Monday, August 13, 2018

शतशब्द कथा: हडताल


शर्माजी एका  फैक्टरीत २० वर्षांपासून सुपरवायझर. "शर्माजी, मुलाला नौकरी पाहिजे असेल तर आमचा साथ द्यावा लागेल. उद्या हडताल" - नेताजी. 

फैक्टरीच्या बाहेर "जिंदाबाद मुर्दाबाद, नेताजी जिंदाबाद". पोलिसांनी शर्माजीसह ४०-५० कर्मचार्यांना बस मध्ये कोंबले. थोड्यादूर नेल्यावर सर्वांना सोडून हि दिले. आपण नेताजींना साथ दिला, उद्या मुलाला हि याच फैक्टरीत नेताजी निश्चित नौकरी लाऊन देतील.

दुसर्या दिवशी सकाळी, फैक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींचा हाती दिला. "फैक्टरीत तोडफोड, दंगा"....शर्माजी बरखास्त. "तोडफोड करणारे आमचे लोक नव्हतेच"- इति नेताजी.  शर्माजींच्या डोळ्यांसमोर अंधार. पगार नाही, पेन्शन नाही, कोर्ट-कचेरी...जेल. शर्माजीचा  संसार उध्वस्त झाला.

४० कंत्राटी कामगार कमी पगारावर, फैक्टरीत रुजू झाले.


No comments:

Post a Comment