Sunday, June 30, 2013

वृक्षांचे देवत्व


मुले ब्रह्मा त्वचा विष्णू शाखायाम तु शंकर:
पत्रे-पत्रे तु देवानाम् वृक्ष राज नमोस्तुते.

वृक्षांच्या मुळांमध्ये साक्षात ब्रह्मदेव निवास करतात. वृक्षांची त्वचेत भगवान विष्णु, फांद्यांमध्ये भगवान शंकर निवास करतात. पाना-पानात देवतांचा निवास असणार्‍या वृक्षराजाला मी नमस्कार करतो.

वृक्षांच्या विना मानव जातीच्या अस्तित्वाची कल्पना ही अशक्य आहे, आपल्या प्राचीन ऋषींना हे माहीत होते. वृक्ष पर्यावरणला शुद्ध करतात, घर आणि यज्ञा साठी लाकूड प्रदान करतात, क्षुधा शांत करतात आणि रोगांपासून आपल्याला मुक्त करतात (अशी आख्यायिका आहे - आयुष्यभर अध्ययन करून ही ‘चरकला’ एक ही वनस्पती किंवा वृक्ष सापडला नाही की ज्यात औषधीय गुण नाहीत).

पुराणात वृक्षांचे महत्व सांगताना महर्षि व्यास म्हणतात जो मनुष्य पिंपळ,
चिंचेचे, वट आणि कडू लिंबाचे एक-एक झाड, बिल्व आणि आवळ्याचे तीन-तीन आणि आंब्याचे पाच झाडे लावेल तो कधीही नरकात जाणार नाही. गीतेत ही भगवंताने ‘अश्वत्थ सर्व वृक्षाणाम’ वृक्षांमध्ये मी अश्वत्थ (पिंपळ) हा वृक्ष आहे असे म्हटले आहे. वृक्षांची महिमा सांगताना ऋषि म्हणतात एक वृक्ष दहा पुत्रांच्या बरोबर आहे. [(विष्णु धर्मसूत्र (१९/४)].

वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर यांचे निवास तुळशी वर लक्ष्मी आणि विष्णु, सोमलता-चंद्रमा, बिल्व –शंकर, अशोक-इंद्र, आंबा –लक्ष्मी , कदंब- कृष्ण, पलाश-ब्रह्मा आणि गंधर्व, पिंपळ – विष्णु, औदुंबर – रुद्र आणि विष्णु, महुआ –अचल सौभाग्याचे आशीर्वाद देणारा वृक्ष (बंगालच्या अकाल च्या वेळी ज्या गावांत महुआची झाडे होती, तेथील गावकर्यांनी या झाडाच्या वाळलेल्या फुलांपासून बनलेल्या पोळ्या खाऊन आपले रक्षण केले, असे एका लेखात वाचले होते).

शेवटी कवी नीरजची कवितेतील एक अंश -

खेत जले, खलिहान जले,
सब पेड जले, सब पात जले.
मेरे गांव में रात न जाने कैसा पानी बरसता था.

हा अनुभव आपण आत्ताच घेतला आहे.

Tuesday, June 25, 2013

वृत्रासुर


वेदांमध्ये कथा आहे. वृत्रासुराने नद्यांना पर्वतांत बंदिस्त केले होते. इंद्राने वज्राच्या प्रहाराने पर्वतांचे हृद्य फोडले आणि नद्यांना मुक्त केले. आज आपण वृत्रासुर प्रमाणेच पुन्हा नद्यांना पर्वतात बंदिस्त करतो आहे. याचा परिणाम आपल्याला भोगावेच लागेल. (इंद्र: अग्नी, वायू आणि जल या तिन्ही प्राकृतिक शक्तींचा स्वामी आहे. प्रकृतीच्या या शक्तीं बरोबर सहयोग करण्यात शहाणपणा असतो. या शक्तींवर विजय मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशाचा मार्गावर चालणे.)

इंद्राच्या वज्राने, 
हृद्य फोडले पर्वतांचे.
बंदिस्त नद्या मुक्त केल्या
सकळ प्राणी सुखिया झाला.
 
पर्वतांत कैद केल्या नद्या,
बांधुनी धरणे
‘इंद्राचा’ क्रोध अनावर झाला
सकळ प्राणी दुखिया झाला.

प्रकृतीच्या क्रोधामुळे दिवंगत सर्व आत्म्यांना शांती लाभो,हीच श्री चरणी प्रार्थना.Sunday, June 16, 2013

पुन: एकलव्य : नियतीचा खेळ


एकलव्य चित्रगुप्त समोर उभा होता पण त्याचे मन अशांत होते. चित्रगुप्तने आपला निर्णय ऐकविण्याआधी, आपल्याला एकदा तरी बोलायची संधी द्यावी असे त्याला वाटत होते. तेवढ्यात चित्रगुप्त उद्गारले,एकलव्य तुझ्या हातून पापकर्मे घडली नाही आहेत, त्या मुळे तुला नरकात पाठवविता येणार नाही. पण तुझ्या मनात काही अतृप्त इच्छा शेष आहेत, म्हणून तुला स्वर्गातही धाडता येणार नाही. तुला पृथ्वीवर परत पाठवावे लागेल, तुझ्या मनात काय आहे?

एकलव्य म्हणाला - हे देव, माझ्यावर अन्याय झालेला आहे, आपण जाणत असालच. मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालो असतो पण द्रोणाचार्यांनी राजपुत्र अर्जुनासाठी माझा अंगठा दक्षिणा म्हणून मागून घेतला. माझी इच्छा अपुरी राहिली. हे देव, माझे एकच मागणे आहे पृथ्वीवर उच्च कुळात माझा जन्म व्हावा आणि अर्जुनाचा एका वनवासीच्या घरी जन्म व्हावा, माझे दु:ख आणि अन्याय काय असतो हे त्याला कळले पाहिचे हीच माझी इच्छा आहे.

चित्रगुप्त म्हणाले, एकलव्या तू प्रतिशोधाच्या अग्नीत जळत आहे, पुन्हा एकदा विचार कर.

एकलव्य रागात म्हणाला, विचार म्हणजे काय? साक्षात धर्माच्या दरबारात ही मजवर अन्याय होणार का?  चित्रगुप्त, जसी तुझी इच्छा, तू पृथ्वीवर उच्च कुळात जन्म घेशील आणि अर्जुन वनवासी कुळात घेईल. तथास्तु.

कलयुगात पुण्यनगरी येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मणाच्या घरात एकलव्याचा जन्म झाला. वडील सरकारी नौकरीत होते. घरची परिस्थिती बर्यापैकी होती. एका पुब्लिक शाळेत एकलव्य शिक्षण घेऊ लागता. एकलव्याचे एकच ध्येय होते, काहीही करून बारावीत चांगले मार्क्स आणायचे त्या साठी त्युअने शाळे व्यतिरिक्त अनेक क्लास ही जॉईन केले होते. अपेक्षे प्रमाणे त्याला बारावीत ९५% टक्याहून अधिक मार्क्स मिळाले.

आपले ध्येय साधण्यासाठी देशातील प्रमुख शिक्षण संस्थान इंद्रप्रस्थ व्यवस्थापन महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तो इंद्रप्रस्थ नगरील पोहचला. कोट-पैंट आणि टाई घातलेला हा एकलव्य महाविद्यालयाच्या दरवाज्यावर पोहचला. तिथे त्याला पायात तुटलेली चप्पल व मळके कपडे घातलेला एक मुलगा दिसला, त्याला पाहताच एकलव्यला गतजन्म आठवला, तू अर्जुन का? निश्चित तू वनवासी कुळात जन्मला असेल, म्हणत एकलव्य मोठ्याने हसला.

अर्जुनाची ही गतजन्माची स्मृती जागृत झाली, तो म्हणाला एकलव्य, खरं आहे, मी वनवासीकुळातच जन्म घेतलेला आहे, आज सकाळीच छत्तीसगड वरून इथे आलो आहे. घरपासून १०-१२ की.मी. दूर असलेल्या सरकारी शाळेत माझे शिक्षण झाले आहे मला बारावीत ६०% मार्क्स मिळाले आहे. गुरुजी म्हणाले तुला इंद्रप्रस्थ येथील महाविद्यालयात अवश्य प्रवेश मिळेल म्हणून मी इथे आलो आहे.

एकलव्य मोठ्याने हसला, अर्जुन मला ९५% टक्क्याहून जास्त मार्क्स मिळाले आहे, ९०% टक्क्याहून घालील मार्क्स वाल्यांनी इथे फिरकलेही नाही पाहिजे, एवढे कमी मार्क्स येऊन ही तू येथे आला आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटते. अर्जुन या वर काहीच बोलला नाही. प्रवेश फार्म जमा करून, एकलव्य आपल्या हॉटेल वर परत आला. उद्या निकाल जाहीर होणार, अर्जुनाची निराशा होईल, ह्या विचाराने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो शांत झोपी गेला.

दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता, एकलव्य महाविध्यालयात पोहचला. निकाल लागला होता. यादीत एकलव्याचे नाव नव्हते. त्याच्या पेक्षा कितीतरी कमी मार्क्स वाल्यांना प्रवेश मिळालेला होता. अर्जुनाचे ही नाव त्यात होते. त्या मुळे एकलव्याच्या अंगाची लाही-लाही झाली. काही तरी गलफत जाहली असेल. जाब विचारयला पाहिजे, तो तणतणत, प्राचार्यांचा कार्यालय जवळ पोहचला.

दरवाज्यावर पाटी होती त्या वर लिहिले होते प्राचार्य श्रीयुत द्रोणाचार्य. असं होय, मनात पुटपुटत, एकलव्य सरळ आत शिरला आणि द्रोणाचार्यांवर ओरडलाच, प्रत्येक जन्मात मजवर अन्याय करताना तुम्हाला लाज का वाटत नाही? त्या अर्जुनाजवळ अस काय आहे, प्रत्येक वेळी तुम्ही त्याची बाजू राखतात.

द्रोणाचार्यांनी ही एकलव्याला ओळखले, शांत पणे उद्गारले, एकलव्या, तुज्यावर झालेल्या अन्यायासाठी मी कारणीभूत नाही, व्यवस्था कारणी भूत आहे.

ते कसें, मला मूर्ख बनवू नका, एकलव्य मी सगळ समजावून सांगतो, असे म्हणत द्रोणाचार्यांनी एकलव्य ला समोर कुर्सी वर बसविले, पाण्याचा थंड पेल्या एकलव्यच्या समोर ठेवला आणि म्हणाले एकलव्या या महाविद्यालयात व्यवस्थापन विषयाच्या ५० जागा उपलब्ध आहे. त्यात ७०% स्थानीय विद्यार्थांसाठी राखीव आहे. गेल्या युगांमध्ये दलित, वनवासी आणि मागासवर्गीय लोकांवर झालेल्या अन्यायाचे परिताप करण्यासाठी, कलयुगात आपल्या लोकशाही सरकारने त्यांना आरक्षण दिलेले आहे. शिवाय काही जागा मुलींसाठी, विकलांग मुलांसाठी, स्वतंत्रता सेनानीच्या मुलांसाठी व काही अल्पसंख्यकांसाठी आरक्षित आहे. तुझ्या पेक्षा कमी मार्क्स असून ही वनवासी कोट्यात अर्जुनाचे सर्वात जास्ती मार्क्स आहे त्याला मुळे प्रवेश मिळाला आहे. सामान्य श्रेणीत केवळ १ मार्क्स कमी पडल्यामुळे तुला प्रवेश मिळाला नाही.

एकलव्यला आता काहीच सुचत नव्हते, पुन्हा अर्जुनाच्या हातून त्याचा पराभव झाला होता. त्याला वाटले पुन्हा एकदा त्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी हिसकावला होता. त्याची दशा बघून द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्या, तुझी इच्छा होती, अर्जुनाने वनवासी व्हावे, ती पूर्ण झाली पण बदला घेण्याच्या विचाराने जळत असलेला तू विसरून गेला, काळाचे चक्र सदैव फिरत राहते, ते कधीच अन्याय करत नाही.. एकलव्य चुपचाप उठला आणि परत फिरला.

Sunday, June 9, 2013

फिक्सिंग आणि मोका -दोन कविता


 (१)
बिना कुणाला फिक्स केल्या आपल्या देशात कुठलेही काम होत नाही....
 

सगळ कसं छान आहे
सगळ कसं फिक्स आहे.
फिक्सिंगच्या चौकटीत इथे
बंदिस्त सर्वांचे आयुष्य आहे. 

म्हणतो दास विवेक कसा
फिक्स करा व फिक्स व्हा
आयुष्याचा आनंद लुटा.


(2)


जाळ्यात लहान मासोळ्याच येतात, मोठ्या मगरींच्या नादी कुणीच लागत नाही....
लहान लहान मासोळ्यां वर
मोका मोका मोका.
मोठ्या मोठ्या मगरीं पासून
तौबा तौबा तौबा.