बायको
रागाने म्हणाली,
"आज मी माहेरी जाणार!"
मी
आनंदाने उत्तरलो,
"ओला बुक करून देतो, प्रिये,"
क्षणात तिच्या अंगात
रणचंडी संचारली,
नेम
तिचा अचूक होता
डोक्यावर मोठे
टेंगुळ उमटले.
अंगात
माझ्या कापरे भरले,
तिच्या
चरणावर नाक मी घासले,
माफी
मागितली, हात जोडले
खिशाला
मात्र मोठे भोक पडले!

No comments:
Post a Comment