कॅन्डल मार्च नाही काढला
कुणी नेत्याने माझ्यासाठी.
शर्मसार नाही झाला
धर्म कुणाचा माझ्या साठी.
रान नाही उठविले जगभर
पेड मिडीयाने माझ्यासाठी
मोर्चे नाही निघाले मला
न्याय मिळवून देण्यासाठी .
माझा काहीच उपयोग नव्हता
वोट बँक राजनीती साठी.
(प्रत्येक बलात्कार घृणित असतो. बलात्कारीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण आपल्या देश्यात बलात्कारचा उपयोग घृणित राजनीती साठी होतो. पीडिता आणि बलात्कारीच्या धर्माच्या आधारावर ठरविल्या जाते कि शांत राहायचे कि हल्ला करायचा. घृणित वोट बँक राजनीती).
No comments:
Post a Comment