Thursday, August 22, 2024

जुनी कथा: बेडूक आणि सर्प

 फार जुनी नीती कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडलीरागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली.

सर्प म्हणालाबेडूक हे माझे भोजन आहेत्या मुळे तुला मी खाणारच. त्या  परिस्थितीत ही बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली. तो सर्पास म्हणालातू मला खाईलतर आज तुझे पोट भरेलउद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्याभराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. 

सर्पाने विचारलेते कसे शक्य आहेबेडूक म्हणाला इथे जवळच एक विहीर आहेत्यात शेकडो बेडूक राहतातत्यात काही माझे वैरी आहेत. मी तुला विहीर पर्यंत घेऊन जातो. महिना भर विहीरीत राहूनमी दाखविलेल्या माझ्या सर्व विरोधकांना तू खाऊन टाक. पण अट एकचमहिन्याभरानंतर तुला विहीर सोडावी लागेल. सर्पाला आनंद झालात्याने पटकन बेडकाची अट मान्य केली. तो बेडूक सर्पाला घेऊन विहिरीत आला. महिन्याभरात सर्पाने त्याच्या सर्व विरोधकांचा फडशा पाडला. आता बेडूकाने पूर्वीच्या अटी प्रमाणे  सर्पास विहीर सोडण्याची विनंती केली. सर्प म्हणालाअटी वैगरे जुनी गोष्ट झालीबेडूक माझे जेवण आहेविहिरीतल्या सर्व बेडकांचा फडशा पाडल्या शिवाय मी काही विहीर सोडणार नाही. सर्पाने त्या बेडकाला गिळून टाकले. सर्पाला विहीरीत आमंत्रित करण्याचा हा परिणाम होणारच होता.

आज ही परिस्थिती बदललेली नाही. काही राजनेता विदेशी सर्पांच्या मदतीने सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी कडे अज्ञानी मतदाता जातीच्या राजनीतीचा शिकार झालेला आहे. त्याला आपला विनाश ही दिसत नाही आहे. 


No comments:

Post a Comment