मनोज आणि मोनिका व त्यांची दोन मुले, राहुल वय साडेतीन वर्ष आणि रोहित २ वर्ष. एक छोटासा सुखी महानगरीय परिवार. पण मोनिकाला एकच खंत होती. गेल्या चार वर्षापासून एकदाही मनोज आणि मोनिकाला एकत्रित सिनेमा पाहायला किंवा कुठे फिरायला जाणे जमले नव्हते. दिल्लीतल्या त्या प्रसिद्ध मल्टीप्लेक्स सैराट हा सिनेमा लागला होता. मनोजला कसे हि करून बायको सोबत सिनेमा बघायचा होता. कारण एकच, दोघांचाहि घरच्यांच्या इच्छे विरुद्ध प्रेम विवाह होता.
म्हणतात न "जहाँ चाह वहाँ राह". गेल्या रविवारची गोष्ट. मनोज मोनिकला म्हणाला. आज आपण सिनेमा बघायला जाऊ. मोनिका, या दोन शैतानांचे काय करायचे, सिनेमा बघू देतील हे. मनोज: आपण दोघे राजाराणी सारखे मस्त सिनेमा बघू. राहुल आणि रोहितची काळजी तू करू नको. मी बघून घेईन.
म्हणतात न "जहाँ चाह वहाँ राह". गेल्या रविवारची गोष्ट. मनोज मोनिकला म्हणाला. आज आपण सिनेमा बघायला जाऊ. मोनिका, या दोन शैतानांचे काय करायचे, सिनेमा बघू देतील हे. मनोज: आपण दोघे राजाराणी सारखे मस्त सिनेमा बघू. राहुल आणि रोहितची काळजी तू करू नको. मी बघून घेईन.
ऑटोत बसून मनोज परिवारासह त्या प्रसिद्ध माॅल वर पोहचला. मॉल मध्ये असलेल्या मल्टीप्लेक्स वर सैराट लागलेला होता. त्याच फ्लोर वर एक बालवाडी होती. तिथे लहान मुलांचे भरपूर खेळणे होते. घोडागाडी, गाडी, कार, घसरगुंडी, विडीओ गेम्स, टीवी वर सुरु असलेल्या कार्टून फिल्म्स अर्थात लहानमुलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी होत्या. स्कर्ट घातलेल्या सुन्दर सुन्दर दीदी ही होत्या. हे सर्व पाहून राहुल जाम खुश झाला. मनोज राहुलला म्हणाला, आम्ही परत येत पर्यंत तू आणि रोहित मस्त पैकी इथे खेळ. भूक लागली कि दीद खायला हि देईल. तो पर्यंत आम्ही फिरून येतो. बाबा तुम्ही का नाही इथे थांबत राहुल म्हणाला. बेटा इथे फक्त लहान मुलेच खेळू शकतात. तुला गाडी चालवायची होती न. आपल्या घरात तर जागा नाही. तू इथे मनसोक्त गाडी चालव. रोहितवर हि थोड लक्ष ठेव. काही लागल कि या दीदीला सांग. आम्ही येतोच.
मुलाना बालवाडीत सोडून मनोज आणि मोनिकाने सैराट सिनेमाचा आनंद घेतला. घरी परतल्यावर, मनोज, मोनिकाला म्हणाला, बघ तुझ्या नवर्याची शक्कल. आता तर म्हण, हुशार आहे तुझा नवरा. मोनिका हि गालात हसली. आपल्या बायकोला खुश पाहून मनोज म्हणाला, पुढच्या रविवारी आपण बुद्ध गार्डनला जाऊ, लग्नापूर्वीच्या गमती-जमती करू. मोनिका: तुझ्या जिभेला काही हाड आहे कि नाही. मनोज: लग्नाआधी तूच म्हणायची 'देखने वाले जलते हैं तो जलते रहे'. तेंव्हा तर लग्न हि नव्हते झाले, आता तर लायसेन्स आहे. मला सध्या तुझ्याशी बोलायला वेळ नाही, म्हणत मोनिका स्वैपाकघरात घुसली. मनोज मात्र जाम खुश होता. मुलांना बालवाडीत खेळण्यासाठी सोडून आपण मौज करू शकतो. हे त्याला कळले होते.
रात्रि मोनिकाने बघितले, राहुल झोपताना कण्हत होता. काय झाले राहुल, तिने विचारले. राहुलने आपल्या पायाकडे बोट दाखविले. त्याच्या पायावर सूज आलेली होती. राहुल घसरगुंडीवरून पडला होतो. मोनिकाने विचारले, राहुल आधी का नाही सांगितले, बालवाडीवाल्यांना जाब विचारला असता. राहुल उतरला, आई, तिथली दीदी म्हणाली, तुझ्या आई-बाबांना सांगू नको, नाही तर ते तुला इथे खेळायला येऊ देणार नाही. आई मला गाडी चालवायला आवडते. आता मोनिका का काय बोलणार. तिला सिनेमा बघायचा होता, मौज करायची होती म्हणून तिने मुलांना खेळाचे लालच दिले होते.?????
टिप: पात्र कळले तर गूढ हि कळेल.
टिप: पात्र कळले तर गूढ हि कळेल.
No comments:
Post a Comment