Tuesday, July 30, 2019

स्पुट क्षणिका : जीवन


जीवन 

कितीही धरली 
तरी निसटली 
हातातून रेत. 


आकाशी उडाले 
वाळवंटी गिधाडे 
एक श्वास तुटला 
एक श्वास जगला.


 





Thursday, July 25, 2019

स्वास्थ्यवर्धक उकडीचे दहीवडे


गेल्या रविवारी पहाटे-पहाटे दहीवड्याचे स्वप्न पडले. पहाटेचे स्वप्न  खरे ठरतात हि म्हण आहे. पण स्वप्न खरे करण्यासाठी प्रयत्न हा करावाच लागतो. सौ. सहज-सहजी वडे करणार नाही. आजकाल तिला अस्मादिकांच्या सेहतची चिंता जास्त असते.  मलाच काहीतरी करावे लागणार होते. सौ. आंघोळीला गेली. मला मौका मिळाला. पटकन स्वैपाघरात गेलो. डब्बे उघडणे सुरु केले. पहिल्या डब्ब्यात चण्याची दाळ होती. अचानक आठवले सौ. नागपंचमीला चण्याची दाळ टाकून उकडीचे वडे करते. अर्धी वाटी चण्याची दाळ घेतली. एका डब्ब्यात उडीदाची धुतलेली दाळ सापडली. तीहि अर्धी वाटी घेतली. मुगाची डाळ शोधू लागलो. एका डब्यात छिलके वाली मुगाची डाळ दिसली तीहि अर्धी वाटी घेतली. सर्व डाळी धुऊन  पाण्यात भिजायला एका भांड्यात ठेवल्या. चटणीसाठी चिंच आणि ६ ते ७ खारका शोधल्या. त्याही वेगवेगळ्या वाटीत भिजवून ठेवला. फ्रीज मध्ये दही थोडेसे होते पण गॅस वर सकाळी एका भांड्यात तापवून ठेवलेले जवळपास अर्धा किलो गायीचे दूध  होते. दूध कोमट आणि दही लावण्यास उपयुक्त वाटले. पटकन विरजण टाकून दहीहि लाऊन टाकले. स्वैपाकघरातून बाहेर पडलो. 

सौ.ची आंघोळ आणि पूजा आपटली. नवरोबांनी स्वैपाघरात काही लुडबुड केली आहे, याचा वास तिला लागलाच. आमची देवीच्या दरबारात पेशी झाली.  जमेल तेवढ्या मृदू आवाजात म्हंटले "'देवी आज सकाळी सकाळी दही वड्याचे स्वप्न पडले."  सकाळी पडलेले स्वप्न नेहमीच खरे होतात.  आता सौ. काय कपाळ बोलणार. नवरोबांनी आधीच पूर्व तैयारी केल्यामुळे तिच्यापाशी नाही म्हणण्याचा विकल्प उरलाच नव्हता.  

दुपारी चारला चहा झाल्यावर तिने दहीवडे बनविण्याची तैयारी सुरु केली. आधी ४ चमचे जिरे तव्यावर भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतले.

भिजलेल्या खारका व चिंच बियांना काढून थोडे पाणी टाकून मिक्सर मधून पातळ करून घेतले.  एका भांड्यात हे पाणी गाळून घेतले. गॅॅस वर भांडे ठेऊन त्यात २-३ चमचे स्वादानुसार तिखट टाकले. एक उकळी आल्यावर त्यात ८ चमचे मधुरम (स्वदेश गुळाची साखर) टाकली. अश्यारितीने आंबट गोड आणि तिखट चटणी तैयार झाली.

त्या नंतर भिजलेल्या डाळींची  मिक्सर मध्ये पेस्ट केली (थोडी जाड) व एका भांड्यात काढून घेतली.  या शिवाय चार हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसुनाच्या पाकळ्यांची पेस्ट करून घेतली.  घरात हिरवी कोथांबीर नव्हती. पण गच्चीवर असलेल्या गमल्यात हिरवा पुदिना भरपूर होता. १० -१२ पाने तोडून आणली. डाळींच्या  पेस्ट मध्ये मिरची-लसुणाची पेस्ट मिसळली. पुदिन्याची पाने तोडून टाकली. हळद, धनिया पावडर व मीठ अंदाजे घातले (आपल्या स्वादानुसार यावस्तू टाकाव्या).  

इडली स्टेन्डला  थोडे तेल लाऊन तैयार केले. आमच्या घरच्या इडली स्टेन्ड मध्ये १६ वडे एकाच वेळी होऊ शकतात. (तेल लावल्याने शिजल्यावर वडे इडली स्टेन्ड मधून सहज काढता येतात). सर्वात शेवटी एक चमचा इनो डाळीच्या पेस्ट मध्ये टाकून मस्त पैकी ढवळून घेतले आणि पटकन ते मिश्रण इडली स्टेन्डवर  टाकले. अर्थात हे सर्व मलाच करावे लागले.  इनो टाकल्याने वडे हलके बनतात व आत छिद्रहि बनतात.  इडली पात्रात  एक गिलास पाणी टाकून त्यात इडली स्टेन्ड  ठेवले.  मध्यम आंचेवर १५  मिनिटांत  वडे शिजतात. (टीप: इडली पात्र  नसेल तर कुकर वापरता येते. फक्त कुकरला  सिटी  लाऊ नका.)  

सर्वात शेवटी दह्याला पाणी न टाकता व्यवस्थित घुसळूण पातळ केले. जर दही थोडे आंबट असेल तर थोडी साखर त्यात मिसळता येते. आजकाल उन्हाळा असल्यामुळे  दह्यात बर्फहि टाकली.  आता वड्यांसोबत मीठ तिखट, काळी मिरी, पावडर, जीरा पावडर  आणि दही ठेऊन सर्व साहित्याचा एक फोटू काढला. एवढी मेहनत केल्यानंतर  साहजिकच आहे वडे खाताना मस्त लागले.   




Wednesday, July 24, 2019

श्रेय बापालाच मिळायला पाहिजे


शेठजी एका अनाथालयाच्या दौर्यावर होते. तिथे शेटजीला एक चुणचुणीत हुशार मुलगा दिसला. ते त्यामुलाला आपल्यासोबत महानगरात घेऊन आले. एका मोठ्या नामांकित शिक्षण संस्थेत त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. आपल्या हुशारीने त्याने प्रथम क्रमांक पटकावला.

दीक्षांत समारोहात बोलताना त्याने आपल्या प्रगतीचे श्रेय  शेठजीला दिले. तेंव्हा हालमध्ये बसलेला एक म्हातारा उभा राहिला तो म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे. मी जर या मुलाला जन्मत: अनाथालयात सोडले नसते तर तो आज या मुक्कामी पोहचला नसता.  त्यामुळे मुलाच्या  प्रगतीचे सर्व श्रेय मला मिळाले पाहिजे शेटजीला नाही.

Tuesday, July 23, 2019

चंद्रमा आणि सदूची पहिली डेट


सदू मैफिलकर झाला. तिथल्या कवींची प्रेरणा घेऊन सदू शीघ्रकवी झाला. कालच चंंद्रयान आकाशी उडाले आणि सदूला तिचा फोन आला. ती सदूला भेटायला राजी झाली होती. पहिल्या डेटसाठी कपड्यांवर डीओ शिंपडून तो तिला भेटावयास निघाला.  सदूला  पाहताच स्मित करून ती हाय म्हणाली.  तिच्या गालावरच्या खळ्या आणि हनुवटीवरचा काळा तीळ पाहून सदूचे  काळीज खल्लास झाले. "चांद सी महबूबा हो मेरी .... मनातल्या मनात गुणगुणत त्याने शीघ्र कविता केली. चंद्रमा समान तिच्या चेहऱ्याच्या सुंदरतेचे वर्णन करत तो म्हणाला:


तुझ्या गालावरच्या खळ्या 
जणू चंद्रावरचे  खड्डे.
तुझ्या हनवटी वरच्या तीळ
जणू चंद्रावरचा डाग. 
........

तुझ्या थोबड्यावरची सूज
जणू सह्याद्रीचे डोंगर. 

ती पाय आपटत निघून गेली. सदू बेचारा सुजलेले गाल चोळत विचार करू लागला, काय चूक जहाली.


Monday, July 22, 2019

क्षणिका : चेहरा


 
सभ्यतेचा मुखवटा 
तार-तार फाटला 
दर्पणात  दिसला 
विद्रूप माझा चेहरा.

हडळी ने घेतले 
सोंग सुंदरीचे 
दर्पणाने दाविले 
खरे रूप तिचे.





















Tuesday, July 16, 2019

मिनी कथा: आतंकवादी खेकडे


एक बंधारा बांधला. शेतीला पाणी मिळाले. शत्रूने बंधार्यात आतंकी खेकडे सोडले. पावसाळ्यात आतंकी खेकड्यांनी बंधारा फोडला. पाण्यात घरे बुडाली. निर्दोष जनतेचे नाहक प्राण गेले. आतंकी खेकड्यांना पकडा. त्यांना फासावर द्या. इति.

Wednesday, July 3, 2019

कविता आणि मीटर


माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी पाहुणे आल्यावर त्यांना अत्यंत आनंद होतो. बहुतेक कविता ऐकायला एक बऱ्यापैकी बकरा सापडला याचा. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मलाहिआनंदझाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलो आहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर???  असे म्हणत ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ या धर्तीवर’ तो कवितेची चोपडी चाळू लागला. मीहि कान टवकारून, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानी तो उद्गारला, लेका, कविता छान आहे, आवडल्या (?). पण! एक ही कविता मीटरमध्ये नाही. तू माझा मित्र आहे म्हणून सांगतो, बिना मीटरच्या कवितांची मार्केट वेल्यू नसते. कवीला प्रतिष्ठा मिळत नाही आणि  मोबदलाहि मिळत नाही. असे म्हणत एखाद्या खलनायका प्रमाणे माझ्याकडे पाहत, तो खदा-खदा हसू लागला. त्यावेळी त्याचा चेहरा मला चक्क ब्रूटस सारखा वाटला, ‘ब्रुटस तुम भीएवढेच म्हणायचं काय ते राहिल. पण एक मात्र खरं त्याचा घाव जिव्हारी लागला. त्या दिवसापासून एक ही कविता सुचली नाही.


कवितेच मीटर म्हणजे काय, हा एकच प्रश्न सतत डोक्यात घोळू लागला. गेल्या रविवारी कुठे बाहेर जायचे होते, गल्लीत एक आटोरिक्षा उभा होता. आटोरिक्षावाल्याला विचारले, तो म्हणाला साहब मीटर खराब है. मीटर ठीक होने तक सवारी नाही बिठा सकता.  मी म्हणालो बिना मीटर के चल. त्याने उत्तर दिले, साहब, बिना मीटर के में मुफ्त में भी किसी को नही ले जा सकता, चलान कट जायेगा’. माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. प्रकाश पडला.  मीटर नसेल तर आटोरिक्षा ही रस्त्यावर धावू शकत नाही. मीटर असेल तरच मोबदला मिळतो’. मीटर वेगाने पळत असेल तर मोबदला हि जास्त मिळतो.
 
डोक्यात गोंधळ माजला, अनेक प्रश्न उभे राहिले, विवेक पटाईत तुम्ही मीटर मध्ये कविता लिहू शकतात का?  हृदयातून उत्तर आले - शक्यच  नाही. बिना मीटरच्या कवितेला बाजारात किंमत नाही. ज्याची किमत नाही त्याचे नाव होत नाही. त्याला प्रतिष्ठाहि मिळत नाही. प्रतिष्ठा व नाव नसलेल्यांना कवी संमेलनात कुणी बोलवतो नाही. कुणी त्यांची कविता छापत नाही. माझ्या एका दिल्लीकर कवी मित्राने स्वत:च्या खर्चाने नागपूरहून आपले दोन-तीन कविता संग्रह प्रकाशित केले आहे (५००च्या आवृतीचे, १५ ते वीस हजार खर्च येतो असे तो म्हणाला होता). पुस्तके किती विकल्या गेली त्यास माहीत नाही. कारण रॉयल्टी त्याला कधीच मिळाली नाही.


आपण काय विचार करतो आहे, या विचाराने मला माझेच हसू आले. तुलसीदासाला कुठल्या ही राजाच्या दरबारी ‘राजकवीचे’ पद सहज मिळाले असते. पण तुलसीदासाने काशीच्या घाटावर, स्वांत सुखाय ‘रामचरितमानस रचले’ होते, कुठल्या ही मोबदल्याचा विचार न करता. त्यावेळी आत्मशून्य झालेल्या जनतेला राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हाच रामचरितमानस रचण्याचा कदाचित त्यांच्या उद्देश्य असेल. शेवटी स्वत:लाच म्हणालो, विवेक पटाईत, आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करण्यात थोडे यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.