Monday, November 26, 2018

लघु कथा: उंदीरांच्या राज्यात


उंदीरांच्या देशात, मांजर होती महाराणी. तिच्या जवळ होता परवाना. उंदीरांना मारण्याचा. उंदीरांना खाण्याचा. रोज एखाद-दुसरा उंदीर मांजरीचा पोटात जायचा. रोज होणारा उंदीरांचा संहार बघून सर्व उंदीर वैतागले. एक दिवस मांजर झोपली असताना सर्व उंदीरांनी मिळून मांजरीच्या गळ्यात घंटी बांधली. घंटीचा आवाज ऐकून उंदीर पसार व्हायचे. शेवटी उपासमार होऊन मांजर मरण पावली. उंदीरांनी जल्लोष केला. 
 
आता उंदीरांचे राज्य आले. तरीही परिस्थिती बदलली नाही. रोज एखाद-दुसऱ्या उंदीराचा जीव जायचा. कारण आता उंदीरांच्या राज्यात उंदीरच उंदीरांना मारू लागले होते. 


No comments:

Post a Comment