(भारताच्या एका राज्यातल्या एका छोट्या नगरात घडलेली काल्पनिक घटना)
पावसाळा नुकताच संपलेला होता. एक गाय रस्त्याच्या किनार्यावर उगवलेले गवत खात होती. अचानक तिचे लक्ष्य एका बंगल्याच्या उघड्या गेट कडे गेले. तिला बंगल्याच्या आवारात सुंदर हिरवेगार गवत दिसले. ती बंगल्यात घुसली आणि हिरवे गवत चरू लागली. बिचार्या गायीला काय माहित होते डेप्युटी कलेक्टरच्या बंगल्यात घुसण्याचा परिणाम काय होतो. डेप्युटी कलेक्टर मॅडमचे लक्ष गायीकडे गेले, ती शिपायावर जोरात डाफरली, नालायक कहाँ घोड़े बेच के सो रहा है, देख गाय ने बगीचे का सत्यानास कर दिया. एवढ्यावरच ती थांबली नाही, एक दगड उचलून गायीवर भिरकावला. गाय घाबरून गेटकडे पळाली. मॅडमची ओरड ऐकून शिपाई घाबरून उठला. त्याने जवळ ठेवलेला डंडा उचलला आणि गायीच्या पायावर जोरात डंडा हांडला.
गायीच्या मालकिणीचे घर मॅडमच्या घराजवळच होते. तिने गायीला मॅडमच्या बंगल्यात घुसताना पहिले. ती धावत-धावत बंगल्याजवळ पोहचली. तिने शिपायाला गायीला डंडा मारताना पाहिले. ती त्याच्यावर ओरडली, गायीला डंडा का मारला. बघ कशी लंगडून चालते आहे. तिची आवाज मॅडमने ऐकली. मॅडमचा पारा चढला ती गायीच्या मालकिणीपेक्षा दुप्पट आवाजात ओरडली. एवढे ओरडायला काय झाले 'गायीला डंडाच मारला आहे, काही गाडी खाली नाही घातले'. मॅडमचे उद्गार ऐकून, गायीच्या मालकिण हि चिडली आणि त्वेषाने ओरडली, हिम्मत असेल तर आत्ताच गौमातेला गाडी खाली चिरडून दाखव, डायन कहीं की. मॅडम: हो, मी डायन आहे, गायी सोबत तुलाही गाडी खाली चिरडून टाकली तरी कुणी वाकडे करू शकत नाही माझे. गायीची मालकीण: इथेच उभी आहे, हिम्मत असेल घाल गाडी अंगावर. आता मॅडम थोडी गांगरली, पवित्रा बदलत म्हणाली, सिपाही भगा इस बत्तमीज औरत को. गायीच्या मालकिणीकडे पाहत म्हणाली, खूप माज चढला आहेना तुला. आता पहाच. तू स्वत:हून आज रात्रीच थुक चाटायला येईल माSSझी.
गायीच्या मालकिणीचा नवर्याची छोटीसी कपड्यांची दुकान होती. दुपारी तो घरी जेवायला आला. तेंव्हा त्याच्या बायकोने सकाळी घडलेला प्रकार सांगितला. तिचा नवरा म्हणाला जे घडले ते ठीक झाले नाही. मोठ्या लोकांशी जबान लढवली नाही पाहिजे.
तिच्या नवर्याची आशंका खरी ठरली. संध्याकाळी त्याच्या दुकानात एक शिपाई निरोप घेऊन आला. आपको दरोगाजीने थाने बुलाया है. एक दोन शेजारच्या दुकानदारांना घेऊन तो पोलीस ठाण्यात पोहचला. दरोगाजी त्याची वाटच पाहत होते. त्याला पाहून म्हणाले, तुझ्या विरुद्ध शिकायत आहे, आज सकाळी सरकारी कर्मचार्यावर हल्ला आणि मारपीट करण्याची. मी तर सकाळी दुकानात होतो. दरोगाजी म्हणाले, ते मला माहित आहे, पण डेप्युटी कलेक्टर मॅडमच्या शिपायानी तुमच्या विरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. आता एकच उपाय आहे, आपल्या बायकोला घेऊन मॅडमच्या घरीजा जा, तिच्या समोर नाक घासा किंवा तिची थुक चाटा, काहीही करा, पण मॅडमला प्रसन्न करा, त्या शिवाय तिचा शिपाई तक्रार मागे घेणार नाही. अन्यथा मला सरकारी नौकाराला मारहाण करण्याच्या आरोपात तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखील करावाच लागेल. मालकिणीचा नवरा म्हणाला फक्त माझा प्रश्न असता तर मी बंगल्यावर जाऊन मॅडमची थुक हि चाटली असती. पण माफ करा, माझी बायको हे करणे शक्य नाही. तिने काही गुन्हा केलेला नाही. मी तिला असे करायला सांगू शकत नाही. या शिवाय आमच्या गायीच्या पायाला जबर मार लागला आहे. ती लंगडून चालते आहे. सत्य काय तुम्हाला माहित आहेच. त्यावर दरोगा म्हणाला मॅडमचा हुकुम आहे. लिखित तक्रार आहे. एफ आई आर दाखील करावीच लागेल आणि तुला बंद हि करावेच लागेल. माझा नाईलाज आहे.
दोन-चार दिवसांनी त्या दुकानदाराला जमानत मिळाली. जमानत वर बाहेर आल्याक्षणी त्याने गायीला विकून टाकले. सुमार १०-१२ वर्ष हा खटला चालला आणि दुकानदाराची निर्दोष मुक्तता झाली.
बिचार्या गायीने एका सरकारी अधिकार्याच्या बंगल्यात घुसण्याची घोडचूक केली. गायीने थोडे बहुत गवत हि खाल्ले असेल. त्याची शिक्षा म्हणून गायीला मार हि खावा लागला आणि तिच्या मालकाला १०-१२ वर्षे मनस्ताप भोगावा लागला.
ब्रिटिशांकडून विरासतमध्ये मिळालेली नौकरशाही (IAS) नावाची संस्था , सेवक कमी, क्षत्रपच जास्त निर्माण करते. हेच आजचे सत्य आहे.
ब्रिटिशांकडून विरासतमध्ये मिळालेली नौकरशाही (IAS) नावाची संस्था , सेवक कमी, क्षत्रपच जास्त निर्माण करते. हेच आजचे सत्य आहे.
No comments:
Post a Comment