Monday, March 19, 2018

आनंदवन : दिव्यांग - दान नको घामाचे दाम द्या


 (आनंदवन बघितल्या वर, मला जे वाटले तेच शब्दांत मांडले आहे)

फरवरी २३ ला आनंदवन येथे गेलो होतो. आनंदवन म्हणजे भारतातील सर्वात स्वच्छ सुंदर व स्वयंपूर्ण  गाव म्हंटले तरी चालेल. दानावर आधारित कुठली हि संस्था जास्त काळ जगू शकत नाही.  स्वामी रामदेव यांनी आपल्या प्रवचनांत एकदा म्हंटले होते 'धर्मस्य मुले अर्थ'  याच्या अर्थ कुठले हि सामाजिक कार्य करायचे असेल तर त्या साठी अर्थ हे लागणारच. त्याच अर्थासाठी दीड हजाराहून जास्त दिव्यांग आनंदवन येथे कठीण पुरुषार्थ करतात. त्यांच्या पुर्षार्थाला योग्य मोबदला मिळाला तर दानाची गरज लागणार नाही. 

आनंदवन येथे दिव्यांगजन  हस्तशिल्प (चित्र, लाकडाची खेळणी व शिल्प), हंडलूम वर वस्त्र तैयार करणे, शेती, गोशाला, कॅन्टीन, चप्पल मेकिंग, व्हील चेअर मेकिंग  इत्यादी इत्यादी अनेक प्रकारची कार्य दिव्यांग जन करतात. वेळ कमी होता म्हणून पूर्ण आनंदवन पाहताआले नाही. 

आनंदवन येथे होममेड कागदांपासून ग्रीटिंग कार्ड्स आणि लग्नाच्या पत्रिकांची हि निर्मिती होते. याच विभागात श्री रमेश अमरु (टेलीफोन न. 090110 94604) यांची भेट झाली.  मी दिल्लीहून आलो हे कळळ्यावर त्यांनी सहज म्हंटले आम्हाला आजपर्यंत दिल्लीहून ऑर्डर्स मिळाल्या नाहीत. मला ओशाळल्या सारखे झाले. अधिकांश दिल्लीकर मराठी लग्नात ५ ते १५ लाख फक्त मेजवानीवर खर्च करतात. तरीहि काही तरी उत्तर द्यायचे  म्हणून मी म्हंटले, बहुतेक लोकांना माहित नाही. आता हे कार्य तुम्हीच करा. त्यांनी माझा ई-मेल घेतला.  २५ला  दिल्लीत परतलो. २७ला   डॉक्टर विकास आमटे यांची मेल आली.  त्यात ग्रीटिंग कार्ड्सचे 92   नमुने हि पाठविले. सोबत किमंत हि (किमान २० रुपये ). (आपला ई-मेल दिला तर मला आलेली ईमेल पाठवू शकतो ) लग्नपत्रिका हि किमान ५० रुपये.

आपण  लग्नात नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण देण्यासाठी  ३०० ते ५०० पत्रिका हि लागतात किमान १०० लग्न पत्रिकांची ऑर्डर आनंदवनला दिली तरी जास्तीसजास्त दिव्यांग लोकांना रोजगार मिळेल. तसेच ग्रीटिंग कार्ड्स चे ऑर्डर हि देऊन या कार्यात हातभार लावू शकतात.   ग्रीटिंग कार्डवर चित्र काढण्यासाठी केळीचे व इतर वनस्पतींच्या पाने इत्यादीचा वापर केल्या जातो.  एक नमुना खाली देतो आहे. 

e


तसेच भिंतीवर टांगण्यासाठी व कार्यालयाची शोभा वाढविण्यासाठी दिव्यांग लोकांनी काढलेल्या  पेंटिंग्ज हि मिळतात. (३०० रुपयांपासून सुरवात होते). 

आशा आहे वाचक यावर सकारात्मक दृष्टीने विचार करतील. 


अधिक विचारपूस करण्यासाठी डॉक्टर विकास आमटे यांचा ई-मेल व पत्ता खाली देतो आहे.



Dr. Vikas Amte
Secretary,
Maharogi Sewa Samiti, Warora,
At & Post : ANANDWAN - 442 914
Tahsil: Warora , Dis
trict: Chandrapur, 
Maharashtra, India
vikasamte@gmail.com

श्री रमेश अमरु (Shri Ramesh Amru)(टेलीफोन न. 090110 94604)





No comments:

Post a Comment