Sunday, April 8, 2012

माहेरी गेली बायको


माहेरी गेली बायको
सुखाचे दिन आले.
मित्रांसोबत पत्त्यांचे
डाव रात्रभर रंगले.

खाण्याच्या आणि पिण्याच्या
मैह्फल सजल्या.
बदनाम मुन्नी -शीलाच्या
चर्चा ही भारी पेटल्या.

एक दिवस सकाळी
बायको पुढ्यात होती.
डोळ्यात होता अंगार
हातात होते लाटणे.

तेंव्हाच मला कळले
चार दिवस सुखाचे
आता अपुले संपले.

2 comments:

  1. तिने घराचे लॉजिंग बोर्डिंग झाल्याचे पहिले असेल. स्वयंपाक घराला एखाद्या भटार खान्याची अवकळा आल्याचे पहिले असेल.
    तेव्हा आलीय भोगा, कर्माची फळे

    ReplyDelete