Sunday, May 22, 2016

ययाति- पुन्हा एकदा



दिल्लीचे वाढते प्रदूषण असो वा  महाराष्ट्राचा  दुष्काळ, कारणीभूत आपणच  आहोत.  जो पर्यंत मनुज पुत्र धर्तीवर असलेल्या अन्य जीवनालाही मग जीव जंतू असो वा वनस्पती, जगण्याचा हक्क आहे, हे मान्य करत नाही, असे परिणाम भोगावेच लागेल.  माझी एक जुनी कविता पुन्हा एकदा.....

क्षमा, दया आणि सहिष्णुता
आहेत मानवतेची भूषणं
आहे त्यागसहित भोगच
मानव जीवनाची सार्थकता हे जाण.
इति ऋषि वचन.

पाहुनी चिरकुमारी
अक्षय अखंडित वसुन्धरेला
विसरून गेला
ययाति ऋषि वचनाला. म्हणाला,
"क्षमा आणि दया
आहे दुर्बलांचे वचन
वसुंधरा आहे वीरभोग्या 
दुर्बलांना नाही इथे
अधिकार जगण्याचा."

पायदळी तुडवलं त्यानी
शुद्रतम जीवनं
मोठी होती बनली तीही
मृगया मनोरंजनाची साधनं.

राक्षसी अट्टाहास करीत
विक्षिप्त बलात्कारी मनुष्य
तुटुन  पडला धरतीवरी
टर्र फाडली की तो त्यानी
वसुधेची वसने पूरी.


धरतीच्या कोमल हृदयात हि
खोल रुतवले अपुले राक्षसी दात
सर्वत्र पसरल्या घावांतून
विषाक्त वायु पसरु लागला
प्राण त्यात ययातिचाही
कासाविस मग झाला.

स्वर्गस्थ देव ओरडले
"धरणीशी बांधली आहे
तुझ्या जीवनाची गाठ
त्यागून भोगाचा वसा
वाचव आपल्या धरणीला".

बघुन धरतीची दशा
करू लागला ययाति विचार
की शोधली पाहिजे आता
अंतरिक्षात  दूसरी धरा कुठे तरी दूर.

किंवा
आपल्या शक्तिने देवताना करेन च्युत
मग भोगू शकेन स्वर्णिम स्वर्गातुन
अप्सरांना  नित-नवीन.
कदाचित!अक्षय अमृताचे पात्रच
भागवू शकेल माझी तहान.

काळातच दडलेलं आहे
भाग्य मनुष्य पुत्राचं
त्यजुन नीच भोग मार्ग
धरेल का ययाति
त्याग-तपस्येचा मार्ग?

की हरवून जाईल
मनुष्य पुत्र
अंतरिक्षाच्या असीम
अंधारात?

सध्या तरी ययाति
किं कर्तव्यमूढ़.
विचारात.   

No comments:

Post a Comment