डिस्कव्हरी जीत स्वामी रामदेव वर आधारित मालिका पाहत होतो. एका आंग्ल मिडियमच्या प्रस्थापित शाळा. शाळेचा मुख्य सिद्धांत आमची शाळा सर्वश्रेष्ठ आमचे विध्यार्थी सर्वात पुढे, कधी पराजित न होणारे. चांगले मार्क्स मिळविणार्या विध्यार्थांना विदेशात शिक्ष्णासाठी शाळा पाठविणार. सूर्या नावाचा एक हुशार विद्यार्थी. एक प्रतियोगिता जिंकण्याचा दबाव त्याच्यावर आहे. ती जिंकली तर शाळा त्याला विदेशात शिक्षणासाठी पाठविणार. याच सर्व दबावामुळे, ऐनवेळी त्याची स्मरणशक्ती दगा देते. शाळा पराजित होते. विदेशात जाण्याचे त्याचे स्वप्न भंग होते. आपण नालायक आहोत, काहीच करू शकत नाही. याच हीन भावनेने ग्रस्त हा विद्यार्थी आत्महत्या करतो.
दोन दिवसांनी वर्तमान पत्रात बातमी वाचली. नवव्या वर्गात एक
विध्यार्थिनी नापास झाली. "मी मूर्ख आहे, मी पराजित झाली, मी स्वत:शीच
घृणा करते. असे लिहून तिने आत्महत्या केली. वहीत लिहिताना स्वत:च्या
नावापुढे तिने डॉक्टर हे बिरूद लावले होते. टीवी वर समाचार पाहताना लक्षात आले बहुतेक तिच्या पालकांची ती डॉक्टर बनावी अशी इच्छा होती. स्वत:ची अपूर्ण इच्छा, मुलांद्वारे पूर्ण करण्याची
मानसिकता ठेवणारे पालक, शाळेचे प्रबंधक आणि मैकाले द्वारा प्रस्थापित
शिक्षणपद्धती. ह्या सर्वांचा परिणाम विध्यार्थीनीची आत्महत्या.
स्वत:च्या पायावर उभे राहणारे व्यक्तिमत्व घडविणारी आपली गुरुकुल पद्धती नष्ट करून मैकाले महोदयांनी नवीन शिक्षणपद्धती आपल्या देशात रुजवली. या नवीन शिक्षणपद्धतीचा उद्देश्य सरकारी सेवेसाठी क्लार्क पासून अधिकारी निर्माण करणे. त्या अनुषंगाने शालेय सिलेबस तैयार केले गेले. आज हि आपण हीच शिक्षण पद्धती वापरतो आहे. याच शिक्षणपद्धतीमुळे मी सरकारी नौकर झालो. दुसर्या शब्दांत नौकरी/ गुलामगिरी करण्यासाठी तैयार केलेले एक आकर्षक पेकेज म्हणजे आजची शिक्षणपद्धती.
मी दिल्लीत पाहतो, सरकारी कारकून असो किंवा छोटे छोटे दुकानदार हि आपल्या मिळकतीचा अधिकांश भाग मुलांचा शिक्षणावर खर्च करतात. मोठे डोनेशन देऊन प्रतिष्ठित शाळेंत मुलांना प्रवेश मिळवून देतात. उद्देश्य मुलगा या शाळेत शिकेल तर डॉक्टर किंवा इंजिनिअर बनेल. विदेशात जाईल. समजा विदेशात जायला नाही मिळाले, डॉक्टर व इंजिनिअर नाही बनला तरीही या प्रतिष्ठित शाळेत शिकला आहे, याच आधारावर त्याला चांगली सरकारी नौकरी किंवा निजी क्षेत्रात नौकरी मिळेल. या शिक्षणपद्धतीत व्यक्तिगत स्वार्थाला महत्व आहे. ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीचे ऋण फेडण्याच्या कर्तव्याची जाणीव हि शिक्षणपद्धती देत नाही.
आता विशिष्ट प्रतिष्ठित शाळेत/ कॉलेजमध्ये शिक्षणाचा आणि नौकरीचा काय संबंध? एका IAS अधिकारी ज्याच्या सोबत मी कार्य केले होते. एकदा मी प्रश्न विचारला, साहेब आपण दक्षिण दिल्लीत रहात होता मग उत्तरी दिल्लीतल्या विशिष्ट कोलेज मध्ये अडमिशन का घेतली? तो म्हणाला त्याने बीए (इतिहास) हा विषय घेऊन IAS तैयारी सुरु केली.
विशिष्ट शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेतले असेल तर सरकारी नौकरी नव्हे
तर निजी क्षेत्रातल्या नौकरीच्या इंटरव्यू मध्ये चांगले मार्क्स मिळतात. अर्थात नौकरीची मिळण्याची शक्यता जास्त. हे वेगळे त्या वेळी त्याला विशिष्ट कालेजमध्ये बसमधून जायला २ तास आणि यायला २ तास लागायचे.
अधिकांश पालक याच उद्देश्याने आपल्या मुलांना अश्या शाळेत टाकतात. शाळा संचालकांना हि पालकांचा हा उद्देश्य माहित असतो. ते हि विद्यार्थांवर चांगले मार्क्स आणण्यासाठी भरपूर दबाव टाकत राहतात. पालकांचेही आपण भरपूर पैसा खर्च करतो, तर मुलाने हि चांगले मार्क्स आणले पाहिजे. विद्यार्थीच्या मनात काय आहे, त्याचे स्वप्न काय, त्याला भविष्यात काय करायचची इच्छा आहे, याचा विचार कुणीच करीत नाही. फक्त पेकेजच्या अनुसार विशिष्ट पद्धतीने मुलाने शिकले पाहिजे, हाच या शिक्षणपद्धतीचा हेतू. जो विद्यार्थी या शिक्षणाच्या पकेजच्या हिशोबाने प्रदर्शन करण्यास असमर्थ ठरतो तो निराश होऊन आत्महत्या करतो. गुलाम आणि नौकर पैदा करणारी आजची हि शिक्षण पद्धती. विद्यार्थांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे शिक्षण या व्यवस्थेत नाही.
या शिक्षणपद्धतीच्या आहारी जाऊन पालक मुलांना आंग्ल मिडीयमच्या विशिष्ट प्रसिद्ध शाळेंत टाकतात. आपले पालक आपल्यावर भरपूर पैसे खर्च करतात, पण आपण त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहोत. नापास झाल्यास कुणाला हि तोंड दाखविण्या लायक राहणार नाही. आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपल्याला कुठेही नौकरी मिळणार नाही. आपल्या पालकांना हि लोक नवे ठेवतील. आपण लोकांना तोंड दाखवायच्या लायक नाही. ह्या भावनेने ग्रस्त निराश विद्यार्थी आत्महत्या करतो.
खरे म्हणाल तर, आजच्या युगात हि शिक्षणपद्धती निरर्थक झाली आहे. हा विचार न तर पालक करतात न हि शिक्षण विकणारे दुकानदार करतात. विद्यार्थांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे शिक्षण देणारी शिक्षणपद्धती आणण्याची काळाची गरज आहे. या शिवाय शिक्षणाचा उपयोग तो स्वत: आणि देशासाठी कसा करणार याचे ज्ञान हि त्याला मिळाले पाहिजे. त्या शिवाय विद्यार्थांच्या आत्महत्या थांबणार नाही.
व्यवस्था आपली शिक्षणपद्धतीत मूलभूत बदल करेल हि आशा व्यर्थ आहे. निजी क्षेत्रातल्या शिक्षण संस्था हे कार्य करू शकतात. आज स्वामी रामदेवांनी आचार्यकुलंच्या माध्यमातून प्राचीन आणि आधुनिक ज्ञानावर आधारित नवीन शिक्षणपद्धती सुरु केली आहे. जिथे विद्यार्थी शिक्षणासोबत शारीरिक आणि मानसिकरूपेण सक्षम होतील. स्वत:च्या पायावर उभे राहतील आणि स्वत:ला आणि देशाला समृद्ध बनवतील.
No comments:
Post a Comment