झालो तरी काय झाले, आपल्याला हि पिंपळाप्रमाणे जगण्याचा काही ना काही मार्ग निश्चित सापडेल. त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि घरी परतला. नव्या जोमाने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी