काल फेसबुक वर एक पोस्ट वाचली त्यात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि हमीद दलवई यांना अंधविश्वास दूर करण्यासाठी भारत रत्न दिले पाहिजे. वाचून मला पोस्ट लिहिणार्याची कीव आली. ज्या लोकांनी अंधविश्वास विरुद्ध मोहिमेला भारी नुकसान पोहचविण्याचे कार्य मात्र जोमाने केले त्यांना पुरस्कार. विचित्रच आहे. आता तुम्ही मला विचाराल पटाईत तुमच्या विधानामागचे कारण काय. कुठलीही मोहीम हाती घ्या, दोन पक्ष असतात एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. उदाहरण नकारात्मक पक्ष - दारू बंदी केली कि लोक पिणे सोडून देतील का? उत्तर नाही. सकारात्मक पक्ष - लोकांनी दारू पिणे स्वत: सोडले तर दारूची दुकाने आपसूक बंद होतील. लोकांनी दारू स्वत: पिणे सोडणे त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सकारात्मक पक्ष.
डॉ. दाभोलकर अणि अनिस यांचा दृष्टिकोण सुरुवातीपासून नकारात्मक होता. एक तर अन्धविश्वास आणि जन्म ते मृत्यू पर्यंतचे धार्मिक संस्कार यांच्यातला फर्क त्याना माहित नसावा की जाणूनबुजून दोन्हींना अंधविश्वासाच्या श्रेणीत टाकले. धार्मिक आणि सामाजिक संस्कार कुठल्याही धर्माचे असो, तिथे एकच समस्या असते, ऐपतीपेक्षा जास्त खर्च करणे. त्या मुळे लोक कर्जबाजारी होतात. धार्मिक परंपरांचा विरोध करणे म्हणजे समस्त धार्मिक लोकांना विरोधी बनविणे. त्यात त्यांनी अधिकांशत: हिंदू धर्मातील धार्मिक परंपरांचा विरोध केला त्या मागचे कारण न जाणता. उदा. सत्यनारायण कथा. हि कथा नवीन संसार सुरु करणार्यांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. राजासाठी - समाजातील वनात राहणार्या वनवासी बंधुसोबत हि समानतेचा व्यवहार करावा हे शिकवते. पण दाभोळकर सारख्यांना हे दिसत नाही. सत्यनारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा (https://vivekpatait.blogspot.com/2016/04/blog-post_2.html)
त्यांचे दुसरे कार्य -चमत्कार करणार्या बाबांविरोधी मोहीम. या मोहिमेची काय फलश्रुती होते? एक बाबा आत गेला कि दुसरा त्याची जागा घेईलच. देशात बेरोजगारी भरपूर आहे आणि सर्वांना बिना मेहनतीचा पैसा पाहिजे. त्यामुळे काही लोकांना आतमध्ये टाकून काही जास्त फायदा होणार नाही. मुख्य समस्या- लोक या बाबांकडे का जातात हि आहे? त्या बाबत दाभोळकर आणि अनिसचे कार्य शून्य आहे. मजेदार बाब सर्वात जास्त चमत्कार जिथे दाखविले जातात. त्या जागांविषयी दाभोलकरांनी व अनिस यांनी तक्रारी दाखील केल्या असतील असे तरी मला वाटत नाही. तिथे तर आत्म्याने चमत्कार केले म्हणून संत पद मिळते.
डॉ. दाभोळकर आणि अनिसचे ९०टक्के कार्य हिंदू धर्मातील परंपरांचा विरोधातच आहे. कुठलीही संस्था जर आत्मनिर्भर नसेल पैसे देणार्याचा तालावर नाचणे हि मजबुरी असतेच. त्या मुळे त्यांनी आपली छवि हिंदू विरोधी करून घेतली. या मुळे त्यांच्या प्रचाराचा लोकांवर प्रभाव पडत नाही. पण विरोधी मात्र भरपूर तैयार होतात.
दुसरी कडे स्वामी रामदेव. स्वामी दयानंदच्या परंपरेतील. आर्य समाज सुरवातीपासून अंधविश्वास विरोधी आहे. त्यांना अंधविश्वासाचे मूळ कारण हि माहित आहे. अशिक्षा, गरिबी आणि पुरुषार्थ न करण्याची इच्छा. शिक्षणाचा प्रसार अंधविश्वास दूर करू शकतो. देशात मोठ्या प्रमाणात DAV शाळा उघडल्या गेल्या. आज हि अनेक आर्यसमाजाचे संन्यासी गावो-गावी फिरून सामाजिक जागृती करून अंधविश्वास दूर करण्याचा प्रयत्न करतात. कुठलीही अपेक्षा व स्वत:चा प्रचार न करता. आर्यसमाज मंदिरात सर्व धार्मिक संस्कार अत्यंत स्वस्तात होतात.
स्वामी रामदेव यांना अंधविश्वास मागचे मुख्य कारण माहित आहे. ते कुणा बाबा विरुद्ध बोलत नाही. पण सरळ सौप्या शब्दांत अंधविश्वासाविरुध्द लोकांना आपले विचार सांगतात. उदा: एवढा मोठा शनिग्रह तुमच्या डोक्यावर बसला तर काय होईल? उत्तर जनताच देते. लोकांना त्यांची सौपी भाषा समजते. आपल्या भाषणात नेहमीच ते सफलतेचा छोटा मार्ग सोडून जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा आणि कठोर पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देतात. आजगायत कोट्यावधी लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून तंबाकू, गुटका, दारू सोडली आहे. जिथे अनिसचा प्रभाव देशातील १ कोटी लोकांपर्यंत हि पोहचला नसेल तिथे स्वामी रामदेव वर्षातून 3०० दिवस तरी अंधविश्वासाविरुद्ध प्रचार करतात. त्यांच्या प्रत्येक शिविरात कमीत-कमी वीस एक हजार लोक तर असतातच यास शिवाय टीवी वर कितीतरी कोटी. ज्या भागात शिविर असतो, त्याच भागात महिलांसाठी आणि विध्यार्थांसाठी ते वेगळे शिविर हि घेतात. त्यात अंधविश्वास हा प्रमुख विषय असतोच. या साठी ते सकाळी चार वाजतापासून ते रात्री १० तर कधी १२ वाजेपर्यंत कार्य करतात. एका वर्षांत किती तरी लाख किमी ते प्रवास करतात. आस्था वाहिनीच्या माध्यमाने देश नव्हे तर विदेशात हि रोज कोट्यावधी लोकांपर्यंत आपले विचार पोहचवितात. (रोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आस्था वाहिनी वर जाऊन आपण शहानिशा करू शकतात). सफलतेसाठी कठोर परिश्रम करणारा कधीच अंधविश्वासाच्या आहारी जाणार नाही.
जिथे गरिबी तिथे अंधविश्वास आणि चमत्कार हे असतातच. ग्रामीण भागात अंधविश्वास जास्त कारण तिथे संपन्नता नाही. ग्रामीण भागात संपन्नता कशी येईल या बाबत डॉ.दाभोलकरांनी आणि अनिस ने काहीच केलेले नाही. स्वामी रामदेव यांच्या नेतृत्वाखाली पतंजलीने ग्रामीण भारतातील गरिबी कशी दूर होईल या बाबात कार्य सुरु केले आहे. पारंपारिक शेती व्यतिरिक्त शेतीचा नवीन मार्ग हि त्यांनी शेतकर्यांना दाखविले. उदा. गेल्यावर्षी १ लाख टन आवळा आणि १ लाख टन अलोविरा त्यांनी विकत घेतला. दहावर्षांपूर्वी लोक आवळा आणि एलोविरा ज्यूस पिणार यावर कुणाचा विश्वास हि नव्हता. गौधनाचा सर्वोत्तम उपयोग, कमी खर्चात नैसर्गिक शेती यावर त्यांचे कार्य सुरु आहे. शेतकरी आत्मनिर्भर व शिक्षित झालातर अंधविश्वास आपसूक कमी होईल. हि अवधारणा.
स्वत: आत्मनिर्भर असल्यामुळे त्यांना दुसर्यांच्या तालावर नाचण्याची गरज नाही. सुरुवातीपासूनच विदेशी FMGC कंपन्यांच्या इशार्यावर त्यांच्या विरुद्ध अनेक षडयंत्र रचल्या गेले आज हि रचले जातात. तरीही ते सर्वांना पुरून उरले. कारण एकच स्वामीजी आपले कार्य ते इमानदारीने करतात.
सारांश कुठल्याही धर्म आणि बाबांचा प्रत्यक्ष विरोध न करता सकारात्मक दृष्टीने अंधविश्वास नष्ट करण्याचे त्यांचे कार्य दाभोळकरांपेक्षा लाखपट जास्त आहे.
आता प्रश्न आहे भारत रत्न द्यायचे झाले तर कुणाला द्यायचे. स्वत:च ठरवा.

No comments:
Post a Comment