तहान, भूक, निद्रा विसरून आपल्याच तंद्रीत तो चालत होता. त्याला रस्त्यात अनेक यात्री भेटले. पण त्याने कुणाला ही आपल्या सोबत घेतले नाही. त्याने क्षणभराची विश्रांती ही घेतली नाही. एकटाच तो जिद्दीने चालत राहिला, अंतहीन रस्त्यावर.
अखेर सूर्यास्त हा झालाच. त्याचे गात्र झाले शिथिल झाले, डोळे जड झाले. त्याला आता चालणे शक्य होत नव्हते. त्याने स्वत:लाच विचारले, सकाळ पासून आपण चालतो आहे, तरीही आपल्याला लक्ष्य का भेटले नाही? काही चूक तर झाली नाही ना. क्षणभरासाठी त्याने डोळे उघडले, संपूर्ण सृष्टी सोनेरी रंगात न्हात होती. अनादी काळापासून चालत आलेला सुर्यास्ताचा उत्सव. अखेरचा श्वास घेताना त्याला उमगले, आनंदाचे सोनेरी रंग उधळत अंतहीन रस्त्यावर चालणे म्हणजेच जगण्याचे उद्दिष्ट.
No comments:
Post a Comment