Thursday, April 23, 2026

खोमनेईची कृपा: चुलीवरचे जेवण, गोवर्‍यांचे राशन

इराण युद्ध असेच सुरू राहिले तर: 

 

चुलीवरच्या जेवणासाठी

गरज नाही गावाला जायची।

खोमनेईच्या कृपेने आज

घरातच पेटली चूल रे।



मर्सडीज गाडीला पहा,

बैल कसे ओढतात भारी।

रुणझुण घंटा नाद ऐकू येतो,

आता पुन्हा साद देतो पुराणी।

 

गाय आणि गोबरचे राज्य

पुन्हा आले माझ्या देशा।

दुधापेक्षा गोबरला आज

भाव जास्त मिळाले बघा।

 

गोबराच्या गोवऱ्यांसाठी

सरकारी राशनचे दुकान।

लाकूडतोड्याला सापडली

आज सोन्याची कुऱ्हाड।

 

हे खोमनेईच्या कृपेचे फळ,

प्रगतीचे नवे रूप दिसले।

चूल, गोबर, बैलगाडी...

काळचक्र पुन्हा फिरले। 


 

 
 

 
गोबराच्या गोवऱ्यांसाठी आज उघडले दुकान राशांचे. लाकूडतोड्याचे भाग्य पुन्हा उजळले, मिळाली त्याला सोन्याची हो कुऱ्हाड.

No comments:

Post a Comment