दहा वर्षाची चिऊ धावत-धावत आली आणि म्हणाली, बाबा-बाबा मी पैलवान बनणार, ओलंपिक खेळणार आणि मेडल आणणार. वा! छान, सुवर्णपदक आण बेटी. चिऊ नाक मुरडत म्हणाली, जमणार नाही, बाबा. अच्छा मग चांदीचे, चिऊ ने नकारात्मक मान हलवली. अखेर बाबा म्हणाले, आम्हाला तर कांस्य पदक ही चालेल. आपल्या देशात कांस्य पदक जिंकणार्याला ही एखाद कोटी मिळतात. चिऊ चिडून म्हणाली, बाबा, जे पदक मिळाल्यावर लोकं माझा रोड शो करतील. माझ्या अंगावर गुलाब फुलांचा वर्षाव होईल आणि मला करोडो रुपये मिळतील, मला ते मेडल हवे आहे.
No comments:
Post a Comment