Thursday, May 2, 2024

मध्यम वर्ग: मतदानासाठी कमालीची अनास्था

गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा.  मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स.  हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार  मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान  केंद्र स्थापित केले गेले होते.

सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत  मतदरांमुळे  शक्य झाले. असे म्हणता येईल.

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहेत? खरे तर सर्वात  जास्त मतदान शिक्षित  मध्यम वर्गाने  केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. 

पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो.  मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. 

जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.



No comments:

Post a Comment