(१)
कवी दरबारात गेला
चारण-भाट तो झाला
खोटी प्रशस्ती गायली
कवी कोट्याधीश झाला.
(२)
कवी अरण्यात गेला
प्रकृती सवे रमला
स्वान्त:सुखाय रचना केली
महाकवी तो झाला.
(३)
कवी बाजारात गेला
शून्य भाव मिळाला
शून्याने केली निर्मिती
कवी सृष्टा झाला
सृष्टा: जगाची निर्मिती करणारा
No comments:
Post a Comment