पाकिस्तान हा भारताचा शेजारी आहे. एका अर्थाने भारताचा लहान भाऊ. पण सध्याच्या घटकेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति बिकट आहे. महागाई 33 टक्क्यांनी वाढत आहे. जनता महागाई, बेरोजगारी इत्यादीने ने त्रस्त आहे. पाकिस्तानात सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. दुसरी कडे भारताची अर्थव्यवस्था तिसर्या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची झपाट्याने प्रगति होत आहे. पण आपल्या लहान भावाची मदत करणे सोडून भारत त्याच्या छताडावर बंदूक रोखून उभा आहे. पाक व्याप्त कश्मीर मध्ये अराजकता माजवत आहे. पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत आहे. अज्ञात व्यक्ति तिथल्या प्रसिद्ध शांतिपूर्ण लोकांची हत्या करत आहे. भारताचे पाकिस्तान सोबत असे वागणे निश्चितच उचित नाही. या परिस्थितीवर भारताच्या एका प्रसिद्ध अहिंसावादी नेता मनीशंकर यांनी विधान केले, हे असेच चालू राहिले तर तिथल्या पागल लोकांचे माथे भडकतील. त्यांच्या जवळ अणु बॉम्ब आहे. त्यांना तो बॉम्ब भारतावर फोडायला वेळ लागणार नाही. जर त्यांनी लाहोर मध्ये फोडला तरी अमृतसर नष्ट होणार. आपल्या देशाचे किती नुकसान होईल याची कल्पना करा. हा विनाश थांबवायला असेल तर आपल्याला पाकिस्तानचा सम्मान केला पाहिजे.
आता प्रश्न येतो. पाकिस्तानचा सम्मान कोणत्या रीतीने केला पाहिजे जेणे करून तो भारतावर अणु बॉम्ब टाकणार नाही. पाकिस्तानची भारताकडून काय अपेक्षा आहे यावर विचार करून काही उपाय शोधले.
1. भारताने पाकिस्तान सोबत वार्ता पुन्हा सुरू करावी.
2. पाकिस्तानची सीमा पुन्हा खुली करून व्यापार सुरू करावा.
3. ज्या प्रमाणे भारत आपल्या 80 कोटी लोकांना राशन फ्री देतो तसेच पाकिस्तानच्या जनतेला ही देण्यासाठी काही कोटी टन गहू, तांदूळ आणि साखर उपहार स्वरूप पाकिस्तानला द्यावे.
4. भारताने पाकिस्तान मध्ये शांतिपूर्ण लोकांची हत्या करणे त्वरित बंद करावे.
5. भारतातील जेलांमध्ये बंद पाकिस्तानच्या शांतिपूर्ण नागरिकांची सुटका करून त्यांना पाकिस्तान मध्ये परत पाठविले पाहिजे.
6. पाकिस्तान मधून शांततेचा संदेश घेऊन भारतात येण्याचा प्रयत्न करणार्या शांतिपूर्ण पाकी नागरिकांची हत्या करणार्या सुरक्षा दलांच्या जवानांवर हत्येचे केसेस दाखल करून त्यांना दंड दिला पाहिजे. बहुतेक पूर्वी असे होत होते. त्या वेळी कश्मीर घाटीतील भारतीय सुरक्षा दलांत एक म्हण प्रचलित झाली होती. "मर गये तो पेन्शन, बच गये तो टेंशन".
6. नद्यांवर बांधलेले बंधारे तोडून सर्व पाची नद्यांचे संपूर्ण पाणी पाकिस्तानला दिले पाहिजे. जेणे करून तिथल्या शेतकर्यांना भरपूर पानी मिळेल. अन्न उत्पादन वाढल्याने तिथली महागाई दूर होईल. तिथल्या जनतेला स्वस्त अन्न धान्य मिळेल.
7. सर्वात शेवटी कश्मीरचा भाग अत्यंत आनंदाने पाकिस्तानला सौपविला पाहिजे. असे केले की पाकिस्तान अत्यंत प्रसन्न होईल आणि भारतावर अणु बॉम्ब फोडणार नाही.
जो पर्यन्त तानाशाह मोदीजींची सत्ता भारतात आहे. पाकिस्तानचा सम्मान होणे शक्य नाही. कारण आजच्या अशिक्षित सत्ताधीशांना विदेश नीतीचे ज्ञानच नाही. आपल्या शेजार्याला कसे प्रसन्न ठेवावे हेच कळत नाही. येत्या जून 4 नंतर मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर पाकिस्तान मध्ये अराजकता माजवून पीओके घेण्याचा प्रयत्न भारत करू शकतो. अश्या परिस्थितित निराश होऊन पाकिस्तानी सैन्य भारतावर अणु बॉम्ब फोडू शकतो. येत्या निवडणूकीत पाकिस्तानचा सम्मान करणार्याच्या इरादा ठेवणार्यांना मत दिले तर भारतावर अणु बॉम्ब पडणार नाही. पाकिस्तानचा सम्मान करण्याचे आणिक काही उत्तम उपाय असतील तर ते प्रतिसादात सांगावे ही अपेक्षा. असो.
No comments:
Post a Comment