Friday, April 13, 2018

दोन क्षणिका -गिधाडी चोचांं व आत्महत्या




 (१)

सुकलेल्या झाडावर
दुष्काळी छाया
लटकलेल्या प्रेतावर
गिधाडी चोचांं.

(२) 

शेतांत टाकले विष 
शेतांत उगवले विष 
विष पिउनी आत्महत्या 
करतो आज बळीराजा. 


१. शेतकर्याचे भल्याचे कार्य करण्याची फुरसत कुठल्या हि तथाकथित शेतकरी नेत्यांची नाही. त्या साठी पुरुषार्थ करावा लागतो. ते त्यांना जमणार नाही. प्रेतांवर लोणी  खाणे अधिक सौपे कार्य. दुर्भाग्य अधिकांश शेतकरी अश्याच नेत्यांच्या मागे धावतात. 

२. विषाक्त शेतीचा परिणाम बळीराजाला हि भोगावा लागतो. पहिले विषाक्त शेती नव्हती,बळीराजा आत्महत्या हि करत नव्हता. विषाक्त शेती महागात पडते, खाणार्यांच्या शरीरात विष जाते हे वेगळे. शेवटी कर्जबाजारी होऊन शेतकरी हि आत्महत्या करतो. 

2 comments:

  1. शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्याच्याशी निगडीत प्रश्न हा एक खूप मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे. तुम्ही दुसऱ्या चारोळीत मांडला "शेतात टाकले विष, उगवले विष" हाही विषय खूप महत्वाचा आहे. ऑर्गानिक शेती, रासायनिक खतांना आणि फवारणीला आळा बसणं खूप आवश्यक आहे. लोक हळू हळू ऑरगॅनिक शेतीकडे वळत आहेत, ऑरगॅनिक प्रोडक्टकडे वळत आहेत. पण अजूनही ऑरगॅनिक प्रोडक्ट बाजारात महाग विकले जात असल्याने त्यांना सर्वसाधारण मान्यता मिळणं अवघड होत आहे. कॉस्ट इफेक्टिवनेस ही तुर्तास तरी भारतासारख्या समाजात काळाची गरज आहे.

    ReplyDelete
  2. व्यवसायिक शेती करणारे शेतकरी ऊस कापूस इत्यादी रिस्क घ्यायला तैयार नाही. गेल्याच आठवड्यात उतराखंडच्या छोटी पोखरी नावाच्या गावात दुप्पट उत्पन्न देणाऱ्या मिरचीचे बियाणे व जैविक खत किटनाशक गट शेतीसाठी दिले. महाराष्ट्रात पद्मश्री सुभाष पालेकर यांनी या बाबतीत भरीव कार्य केले आहे.

    ReplyDelete