Saturday, August 31, 2024

इतिहासाची परिचय: शाळेतील ऐतिहासिक एन्काऊंटर

 मी शाळेत होतो तेव्हा दिल्लीत अकरावी बोर्ड होता. आमची शेवटची बैच होती.   शाळेचे नाव जरी नूतन मराठी असली तरी शाळेत शिकणारे ८० टक्के विद्यार्थी पाकिस्तानातून आलेले  पंजाबी मुलतानी आणि सिंधी शरणार्थी होते. पंधरा-वीस टक्के मराठी आणि दाक्षिणात्य विद्यार्थी होते. आज बहुतेक मराठी मुलांची संख्या दहा पेक्षा कमी  असेल कारण करोल बाग  आणि आणि जुन्या दिल्लीत मराठी लोकं बोटावर मोजणारे राहतात. 1974 मध्ये मी आठवी  संस्कृत मध्ये 90% मार्क्स होते.  मला लहानपणापासून वाचनाची आवड. वयाच्या आठव्या वर्षी जुन्या दिल्ली स्टेशन समोरच्या दिल्ली पब्लिक पुस्तकालयाचा सदस्य झालो होतो. हजारों हिंदी पुस्तके वाचली होती. नववीत हिंदी विषय घेण्याचा निश्चय केला. हिंदी शिकविणाऱ्या  शिक्षक  रमेशचंद्रांना आनंद झाला कारण आर्ट्स आणि कॉमर्स घेणारा एक ही मराठी विद्यार्थी हिंदी भाषा घेत नव्हता. त्या काळात हिंदी टॉपरला ही 75% मार्क मिळत नव्हते. नूतन मराठी शाळेची जय मंगला शास्त्री आर्ट्स मध्ये दिल्लीत प्रथम आली होती तिचे  एकूण मार्क्स फक्त ७७ टक्के होते. संस्कृत  मध्ये  ८० टक्यांचा वर निश्चित असतील.  त्याकाळी टॉपर्सला कॉमर्स मध्ये ८०% पेक्षा कमी आणि सायन्स मध्ये ८५% पेक्षा  कमी राहत होते. 

आमच्या शाळेत बनारसचे शास्त्री सर संस्कृत शिकवायचे. हातात छडी घेऊन संस्कृत शिकवणारे बहुतेक ते एक मात्र शिक्षक असतील. संस्कृत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी वर ते मेहनत घेत असे त्यामुळे संस्कृत शिकणाऱ्या दहा पैकी आठ विद्यार्थ्यांना  75 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळायचे. बहुतेक सर्वच मराठी मुलांना 75 टक्के पेक्षा जास्त मार्क अकरावी बोर्डात मिळायचे. मी नववीत हिंदी विषय घेतला ही बातमी समजतात त्यांनी मला बोलावले. मला आठवते हातात छडी घेऊन ते खुर्ची वर बसले होते. टेबल समोर मी उभा राहिलो. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी तोफ डागली. पटाईत तुला पागल कुत्रा तर नाही चावला. मी नकारार्थक मान डोलवली.  मग हिंदी का  घेतली? मी, मला हिंदी आवडते. तुम्ही मराठी मुले  हिंदी लिहिताना भयंकर चुका करतात. हिंदीतील सर्व मात्रा मराठी पेक्षा उलट्या आहेत. नापास होशील. मी, सर मला माहित आहे. मी चुका करणार नाही. ते प्रेमाने म्हणाले बाळ तुझी हिंदी कितीही चांगली असेल तरीही 75 टक्के मार्क मिळणार नाही. संस्कृत घेशील तर तुला सहज ८० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळतील आणि अकरावीत फर्स्ट डिव्हिजन ही येईल. हिंदी भाषा तर  पंजाबी मुलतानी शरणार्थी मुलांसाठी  आहे त्यांना जोडाक्षरांचे उच्चारण करता येत नाही  याशिवाय ''ण "  आणि "ळ" शब्दही बोलता येत नाही. त्यांची मजबुरी आहे तुझी नाही. आता मला राहावले नाही, आपले पुस्तकात वाचलेले ऐतिहासिक ज्ञान त्यांच्यासमोर प्रगट केले. मी म्हणालो सर संस्कृत बोलणारे आर्य सप्तसिंधू प्रदेशात निवास करत होते. तुम्ही चूक.... शास्त्री सरांना उलटून  बोलणारा मुळीच आवडत नसेल. समोरच्या टेबलवर  छडी जोरात आपटत ते म्हणाले, मूर्ख आणि  गाढव आहेत ते.  आर्य  जर खरोखर असतील तर ते दक्षिण भारतीय असतील. बाकी तुला गड्ड्यात उडी मारायची असेल तर मार  पण तुझी फर्स्ट डिव्हिजन  येणार नाही. शास्त्री सरांची वाणी सत्य झाली.  भरपूर मेहनत घेऊनी हिंदीत मला फक्त ५४ टक्के मार्क मिळाले. सात मार्कांनी फर्स्ट डिव्हिजन हुकली. रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो होतो तेव्हा शास्त्री सरांची नजर चुकविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला सोडले नाही. भरपूर कान उपटले. पुढे अनेक वर्ष शास्त्री सर संस्कृत घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझे उदाहरण देत राहिले. शास्त्री सरांचे न ऐकण्याचा परिणाम मला भोगाव लागला होता.   बाकी माझ्या मोठ्या बहिणीने संस्कृत साहित्यात एम.ए. केले होते आणि लहान भावाला ही बारावी 85 टक्के मार्क संस्कृत मध्ये मिळाले होते.

संस्कृत आणि विंध्यपार भाषांमध्ये सापडणारे दोन्ही शब्द पंजाब ते युरेशिया कोणत्याही भाषेत सापडणार नाही. त्यांना संस्कृत बोलणे अवघड जाते.  ऋग्वेदातील पहिला शब्दच "अग्निमिळे.....  साहजिकच आहे, आज ही उत्तर भारतात चतुर्वेद पारायण यज्ञ होतात.  ब्राह्मण दक्षिण भारतातून येतात. त्याचे कारण हेच. एवढेच काय हरिद्वार येथील एका अश्याच यज्ञात योगगुरू ने ही कबूल केले त्यांना गुरुकुलच्या  विद्यार्थ्यांना वेद पाठ असेल तरी  दाक्षिणात्य श्याम रंगी ब्राह्मणांसारखे  उच्चारण जमणे शक्य नाही. 

आर्य नावाची खरोखरच कुठला कबीला अस्तित्वात होता तर तो दक्षिण भारतात कुठे तरी राहत असेल. युरेशियन असण्याचा प्रश्नच येत नाही. या शिवाय त्या भागात कुबड असलेल्या गायी ही नाहीत. आले असते तर घोड्यांवर स्वार होऊन आले असते. ऋग्वेदातील इंद्र सेनेच्या सेनापती मुद्गलानीच्या रथाला बैल ऐवजी घोडे जुंपलेले असते. घोड्यांच्या बदल्यात राजकुमारी या कथेचा जन्मच झाला नसता.  

ब्रिटिशांना भारतीयांवर विदेश राज्य  करतात हे सिद्ध करायचे होते. आजच्या शासकांना हिंदू मत विभाजित करून थोक मतांच्या मदतीने निवडणूक जिंकायची असते.त्यांची लाचारी कळते. पण जेंव्हा शिक्षित लोक लेखन करताना  ही स्वतचे डोके वापरत नाही तेंव्हा असे वाटते ते गुलामी मानसिकतेत जखडलेले आहे आणि स्व: विचार करण्याची क्षमता विसरून गेले आहे.

 बाकी आर्य हा स्वभावसूचक शब्द आहे.जातीशी संबंध नाही.




Thursday, August 29, 2024

समर्थ विचार: मुलाचे चालीनें चालावें

 जय जय रघुवीर समर्थ 

मुलाचे चालीनें चालावें 
मुलाच्या मनोगते बोलावें.
तैसें जनासी सिकवावें.
हळु हळु.

समर्थ म्हणतात, ज्या प्रमाणे मुलांना त्यांच्या चाली प्रमाणे चालून त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजून शिकवावे लागते. तसेच लोकांनाही त्यांचें मन सांभाळून उत्तम आचार - विचार त्यांच्या मनात भरावे लागतात. यासाठी वेळ द्यावा लागतो. 

आपण कुणाला शिकवू शकतो हा सर्वात मोठा भ्रम आहे. आपण स्वतः ला कितीही मोठे विद्वान समजात असला तरी आपण दुसऱ्याला शिकवू शकत नाही.  प्रत्येक व्यक्ती हा स्वतः शिकतो. छोटा बाळ पहिले आईचा स्पर्श ओळखणे शिकतो. नंतर कानाने आवाज ओळखणे शिकतो.  डोळे स्थिर झाल्यावर चेहरा ओळखणे शिकतो.  एकदा की दुधात पॉवर विटा टाकून दिला. बाळाला त्याच्या स्वाद आवडला की साधे दूध त्याला चालणार नाही. जिभेला स्वाद आवडू लागतात.  घरात जर दुधी भोपळा, तोराई, कारले मुलांना जेवणात दिले नाही तर मोठे झाल्यावर ही त्या भाज्या त्यांना आवडणार नाही. तुम्ही दुसऱ्याशी खोटे बोलाल तर तुमचा मुलगा ही तुमच्याशी खोटे बोलणार. बाप जर  घरात  दारू पीत असेल  आणि त्याच्या  मुलाने दारू पियू  नये ही अपेक्षा बापाने ठेवणे व्यर्थ आहे. याच्या अर्थ प्रत्येक मुलगा त्याच्या ज्ञानेंद्रियांना जे काही कळते, समजते त्या आधारावर त्याच्या मनात असंख्य प्रश्न उठतात. त्या प्रश्नांचे उत्तर तो आई वडील आणि घरातील सदस्यांचे आचरण पाहून हळु हळु शोधतो. जन्माच्या पहिल्या श्वासा पासून ते अखेरच्या श्वासा पर्यन्त आपण शिकणारे लहान बाळच असतोजे काही शिकतो त्यानुसार आपले व्यक्तित्व घडत राहते.

भौतिक शास्त्रज्ञ प्रोफेसर एच. सी, वर्मांच्या मते शाळेकरी मुलांच्या मनात सतत प्रश्न उठत राहतात.  त्यांना  स्वतः प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी मदत करणे हेच शिक्षकांचे शैक्षणिक कार्य. जर मुलाला उत्तर सापडले नाही तर त्याला शिक्षणात रस राहणार  नाही. कदाचित तो उत्तम गुणांनी पास ही होईल. पण त्या विषयाचे व्यवहारिक ज्ञान तो आत्मसात करू शकणार नाही. नवीन आविष्कार  करू शकणार नाही. आचार्य विष्णु शर्माने पशु-पक्षी आणि जनावरांच्या गोष्टी सांगून राजकुमारांना राजनीती शिकवली.  उपनिषदांमध्ये प्रश्न विचारण्या वरच जास्त जोर दिला आहे. शिष्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे हेच गुरूचे काम.  म्हणूनच प्रोफेसर एच. सी. वर्माने भारतीय शिक्षा बोर्डच्या विज्ञानाचे पुस्तके  तैयाऱ करताना पंचतंत्र आणि उपनिषद दोन्ही विचारधारांचा समावेश केला आहे. विद्यार्थी प्रश्न विचारून त्यांच्या चालीने शिकतील. 

समर्थांनी १२ वर्ष तप केले. वेद, उपनिषद सहित अनेक धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केले. १२ वर्ष भ्रमण करून त्याकाळची देशाची परिस्थिती समजली. मोगलांच्या अत्याचाराने प्रजा त्रस्त होती, देवळे तोडली जात होती. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती.  लुटणार जाळ पोट हत्या नित्याचे काम होते. प्रजेत अत्याचारांच्या विरोधात लढण्याचे त्राण ही उरले नव्हते.  प्रजा खरा धर्म विसरून गेली होती. चमत्कारी पीर फकीर बाबांच्या नादी लागून चमत्कारात धर्म शोधत होती. मोगली राक्षसी अत्याचारांपासून प्रजेचे रक्षण करण्यासाठी श्रीराम आणि हनुमंता सारखे धर्म पारायण शूर वीर व्यक्तित्व कसे घडवायचे हा प्रश्न समर्थांच्या समोर होता. लहान मुलांसारखे असंख्य विचार त्यांच्या मनात ही उठले असतील. त्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधली. समर्थांनी त्या सर्व प्रश्नांचे समाधान श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून केले. श्री सार्थ दासबोधाचे नित्य पारायण करता-करता सहजच आपल्याला मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हळु हळु मिळू लागतात. संसारात आणि अध्यात्म दोन्ही क्षेत्रांत आपली उन्नती होते. 




Saturday, August 24, 2024

पैलवान गंगाबाई

पैलवान दादासाहेब पाटील मोठे जमींदार होते. तालुक्यात त्यांचे वचक होते. एकदा जिल्हा स्तरावर एक कुस्ती जिंकली होती. तेंव्हा पासून ते आपल्या नावासमोर पैलवान बिरूद लावायचे. गावाची आणि तालुक्याची कुस्ती चमू तेच निवडायचे. त्यांचीच मुलगी गंगाबाई अर्थात गंगू. गंगू १६-१७ वर्षाची असताना तिलाही कुस्तीचा शौक झाला. दादासाहेबांनी तिच्यासाठी मुलींच्या आखाड्याची स्थापना गावात केली. तालुका स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी ते गंगूला पाठवू लागले. गंगूला एक ही कुस्ती जिंकता आली नाही. शेवटी दादा साहेबांनी शक्कल लढवली. गंगू एक कुस्ती जिंकली. दादासाहेबांनी आखाड्याचे नाव "पैलवान गंगूबाई मुलींचा आखाडा" ठेवले. लवकरच योग्य मुलगा बघून तिला सासरी पाठवून दिले आणि दादा साहेबांनी मुक्तीचा श्वास सोडला.

आता गंगू दोन पोरांची आई आणि तीस वर्षाची झाली होती. पुढील आठवड्यातच तालुकाचा चमू निवडण्यासाठी पैलवानांची निवड होणार होती. सकाळची वेळ होती दादासाहेब झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. अत्यंत गोड आवाज दादू, मी आले, त्यांच्या कानावर आदळला.  दादा साहेब मनात पुटपुटले, काही ना  काही काम घेऊन ही आली असेल. गंगू ने येताच दादासाहेबांना नमस्कार केला आणि आत केली.  गंगू एकटीच आली, हे दादासाहेबांना थोडे खटकले पण त्यांनी विचार केला, नातवांची शाळा बुडेल म्हणून त्यांना घरीच सोडून आली असेल. एक दोन दिवसात जाईल परत.

थोड्या वेळाने माय -लेकी दोन्ही बाहेर आल्या.  पाटलीन बाई कडकं आवाजात म्हणाल्या, अहो! पाटील लेक काय म्हणते ऐकून घेता का? तिची छोटीशी इच्छा आहे, तुम्हाला सहज जमेल. दादा साहेबांनी गंगू कडे पाहिले, दादू, मला किनई यंदाच्या निवड स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. काय, तुझे डोक्स  ठिकाणावर आहे का? कुस्ती सोडून दहा वर्ष झाली तुला. गंगू ,"त्यासाठीच लवकर आली आहे. पाच दिवसांत ट्रेन होऊन जाईल, बाकी तुम्ही पाहून घ्या". तिला टाळण्यासाठी दादासाहेब म्हणाले,  गंगू तुझे वजन किती,माहित आहे का? "म्या ६० किलो आहे", गंगू उतरली.  ६० किलोत तुझ्या मामे बहिणीची निवड केली आहे. गंगू , मला माहित आहे, मी ५० किलो वर्गात भाग घेईन. ५० किलो वर्गात चुलत्याची लेक आहे. गेल्या वर्षी ती निवड स्पर्धा जिंकली होती. पुढे जिल्हा स्तरावर तिने काय दिवे लावले होते ते ही मला माहित आहे, तिच्या जागी मी खेळणार. किंवा आम्ही दोन्ही खेळू.  पण, गंगू  तुला खेळवायचे ठरवले तर कुणाला तरी बाहेर करावे लागेल. "यमुला काढून टाका तशीही ती आपल्या नात्यात नाही".  पोरींची जिद्द पुरविण्यासाठी दादासाहेबांनी चयन स्पर्धे आधी यमुला बाहेर केले. गंगू ने हीआखाड्यात कुस्तीची जोरदार तैयारी सुरू केली. 

निवड स्पर्धा पाहायला जवळपासच्या गावांतून शेकडो लोग आले होते. गंगू ताई जिंदाबादचे नारे ही लागत होते. तिच्या वर्गात आठ स्पर्धक होते. तिने तिन्ही कुस्त्या सहज जिंकल्या. लोग तिचा जयजयकार करू लागले. सर्व कुस्त्या संपल्या. दादासाहेबांनी निकाल जाहीर केले. जास्त वजन असल्याने त्यांनी गंगूला अपात्र केले. तिन्ही कुस्त्या जिंकल्या म्हणून गंगूची भरपूर प्रशंसा केली. चुलत्याच्या मुलीचे चयन झाले.  दादासाहेबांनी नि:स्पृहता पाहून लोक त्यांचा जयजयकार करू लागले. पैलवान गंगू ताई जिंदाबादचे नारे ही हवे तरंगू लागले.

अपात्र झाली तरी काय झाले. तिन्ही कुस्त्या जिंकून ती निर्विवाद चॅम्पियन होती. दादा साहेबांनी त्याच संध्याकाळी तीची विजय मिरवणूक काढली. लोकांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. तालुक्यातील प्रस्थ मंडळींनी बक्षिसांची घोषणा केली. याच क्षणाचे स्वप्न गंगू पाहत होती. अखेर तीची इच्छा पूर्ण झाली. मनातल्या मनात तिने कुणाचे तरी आभार मानले. 

Friday, August 23, 2024

शतशब्द कथा: मला ते मेडल हवे

दहा वर्षाची चिऊ धावत-धावत आली आणि म्हणाली, बाबा-बाबा मी पैलवान बनणार, ओलंपिक खेळणार आणि मेडल आणणार. वा! छान, सुवर्णपदक आण बेटी. चिऊ नाक मुरडत म्हणाली, जमणार नाही, बाबा. अच्छा मग चांदीचे, चिऊ ने  नकारात्मक मान हलवली. अखेर बाबा म्हणाले, आम्हाला तर कांस्य पदक ही चालेल. आपल्या देशात कांस्य पदक जिंकणार्याला ही एखाद कोटी मिळतात. चिऊ चिडून म्हणाली, बाबा, जे पदक मिळाल्यावर लोकं माझा रोड शो करतील. माझ्या अंगावर गुलाब फुलांचा वर्षाव होईल आणि मला करोडो रुपये मिळतील, मला ते मेडल हवे आहे.

Thursday, August 22, 2024

जुनी कथा: बेडूक आणि सर्प

 फार जुनी नीती कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडलीरागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली.

सर्प म्हणालाबेडूक हे माझे भोजन आहेत्या मुळे तुला मी खाणारच. त्या  परिस्थितीत ही बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली. तो सर्पास म्हणालातू मला खाईलतर आज तुझे पोट भरेलउद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्याभराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. 

सर्पाने विचारलेते कसे शक्य आहेबेडूक म्हणाला इथे जवळच एक विहीर आहेत्यात शेकडो बेडूक राहतातत्यात काही माझे वैरी आहेत. मी तुला विहीर पर्यंत घेऊन जातो. महिना भर विहीरीत राहूनमी दाखविलेल्या माझ्या सर्व विरोधकांना तू खाऊन टाक. पण अट एकचमहिन्याभरानंतर तुला विहीर सोडावी लागेल. सर्पाला आनंद झालात्याने पटकन बेडकाची अट मान्य केली. तो बेडूक सर्पाला घेऊन विहिरीत आला. महिन्याभरात सर्पाने त्याच्या सर्व विरोधकांचा फडशा पाडला. आता बेडूकाने पूर्वीच्या अटी प्रमाणे  सर्पास विहीर सोडण्याची विनंती केली. सर्प म्हणालाअटी वैगरे जुनी गोष्ट झालीबेडूक माझे जेवण आहेविहिरीतल्या सर्व बेडकांचा फडशा पाडल्या शिवाय मी काही विहीर सोडणार नाही. सर्पाने त्या बेडकाला गिळून टाकले. सर्पाला विहीरीत आमंत्रित करण्याचा हा परिणाम होणारच होता.

आज ही परिस्थिती बदललेली नाही. काही राजनेता विदेशी सर्पांच्या मदतीने सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी कडे अज्ञानी मतदाता जातीच्या राजनीतीचा शिकार झालेला आहे. त्याला आपला विनाश ही दिसत नाही आहे.