Tuesday, August 14, 2018

एमएनसीच्या विळख्यात स्वदेशी


युएस मध्ये एक कहावत आहे,  तुम्ही पेप्सी पीतात कि  कोकाकोला पीतात या वरून तुमची पार्टी सांगता येते. एका युएस राष्ट्राध्यक्षाने एका कर्मचार्याला व्हाईट हॅाऊसमध्ये वेगळा कोक पीताना पाहिले, त्याला बाहेरचा दरवाजा दाखविला गेला. अमेरिकेत हि परिस्थिती तर भारतात या एमएनसी काय कहर माजवीत असतील याची कल्पना करणे कठीण. जेवढे ईस्ट इंडिया कंपनीने देशाला लूटले नसेल, त्या पेक्षा कितीतरी पट या एमएनसी देशाला लुटत आहे. त्यासाठी त्यांना भारताच्या भूक्षेत्रावर अधिकार करण्याची हि गरज नाही. 

एमएनसी कंपनीचे मुख्य धोरण नफा. त्या साठी साम दाम दंड आणि भेद ह्या सर्वांचा उपयोग करतात. नैतिकता नावाची वस्तू धंद्यात नसते  हे त्यांचे धोरण. प्रशासन आणि कार्यपालिकाला अनुकूल करा. स्वत:च्या फायद्यासाठी नियम कायदे बदलवून घ्या. मिडीयाला विकत घ्या. तिच्या मदतीने स्वदेशी कंपन्यांच्या विरुद्ध अफवा: पसरवा. आपले हेर तिथे प्लांट करून गडबड करा. शेवटी स्वदेशी कंपन्यांना शरणागती पत्करायला मजबूर करा.  

आपल्याला आठवत असेल थम्प्स अप, गोल्डस्पॉट, माजा, रिमझिम आणि केम्पाकोला  मोठे ब्रांड होतेच, त्या शिवाय अनेक स्थानीय ब्रांड बाजारात होते. सुरवातीला प्राईस वार. जास्ती फरक पडला नाही. दुकानातून काचेच्या बाटल्या उचलून मोठ्याप्रमाणावर फोडल्या गेल्या. बाटल्या बनविणाऱ्या कंपन्यांना जास्त पैसा देऊन अनुकूल केले. हे सर्व होत असताना, प्रशासन मूक दर्शक राहिला. छोट्या मोठ्या कंपन्या धुळीत गेल्या. मोठ्यांनीही परिस्थिती ओळखून शरणागती पत्करली. आज मोठ्या प्रमाणात जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक असलेले टोईलेट कोला भरपूर पैसे देऊन अशिक्षितापासून ते उच्च शिक्षित मोठ्या आनंदाने पितात.  

युनीलिवर कंपनीने हि अनेक साबण कंपन्या याच मार्गाने संपविल्या. अंकल चिप्स आणि इदुलेखा हे ताजे उदाहरण आहेत. सर्वांना खिश्यात घालण्याची आमची कुवत आहे. यांच्या निर्मित शीतल पेयांत उंदीर सापडले तरी चर्चा होत नाही. दंड हि जास्त होत नाही. यांचे उत्पाद परीक्षणात फेल झाले आणि बाजारातून परत मागविले तरी मीडियात चर्चा होत नाही. जास्तीसजास्त एखाद्या तेही हिंदी अथवा स्थानिक वर्तमान पत्रात कुठेतरी कोपर्यात बातमी दडलेली दिसेल. एमएनसी  स्वदेशी कंपन्यांना संपविण्यासाठी सर्व माध्यमांचा भरपूर प्रयोग करतात. त्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशात तर जयचंदांची कमी नाहीच. 

विदेशी कंपनींचे षडयंत्राविरुद्ध सर्वोच्च न्यायालया पर्यंत  लढा देण्यासाठी  विकोवज्रदंतीला कोट्यावधी खर्च करावा लागला. त्यांची प्रगती रोखण्यात एमएनसींना बर्यापैकी यश आले. या घटकेला एलोपेथी औषधांवर ४% टक्के (कारण अधिकांश विदेशी कंपन्या आहेत) व आयुर्वेदिक वर १२%. आयुर्वेदिक औषधी बनविणाऱ्या अधिकांश स्वदेशी कंपन्या आहेत, हे विशेष. 

नागाने फणावर काढण्या आधीच त्याला नष्ट केले पाहिजे. एमएनसींनी पतंजलि आयुर्वेदची स्थापने पासूनच तिला नष्ट करण्याच्या प्रयत्न सुरु केला. कामगारांना भडकविण्यापासून ते अनेक अफवाः पसरविण्याचे कार्य सुरु झाले. पतंजलि विरुद्ध शेकडो कसेस दर्ज केल्या गेले. कंपनीचे खाते हि अनेकदा सील झाले. ट्रक चालकांना भडकवून फूडपार्क वर हल्ला करविला. हे सर्व वार व्यर्थ गेल्यावर, शेवटचा उपाय मिडीयाचा उपयोग करून अफवा: पसरविणे. सर्वात मोठी अफवा: म्हणजे आवळा ज्यूस फेल झाले. या प्रश्नावर एका मिडिया समूहला उत्तर देताना आचार्य बाळकृष्ण म्हणाले, आवळा आमचा पहिला उत्पाद. एका आर्मी अधिकार्याचा एक रिपोर्ट पाहून गैरसमज झाला. आर्मीप्रती निष्ठा असल्यामुळे याहून अधिक आम्ही काही बोलणार नाही. आम्ही तो गैरसमज तत्काळ दूर केला. पण मिडीयाने मात्र तो उचलून धरला. सत्य पडताळण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. आता सोशल मिडियावर तर रोजच नवीन कहाण्या येतात. देशात गायीच नाही (तब्बल १२ कोटीहून जास्त आहे) तर तूप कुठून, जमणारे मध नकली असते इत्यादी. या सर्वांच्या मागे कोण आहेत हे आम्हाला माहित आहे. असो.

नुकतेच filpkart या भारतीय कंपनीने वालमार्ट समोर शरणागती पत्करली. या सर्वांचा परिणाम, ती कंपनी सुरवातीला स्वस्त: आणि नंतर महागातला कचरा भारतीय ग्राहकांना विकणार. 

एमएनसीचे षडयंत्र असफल करायचे असेल तर आपण अधिकाधिक भारतीय कंपन्यांचे उत्पाद वापरले पाहिजे. शीतल पेयांच्या जागी ताजे फळांचे रस प्या. मैगी नुडलच्या जागी स्वदेशी कंपनींचे खा. खाद्य पदार्थ, तेल,पर्यावरण अनकूल स्वदेशी प्रसाधन सामग्री वापरा. एवढे तरी आपण निश्चित करू शकतोच.

शेवटी सर्वांना स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा.


1 comment: