नवीन वर्षाच्या शुभ दिवसापासून आपण स्वदेशीचा संकल्प केला पाहिजे. दैनदिन उपयोगासाठी स्वदेशी कंपन्यांचा वस्तू वापरल्या पाहिजे. विदेशी कंपन्या या देशात नफा कमविण्यासाठी आल्या आहेत. मोठे नाव आणि शरीराला अपायकारक कचरा वस्तू विकतात. मजा म्हणजे अधिकांश शिक्षित उच्चशिक्षित लोग हा कचरा आनंदाने घेतात. रोगी झाल्यावर विदेशी औषधी हि विकत घेतात.
प्राकृतिक पदार्थांनी बनलेले टूथपेस्ट, शेम्पू, तेल, साबण, शेविंग क्रीम, फेसवाश, सर्व शृंगाराच्या वस्तू. ज्या वर हिरवे निशाण असते. त्या शरीराला हानिकारक नसतात. आपल्या अनेक स्वदेशी उद्योग डाबर, हिमालय, विको आणि पतंजलीचे तर सर्व वस्तू प्राकृतिक पदार्थांपासूनच बनतात. घरीझाडू पोंछासाठी गौमूत्र, कडूलिंब, युकेलिप्टसच्या तेल असलेले,गोनाइल वापरा. स्थानीय गौशाला, खादी ग्रामोद्योग व पतंजली गौनाईल विकतात. संडास स्वच्छ करण्यासाठी प्राकृतिक पदार्थांनी बनलेले टोईलेट क्लीनर वापरा.
अधिकांश मध्यमवर्ग व उच्चवर्ग रोजच्या उपयोगात रिफाइंड तेल वापरतात. तेल बियातून अधिकांश तेल काढण्यासाठी कंपन्या अधिकांश विदेशी रासायनिक पदार्थ वापरतात व फिल्टर करून विकतात. कंपनीला मुनाफा जास्त होतो. याच तेलाला रिफाइंड तेल असे म्हणतात. आपल्या देशात हृदयरोगाचे मुख्य कारण हे रिफाइंड तेल आहे. मजेदार गोष्ट अमेरिका व युरोपियन देशात फिल्टर केलेले वर्जिन तेल जास्त वापरतात. स्वस्तात मिळणारे विदेशी पामोलीन तेल जे आजकाल अधिकांश हॉटेलांमध्ये व अज्ञानमुळे लोक घरात वापरतात. स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक आहे. आज ७०% विदेशी पामोलीन देशात वापरले जाते. परिणाम आपल्या शेतकर्यांना तेल बियांचा भाव मिळत नाही व खाणारे लोग हि बिमार होतात. महाराष्ट्रात आपण मूंगफली व तिळाचे तेल जास्त खातो. काही महिन्यांपासूनआपल्या देशात हि एक स्वदेशी कंपनी फिल्टर केलेले वर्जिन तेल विकते. आजकाल मी तेच विकत घेतो आहे.
आता उन्हाळा सुरु झाला आहे, पेप्सी, कोकच्या जागी, खस, ब्राह्मी, आंब्याचे पने, गुलाब आणि बेलाचे शरबत हि स्वदेशी कंपन्या विकतात. हे शरबत स्वास्थ्यासाठी हि चांगले असतात. या शिवाय उन्हात फिरताना कोल्ड ड्रिंक्स एवजी स्वदेशी कंपनींचे लस्सी आणि छाछ हि पिऊन तहान भागवू शकतो आणि लू पासून हि आपले संरक्षण होते. दिल्लीत आजकाल अधिकांश सरकारी बाबू लंचमध्ये मदर डेरी आणि अमूलची लस्सी व छाछ पितात. पण दुर्भाग्य नवीन पिढी पिझ्झा आणि कोक मध्येच बुडालेली आहे.
पॅक बंद फळांचा रस असो व टोमाटो प्युरी विदेशच्या जागी स्वदेशी कंपनींचे वापरले पाहिजे. (चीनच्या शेतकर्यांच्या जागी भारतीय शेतकर्यांचा फायदा झाला पाहिजे).
स्वदेशी वस्तू वापरल्याने देशातील शेतकर्यांचा हि फायदा होतो. आपल्याला हि चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू स्वस्तात मिळतात. आज पासूनच स्वदेशीचा संकल्प केला तर देशात लाखो रोजगार तैयार होतील. बळीराजाला आत्महत्या करावी लागणार नाही. प्रत्येकाला जेवढे जमेल तेवढे स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे.
टीप: जर ३० कोटी लोक हि गौनाईल वापरू लागले, अर्थात रोज १ कोटी लिटर गौनाईल. तर घर तर स्वच्छ होईल, शिवाय शेतकर्यांची आमदनी हि वाढेल. गौमूत्र हि आजकाल ७-८ रु प्रती लिटर विकल्या जाते. उतराखंड येथील शेकडो शेतकर्यांना आज फायदा मिळतो आहे. शिवाय पाण्याचे प्रदूषण हि कमी होणार.
टीप: जर ३० कोटी लोक हि गौनाईल वापरू लागले, अर्थात रोज १ कोटी लिटर गौनाईल. तर घर तर स्वच्छ होईल, शिवाय शेतकर्यांची आमदनी हि वाढेल. गौमूत्र हि आजकाल ७-८ रु प्रती लिटर विकल्या जाते. उतराखंड येथील शेकडो शेतकर्यांना आज फायदा मिळतो आहे. शिवाय पाण्याचे प्रदूषण हि कमी होणार.
No comments:
Post a Comment