सन १९७०-७२चा काळ. जुन्या दिल्लीत नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे मंदिर होते. मंदिराच्या प्रांगणात शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक / जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे. मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी मंदिर सकाळी १० पर्यंत उघडे राहात होते. मंदिराच्या बाहेर एका पायाने अधू असलेली भिकारीण भिक मागण्यासाठी बसत होती. तिची कहाणी हि अत्यंत दारूण होती. जवळपास दोन एक वर्षांपूर्वी आपल्या नवर्यासोबत ती मजदूरी करायला जुन्या दिल्लीत आली होती. पण वर्षी तिचा नवरा अपघातात वारला आणि तिचा ही एक पाय कापावा लागला. त्या वेळी ती गदोदर होती. आजू बाजूच्या लोकांनी काही काळ मानवीय आधारावर तिला मदत केली. पण लोक तरी किती काळ मदत करणार. नाईलाजाने आता आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन मंदिराच्या बाहेर सकाळी भिक मागते. कहाणीचे दुसरे पात्र लक्ष्मीचंद. लक्ष्मीचंद नित्य नेमाने महादेवाला दुधाचाअभिषेक करायचे. लग्नानंतर बरीच वर्ष लक्ष्मीचंद यांना मुल झाले नव्हते. कुणीतरी त्यांना रोज महादेवाचा दुधाने अभिषेक करायला सांगितले. महादेवाच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्ती झाली म्हणून मुलाचे नाव शिवप्रसाद ठेवले. शिवप्रसाद चार-पाच वर्षांचा असताना लक्ष्मीचंदच्या बायकोचे निधन झाले. लक्ष्मीचंदने पुन्हा दुसरे लग्न केले नाही. शिवप्रसादच्या आजीने त्याला आईची कमी भासू दिली नाही. इतर दिल्लीकर मुलांप्रमाणे शिवप्रसादला हि रात्री झोपण्या आधी एक मोठा पेला गरम दूध पिण्याची सवय होती. शिवाय त्याची आजी रात्री त्याला रामायण, महाभारत, पुराणातल्या गोष्टी सांगायची. सकाळी शाळेत जाताना शिवप्रसादची आजी त्याला १० पैशे खाऊ साठी हि द्यायची. बहुतेक वेळा तो ते पैशे आपल्या मातीच्या गुल्लकीत टाकायचा.
लक्ष्मीचंदला काही कामा निम्मित ७-८ दिवसा करता परगावी जावे लागले. मुलगा मोठा झाला, किमान एकटा मंदिरा पर्यंत जाऊ शकतो. परगावी जाताना त्यांनी शिवप्रसादला रोज सकाळी महादेवाला दुग्धाभिषेक करण्याची जिम्मेदारी दिली. सकाळी ऊठून आंघोळ करून शिवप्रसाद एक तांब्याचा गिलास घेऊन घरातून बाहेर पडला.
नवी बस्तीत एक दूधवाल्या भैयाचे दुकान होते, तेंव्हा गायीचे दूध २ रुपये किलो असेल. शिवप्रसादच्या तांब्यात त्याने १०० मिली लिटर अर्थात २० पैश्याचे दूध टाकले. दूध घेऊन शिवप्रसाद मंदिराच्या जवळ पोहचला. मंदिराच्या बाहेर बसलेला एक म्हातारा भिकारी आणि पायाने अधू असलेलील भिकारीण दिसली. तिच्या खांद्यावर ७-८ महिन्याचा हडकुळा मुलगा होता. तो जोर जोरात रडत होता. शिवप्रसादच्या कानात म्हातार्या भिकार्याचे शब्द पडले. किती वेळापासून मुलगा रडतो आहे दुध का नाही पाजत. ती भिकारीण म्हणाली 'दूध होवे जो पिलाऊँ'. त्या वर म्हातारा भिकारी शिवप्रसाद कडे पाहत उतरला, कैसा जमाना है, पत्थर पर चढाने के लिए दूध है, पर ज़िंदा बच्चे के लिए नहीं. ते शब्द ऐकून शिवप्रसादला विचित्र वाटले. मंदिरात येऊन त्याने पाय धुतले. महादेवावर दुग्धाभिषेक केला. शिवाच्या पिंडीवर टाकलेले दूध एका छिद्रातून नालीत वाहून जाताना पाहून त्याला म्हाताऱ्या भिकारीचे शब्द आठवले, शेवटी दूध नालीत वाहून गेले, त्या पेक्षा त्या भिकारीणला दिले असते, तिच्या पोराचे पोट भरले असते. त्याने मंदिरात आत जाऊन त्याने राधा-कृष्णाचे दर्शन घेतले, पुजारीने प्रसाद म्हणून खडीसाखर त्याच्या हातावर ठेवली. पण खडीसाखर काही त्याला गोड लागली नाही. त्या दिवशी शिवप्रसादला काही चैन पडले नाही. अभ्यासातही लक्ष लागले नाही. सतत त्या भिकारीणच्या हडकुळ्या पोराचे चित्र डोळ्यांसमोर येत होते. त्याला जर दूध नाही मिळाले तर तो भुकेने मरून जाईल. महादेवाला दूध वाहण्या एवजी त्याला पाजले तर... पण वडिलांच्या आज्ञेचे काय होईल.???
काय करावे त्याला सुचेनासे झाले. रात्री झोपायचा वेळी त्याला आजीने सांगितलेली महात्मा आणि गाढवाची गोष्ट आठवली. त्याने आजीला विचारले, आजी त्या महात्म्याची गोष्ट सांगना, ज्यानी गाढवाला गंगाजळ पाजले होते. आजी गोष्ट सांगू लागली, महादेवावर अभिषेक करण्यासाठी तो महात्मा गंगाजळाची कांवड घेऊन, महादेवाच्या दर्शनासाठी निघाला होता. रस्त्यात वाळवंटात एक गाढव पाण्याविना तडफडताना महात्म्याला दिसले. महात्म्याने क्षणभरचा विचार न करता, कांवडीतले गंगाजळ त्या गाढवाला पाजले. गाढवाचे प्राण वाचले. शिवप्रसादने आजीला विचारले, आजी, महादेवाच्या अभिषेकासाठी आणलेले गंगाजळ त्या महात्म्याने गाढवाला पाजले, महादेव रागावला नाही का त्याच्यावर. आजी हसून म्हणाली, महादेव का बरे रागावेल. महात्म्याने एका प्राण्याचा जीव वाचविला. गाढवाचे प्राण वाचवून महात्म्याने एका रीतीने महादेवाचा अभिषेकच केला होता. मनुष्य असो वा प्राणी जीव वाचविणारा सर्वात मोठा पुण्यात्मा. आजीचे उत्तर ऐकून शिवप्रसादला चैन पडले. रात्री तो शांत झोपला. दुसर्या दिवशी सकाळी ऊठून, स्नान करून तो मंदिरात जायला निघाला. पेल्या कडे बघताना त्याच्या लक्ष्यात आले थोड्याश्या दुधाने काही मुलाचे पोट भरणार नाही. थोडे दूध आणखीन विकत घ्यावे लागेल. थोड्यावेळ विचार केल्यावर त्याला एक कल्पना सुचली, तो आजीला म्हणाला, आजी, खाऊचे पैशे आत्ता देते का? "कशाला, शिव". मला पण महादेवाला अभिषेक करायचा आहे. पण बाबांच्या पैश्याने नाही, माझा खाऊच्या पैश्यानी. माझा गुणाचा ग, बाळ म्हणत आजीने त्याच्या हातावर १० पैशे ठेवले.
शिवप्रसाद दूधवाल्या भैयाचा दुकानात पोहचला. भैयाने नेहमीप्रमाणे २० पैश्याचे दूध पेल्यात टाकले. शिवप्रसादने त्याला १० पैश्याचे दूध आणखीन टाकायला सांगितले आणि १० पैशे दिले. भैया म्हणाला, पैशे कशाला, खात्यात टाकून देईल. शिवप्रसाद म्हणाला खाते वडिलांचे आहे, माझा हिशोब नगदीचा. भैयाने चुपचाप १० पैशे खिश्यात टाकले. तो मनातल्या मनात पुटपुटला, बनियाची पोरं हिशेबात पक्के असतात. म्हणूनच हे कधी धंद्यात मार खात नाही.
शिवप्रसादमंदिराजवळ पोहचला. ती भिकारीण तिथेच बसलेली होती. शिवप्रसादने पेल्यातले दूध तिच्या कटोर्यात ओतले अणि तिला म्हणाला बच्चे को पिला देना. जुगजुग जियो बेटा भिकारीण पुटपुटली. वेगळ्याच उर्मीने फटाफट मंदिराच्या पायर्या चढून शिवप्रसाद मंदिरात पोहचला. नळाच्या पाण्याने पेला भरला आणि पाण्याच्या अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत मनातल्या मनात पुटपुटला, महादेव माफ कर मला, मी वडिलांची आज्ञा मोडली. पण मी काही चूक केले नाही, हे तुला माहित आहे. असेच पुढचे सहा-सात दिवस निघून गेले. त्या दिवशी संध्याकाळी वडील घरी परतले. शिवप्रसादने वडिलांच्या नजरेला नजर देणे टाळले. रात्री झोपताना तो आजीला म्हणाला, आजी एक सांगायचे आहे, मी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्याएवजी ते दूध त्या भिकारीणला देत होतो. तिच्या छोट्या मुलासाठी. तेवढे दूध पुरणार नाही, म्हणून आपल्या खाऊच्या पैशे दूधासाठी मोजत होतो. आजी तूच म्हणाली होती ना, कुणाचे प्राण वाचविणे सर्वात मोठे पुण्य. उद्या बाबांनी विचारले, तर मी खोट कसं बोलणार, तूच म्हणते ना! खोट बोलणे पाप असते. माझी काही हिम्मत नाही, बाबाना सांगायची, तूच बाबाना सांग ना मी काही चूक केली नाही. आजीने शिवला आपल्या कुशीत घेतले आणि म्हणाली, बाळ, तू काही चूक केले नाही, बाबा कशाला तुला रागवतील.
दुसर्या दिवशी शिव सकाळी जरा लवकरच उठला. त्याचे वडील झोपलेलेच होते. शिवने पट्कन आंघोळ केली आणि रोजच्या प्रमाणे आजीकडून पैशे घेऊन मंदिरात गेला. मंदिरातून परतल्यावर त्याने नाश्ता केला आणि दफ्तर खाद्यावर घेऊन शाळेत जाण्यासाठी तैयार झाला. वडिलांनी त्याला हाक मारली. भीत-भीत तो वडिलांच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या हातावर १० पैशे ठेवत लक्ष्मीचंद म्हणले, बेटा हे खाऊ साठी. क्षणभर शिव प्रसाद आपल्या वडिलांना बघत राहिला आणि त्याला रडू कोसळले, तो वडिलांना जाऊन बिलगला. रडता-रडता म्हणाला, बाबा मी तुमच्याशी खोट... लक्ष्मीचंद शिवप्रसादच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाले, एक अक्षर बोलू नको बेटा, तू महादेवाचा खरा अभिषेक केला आहे. खरोखरच तू महादेवाचा प्रसाद आहे, बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाह लागले. त्या दिवशी प्रथमच लक्ष्मीचंद यांनी महादेवाचा खरा अभिषेक केला होता.

No comments:
Post a Comment