Monday, October 1, 2018

स्वदेशी: गांधी ते रामदेव


सन १८७६ मध्ये सर्व प्रथम स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वराज्य आणि स्वदेशीची उद्घोषणा केली होती. स्वदेशी वस्त्र व वस्तू वापरण्यावर भर दिला होता. स्वतंत्रता मिळण्याच्या आधी महात्मा गांधीनी स्वदेशीच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. आज तोच प्रयत्न   स्वामी रामदेव सफलता पूर्वक करत आहे.

बंग भंग नंतर, महात्मा गांधीजींनी ब्रिटीशांचा विरोध करण्यासाठी देशातील समस्त जनतेला एका मंचावर आणण्यासाठी स्वदेशीचा बिगुल फुंकला. त्यासाठी स्वदेशीचा मंत्र जनतेला दिला. विदेशी वस्त्रांची होळी आणि खादीचा प्रसार, हे दोन शस्त्र  त्यासाठी  वापरले.  जनतेचा प्रचंड प्रतिसाद हि मिळाला. जागोजागी लोकांनी विदेशी वस्त्रांची होळी जाळली. कांग्रेसमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हि खादी वस्त्र परिधान करणे सुरु केले.  महात्मा गांधींजींचा मुख्य उद्देश्य, ब्रिटीश शासकांविरुद्ध जनतेला एका मंचावर एकत्रित करण्याचा होता.  हा उद्देश्य ह्या अस्त्रांमुळे  सफल झाला.  


अधिकांश नेता गांधीजींसोबत मंचावर खादीचे वस्त्र परिधान करून विराजमान व्हायचे आणि रात्री विदेशी वस्त्र परिधान करून सूर, सुरा व सुंदरी  सोबत जगण्याचा आनंद हि घ्यायचे. इथेच स्वदेशी आंदोलन तोंडघशी पडले. प्रजा हि आपल्या नेत्यांचे अनुसरण करते. लोकांनी विदेशी वस्त्र आणि विदेशी वस्तू वापरणे सुरु केले. विदेशी वस्तूंचा बहिष्कार, हे फक्त राजनीतिक अनुष्ठानच्या रुपात उरले.

भारत स्वतंत्र झाला. वाटले होते खादी आणि स्वदेशीला अच्छे दिन येतील. सरकारने हि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगची स्थापना केली. पण ग्रामीण भागात निर्मित उत्पादांचा दर्जा सुधारणे व लागत कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. काही काळातच सरकारी अनास्था मुळे  हे फक्त एक धार्मिक अनुष्ठान ठरले. 

या शिवाय शून्य तकनिकी क्षेत्रात विदेशी निवेशला प्रोत्साहन देण्याची सरकारी नीती हि स्वदेशीसाठी घातक ठरली. आज आपण टूथपेस्ट, साबण, शेम्पू, फिनायाल, toilet क्लीनर, थंड पेय, सर्व किराणा कणकी पासून ते खाद्य तेलांपर्यंत, लहान बाळांच्या लंगोटी पासून ते म्हातार्या माणसांचे वस्त्र पर्यंत, शेतात वापरणार्या बियाणांपासून ते कीटनाशक पर्यंत सर्व विदेशी कंपन्यांनी निर्मित केलेले उत्पाद वापरतो. परिणाम शेतकरी आत्महत्या, ग्रामीण भागांतून पलायन व वाढती बेरोजगारी. दरवर्षी  विदेशी एमएनसी हजारों कोटी देशातून लुटून नेतात. यापेक्षा विचित्र परिस्थिती काय असू शकते. 

स्वामी रामदेव हे स्वामी दयानंद यांचे खरे अनुयायी. स्वत: शेतकरी परिवारातले असल्यामुळे त्यांना शेतकर्यांच्या दुरवस्थेची चांगलीच कल्पना होती. योग प्रचारासाठी देशांतर्गत लाखो किलोमीटरचा प्रवास करताना  ग्रामीण व स्वदेशीची दुरावास्था त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. या शिवाय आपले वर्चस्व भारतीय बाजारावर स्थापित करण्यसाठी  विदेशी एमएनसी, पैश्यांच्या जोरावर व्यवस्थेचा दुरुपयोग करून स्वदेशी कंपन्यांना ठेचीत होते, हे हि पाहिले. स्वामीजींनी विदेशी कंपन्यांच्या मुजोरीला आव्हान देण्याचे ठरविले.

भारतात अधिकांश लोक आज हि ग्रामीण भागात राहतात. शेतकर्यांजवळ थोडी शेत जमीन आणि गाय आणि बैल, दूध, गौमूत्र व शेण हि. तथाकथित श्वेतक्रांती वाल्याने भारतीय गाय आणि तिथे दूध बाजारातून हद्दपार केले. विदेशी संकर गायींचे बैल शेतीसाठी कुचकामी ठरले. छोट्या शेतकर्याला हि ट्रक्टर घ्यावे लागले. विदेशी कंपन्यांनी देशी बियाणे हद्दपार केले. सरकारने हि रासायनिक खतांवर सबसिडी देऊन शेतकर्यांना जैविक व परंपरागत शेतीपासून दूर केले. जमिनीची पोत बिघडली. उत्पादन खर्च वाढला. परिणाम शेतकर्यांची आत्महत्या किंवा कन्सर इत्यादीने मृत्यू. प्रदूषित शेतमालच्या उपभोगाचे  परिणाम ग्राहकांना हि भोगावे लागले. विदेशी बी बियाणे, कीटनाशक इत्यादी विकणाऱ्या कंपन्यांची मात्र चांदी झाली. 

शेतकरी समस्या आणि स्वदेशी हे दोन्ही एका दुसर्यांशी निगडीत आहे हि जाणीव स्वामीजींना होती. गौ अनुसंधान, देशी बियाणे आणि जैविक शेतीवर अनुसंधानचे कार्य स्वामीजींनी पतंजलीत सुरु केले. उद्देश्य शेतीतून जीएम बियाणे, विदेशी कीटनाशक इत्यादी विकणाऱ्या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखविणे व स्वास्थ्यवर्धक खाद्य जनतेला उपलब्ध करून देणे. परीणाम आज  शेतकरी हि आता विदेशी बियाणे, विदेशी कीट नाशक इत्यादीं वापरणे सोडून, जैविक शेतीकडे वळू लागले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जैविक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे कार्य हि पतंजलीने सुरु केले.

योग प्रचार करतांना सर्वप्रथम त्यांनी थंड पेय विकणार्या विदेशी कंपन्यांवर हल्ला चढविला. थंडा मतलब टाॅयलेट कोला हे लोकांच्या मनात बिंबविले. पहिले दिल्लीत छाछ फक्त मंगळवार लस्सी साठी काही दुग्ध विक्रेता   किंवा सायकल वर छाछ आवाज देऊन विकायचे. पण आज अमूल, मदर डेरी पासून जवळपास सर्वच दुग्ध उत्पादक लस्सी व बोतल बंद छाछ विकतात. दुग्ध उत्पादकांना निश्चित फायदा झाला असेल. या शिवाय पॅक गायीचे दूध हि बाजारात मिळू लागले. आता तर देशी गायीचे दूध, तूप, पनीर इत्यादी हि मिळू लागले आहे. विदेशी गायींच्या जागी देशी गायी पाळण्याकडे शेतकर्यांचा कल वाढू लागला. दहा वर्ष आधी देशात फक्त १० हजार टनपेक्षा कमी आंवळा प्रोसेस होत होता,  तुरट आवळा ज्यूस हि पिण्याची वस्तू असते देशातील लोकांना पहिल्यांदाच कळले. आज दीड लाख टनपेक्षा जास्त फक्त आवळा प्रोसेस होतो. अलोविरा, गिलोय लौकी (दुधी)  ज्यूस एवढेच नव्हे तर गौअर्क हि लोक घेऊ लागले. फळांचे ज्यूस पिण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. निश्चित हजारो शेतकर्यांना याचा फायदा झाला असेल.  यासर्वांमुळे विदेशी कंपन्यांचा नफा निश्चित कमी झाला असेल.

दुसरा हल्ला, फूडपार्क स्थापित करून, भारतातील वनस्पतींवर आधारित पर्यावरण अनुकूल व स्वास्थ्यकर उपभोक्ता पदार्थांची निर्मिती सुरु केली. पहिल्यांदाच मी हिरवे टॅग असलेले साबून, शेम्पू तेही स्वस्तातले व hcl रहित गौनायाल वापरले. विदेशी कंपन्यांच्या रिफाईंड तेलाच्या जागी स्वास्थ्यवर्धक फिल्टर तेल बाजारात आणले. प्रथमच पतंजलीने विदेशी कंपन्यांच्या एकाधीकाराला सरळ आव्हान दिले. विदेशी एमएनसींनी पैश्यांच्या जोरावर व्यवस्थेला विकत घेऊन पतंजलीला नष्ट करण्याचा जोरदार प्रयास हि केला. पण तो स्वामीजींनी आपल्या अथक प्रयासाने मोडून काढला. याचा परिणाम,  शेतकऱ्यांना अधिक मुनाफा व ग्राहकांना उच्च दर्जेच्या वस्तू स्वस्त: मिळू लागल्या. आज अनेक भारतीय कंपन्या fmcg क्षेत्रात उतरत आहेत. भविष्यात विदेशी कंपन्यांचे वर्चस्व  कमी होणार हे निश्चित. 

याच दिवाळीत अनेक भारतीय वस्त्र उत्पादकांना व खादी उत्पादकांना सोबत घेऊन एका छत्रा खाली एकत्र करून पतंजली परिधान विदेशी ब्रांडेड वस्त्रांना आव्हान देणार आहे. 

सारांश एवढेच, आज स्वामी रामदेवमुळे स्वदेशी क्रांतीची खरी सुरुवात झाली आहे.

No comments:

Post a Comment