Thursday, August 2, 2018

लघु कथा : मोगरा फुलांचा सुवास


बसची वाट पाहत तो उभा होता. त्याच्या शेजारी उभी होती ती. मोगरा फुलांची वेणी घातलेली. रिमझिम पाऊस सुरु होता. अचानक धडाssssम वीज कडकली. आई,ग! म्हणत ती त्याला बिलगली. क्षणभरासाठीच.  सॉरी, हं! म्हणत ती झटक्यात दूर झाली. तेवढ्यात तिची बस हि आली. एक नजर त्याच्या कडे टाकत ती बस मध्ये चढली.  तो अवाक! तिच्या कडे बघतच राहिला. ती गेली सोबत त्याचे हृदय घेऊन. देऊन गेली त्याला, तिचा स्पर्श, शरीराचा गंध आणि मोगरा फुलांचा सुवास. त्याच्या आयुष्याच्या घड्याळ्याचे काटे तिथेच थांबले. आज हि श्रावणात जेंव्हा मेघ गर्जना करतात, वीज कडकते, त्या बस स्थानकावर दिसेल, हातात मोगरा फुलांचा गजरा घेतलेला. प्रतीक्षारत एक म्हातारा....


 

No comments:

Post a Comment