Thursday, August 29, 2024

समर्थ विचार: मुलाचे चालीनें चालावें

 जय जय रघुवीर समर्थ 

मुलाचे चालीनें चालावें 
मुलाच्या मनोगते बोलावें.
तैसें जनासी सिकवावें.
हळु हळु.

समर्थ म्हणतात, ज्या प्रमाणे मुलांना त्यांच्या चाली प्रमाणे चालून त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजून शिकवावे लागते. तसेच लोकांनाही त्यांचें मन सांभाळून उत्तम आचार - विचार त्यांच्या मनात भरावे लागतात. यासाठी वेळ द्यावा लागतो. 

आपण कुणाला शिकवू शकतो हा सर्वात मोठा भ्रम आहे. आपण स्वतः ला कितीही मोठे विद्वान समजात असला तरी आपण दुसऱ्याला शिकवू शकत नाही.  प्रत्येक व्यक्ती हा स्वतः शिकतो. छोटा बाळ पहिले आईचा स्पर्श ओळखणे शिकतो. नंतर कानाने आवाज ओळखणे शिकतो.  डोळे स्थिर झाल्यावर चेहरा ओळखणे शिकतो.  एकदा की दुधात पॉवर विटा टाकून दिला. बाळाला त्याच्या स्वाद आवडला की साधे दूध त्याला चालणार नाही. जिभेला स्वाद आवडू लागतात.  घरात जर दुधी भोपळा, तोराई, कारले मुलांना जेवणात दिले नाही तर मोठे झाल्यावर ही त्या भाज्या त्यांना आवडणार नाही. तुम्ही दुसऱ्याशी खोटे बोलाल तर तुमचा मुलगा ही तुमच्याशी खोटे बोलणार. बाप जर  घरात  दारू पीत असेल  आणि त्याच्या  मुलाने दारू पियू  नये ही अपेक्षा बापाने ठेवणे व्यर्थ आहे. याच्या अर्थ प्रत्येक मुलगा त्याच्या ज्ञानेंद्रियांना जे काही कळते, समजते त्या आधारावर त्याच्या मनात असंख्य प्रश्न उठतात. त्या प्रश्नांचे उत्तर तो आई वडील आणि घरातील सदस्यांचे आचरण पाहून हळु हळु शोधतो. जन्माच्या पहिल्या श्वासा पासून ते अखेरच्या श्वासा पर्यन्त आपण शिकणारे लहान बाळच असतोजे काही शिकतो त्यानुसार आपले व्यक्तित्व घडत राहते.

भौतिक शास्त्रज्ञ प्रोफेसर एच. सी, वर्मांच्या मते शाळेकरी मुलांच्या मनात सतत प्रश्न उठत राहतात.  त्यांना  स्वतः प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी मदत करणे हेच शिक्षकांचे शैक्षणिक कार्य. जर मुलाला उत्तर सापडले नाही तर त्याला शिक्षणात रस राहणार  नाही. कदाचित तो उत्तम गुणांनी पास ही होईल. पण त्या विषयाचे व्यवहारिक ज्ञान तो आत्मसात करू शकणार नाही. नवीन आविष्कार  करू शकणार नाही. आचार्य विष्णु शर्माने पशु-पक्षी आणि जनावरांच्या गोष्टी सांगून राजकुमारांना राजनीती शिकवली.  उपनिषदांमध्ये प्रश्न विचारण्या वरच जास्त जोर दिला आहे. शिष्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे हेच गुरूचे काम.  म्हणूनच प्रोफेसर एच. सी. वर्माने भारतीय शिक्षा बोर्डच्या विज्ञानाचे पुस्तके  तैयाऱ करताना पंचतंत्र आणि उपनिषद दोन्ही विचारधारांचा समावेश केला आहे. विद्यार्थी प्रश्न विचारून त्यांच्या चालीने शिकतील. 

समर्थांनी १२ वर्ष तप केले. वेद, उपनिषद सहित अनेक धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केले. १२ वर्ष भ्रमण करून त्याकाळची देशाची परिस्थिती समजली. मोगलांच्या अत्याचाराने प्रजा त्रस्त होती, देवळे तोडली जात होती. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती.  लुटणार जाळ पोट हत्या नित्याचे काम होते. प्रजेत अत्याचारांच्या विरोधात लढण्याचे त्राण ही उरले नव्हते.  प्रजा खरा धर्म विसरून गेली होती. चमत्कारी पीर फकीर बाबांच्या नादी लागून चमत्कारात धर्म शोधत होती. मोगली राक्षसी अत्याचारांपासून प्रजेचे रक्षण करण्यासाठी श्रीराम आणि हनुमंता सारखे धर्म पारायण शूर वीर व्यक्तित्व कसे घडवायचे हा प्रश्न समर्थांच्या समोर होता. लहान मुलांसारखे असंख्य विचार त्यांच्या मनात ही उठले असतील. त्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधली. समर्थांनी त्या सर्व प्रश्नांचे समाधान श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून केले. श्री सार्थ दासबोधाचे नित्य पारायण करता-करता सहजच आपल्याला मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हळु हळु मिळू लागतात. संसारात आणि अध्यात्म दोन्ही क्षेत्रांत आपली उन्नती होते. 




No comments:

Post a Comment