Saturday, August 24, 2024

पैलवान गंगाबाई

पैलवान दादासाहेब पाटील मोठे जमींदार होते. तालुक्यात त्यांचे वचक होते. एकदा जिल्हा स्तरावर एक कुस्ती जिंकली होती. तेंव्हा पासून ते आपल्या नावासमोर पैलवान बिरूद लावायचे. गावाची आणि तालुक्याची कुस्ती चमू तेच निवडायचे. त्यांचीच मुलगी गंगाबाई अर्थात गंगू. गंगू १६-१७ वर्षाची असताना तिलाही कुस्तीचा शौक झाला. दादासाहेबांनी तिच्यासाठी मुलींच्या आखाड्याची स्थापना गावात केली. तालुका स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी ते गंगूला पाठवू लागले. गंगूला एक ही कुस्ती जिंकता आली नाही. शेवटी दादा साहेबांनी शक्कल लढवली. गंगू एक कुस्ती जिंकली. दादासाहेबांनी आखाड्याचे नाव "पैलवान गंगूबाई मुलींचा आखाडा" ठेवले. लवकरच योग्य मुलगा बघून तिला सासरी पाठवून दिले आणि दादा साहेबांनी मुक्तीचा श्वास सोडला.

आता गंगू दोन पोरांची आई आणि तीस वर्षाची झाली होती. पुढील आठवड्यातच तालुकाचा चमू निवडण्यासाठी पैलवानांची निवड होणार होती. सकाळची वेळ होती दादासाहेब झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. अत्यंत गोड आवाज दादू, मी आले, त्यांच्या कानावर आदळला.  दादा साहेब मनात पुटपुटले, काही ना  काही काम घेऊन ही आली असेल. गंगू ने येताच दादासाहेबांना नमस्कार केला आणि आत केली.  गंगू एकटीच आली, हे दादासाहेबांना थोडे खटकले पण त्यांनी विचार केला, नातवांची शाळा बुडेल म्हणून त्यांना घरीच सोडून आली असेल. एक दोन दिवसात जाईल परत.

थोड्या वेळाने माय -लेकी दोन्ही बाहेर आल्या.  पाटलीन बाई कडकं आवाजात म्हणाल्या, अहो! पाटील लेक काय म्हणते ऐकून घेता का? तिची छोटीशी इच्छा आहे, तुम्हाला सहज जमेल. दादा साहेबांनी गंगू कडे पाहिले, दादू, मला किनई यंदाच्या निवड स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. काय, तुझे डोक्स  ठिकाणावर आहे का? कुस्ती सोडून दहा वर्ष झाली तुला. गंगू ,"त्यासाठीच लवकर आली आहे. पाच दिवसांत ट्रेन होऊन जाईल, बाकी तुम्ही पाहून घ्या". तिला टाळण्यासाठी दादासाहेब म्हणाले,  गंगू तुझे वजन किती,माहित आहे का? "म्या ६० किलो आहे", गंगू उतरली.  ६० किलोत तुझ्या मामे बहिणीची निवड केली आहे. गंगू , मला माहित आहे, मी ५० किलो वर्गात भाग घेईन. ५० किलो वर्गात चुलत्याची लेक आहे. गेल्या वर्षी ती निवड स्पर्धा जिंकली होती. पुढे जिल्हा स्तरावर तिने काय दिवे लावले होते ते ही मला माहित आहे, तिच्या जागी मी खेळणार. किंवा आम्ही दोन्ही खेळू.  पण, गंगू  तुला खेळवायचे ठरवले तर कुणाला तरी बाहेर करावे लागेल. "यमुला काढून टाका तशीही ती आपल्या नात्यात नाही".  पोरींची जिद्द पुरविण्यासाठी दादासाहेबांनी चयन स्पर्धे आधी यमुला बाहेर केले. गंगू ने हीआखाड्यात कुस्तीची जोरदार तैयारी सुरू केली. 

निवड स्पर्धा पाहायला जवळपासच्या गावांतून शेकडो लोग आले होते. गंगू ताई जिंदाबादचे नारे ही लागत होते. तिच्या वर्गात आठ स्पर्धक होते. तिने तिन्ही कुस्त्या सहज जिंकल्या. लोग तिचा जयजयकार करू लागले. सर्व कुस्त्या संपल्या. दादासाहेबांनी निकाल जाहीर केले. जास्त वजन असल्याने त्यांनी गंगूला अपात्र केले. तिन्ही कुस्त्या जिंकल्या म्हणून गंगूची भरपूर प्रशंसा केली. चुलत्याच्या मुलीचे चयन झाले.  दादासाहेबांनी नि:स्पृहता पाहून लोक त्यांचा जयजयकार करू लागले. पैलवान गंगू ताई जिंदाबादचे नारे ही हवे तरंगू लागले.

अपात्र झाली तरी काय झाले. तिन्ही कुस्त्या जिंकून ती निर्विवाद चॅम्पियन होती. दादा साहेबांनी त्याच संध्याकाळी तीची विजय मिरवणूक काढली. लोकांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. तालुक्यातील प्रस्थ मंडळींनी बक्षिसांची घोषणा केली. याच क्षणाचे स्वप्न गंगू पाहत होती. अखेर तीची इच्छा पूर्ण झाली. मनातल्या मनात तिने कुणाचे तरी आभार मानले. 

No comments:

Post a Comment